मुंबई: प्रतिनिधी शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने…
Author: Saimat
जळगाव ; प्रतिनिधी खान्देशसह जळगाव जिल्ह्यात सोमवार रात्री ७ वाजेपासून विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला असून हा पाऊस तीन दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. भुसावळ शहरासह परिसरात रात्री ८.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. यासह बदलत्या वातावरणामुळे पुन्हा साथीचे आजार तोंड वढ काढण्याची शक्यता आहे
मुबई : प्रतिनिधी “सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विजेचं कनेक्शन कापल्यानं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडला. सरकारनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापावी, अशी मागणी केली. हे सरकार कोडगं, असंवेदनशील आहे. हे सरकार बिल्डरांचं आहे, हे सरकार बेवड्यांकरता धोरण तयार करतं. शेतकऱ्यांना नापिकी आणि इतर कारणांनी वीज कनेक्शन कापू नका अशी विनंती केली होती. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन मे पर्यंत कापणार नाही, असं म्हटलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापलं जातंय. काही शेतकऱ्यांनी वीज बील थकवलं तरी डीपी काढून नेलं जात आहे. रब्बीचा हंगाम खराब झाला आता…
जळगावः प्रतिनिधी येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिरात तब्बल 150 विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मानवी साखळी बनवून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. निस्वार्थपणे चोवीस तास सेवा देणारी स्त्री गृहिणी तिचे एक ममतामई रूप म्हणजे आई प्रत्येकासाठी अतिशय जिव्हाळ्याचा शब्द आई.महिला दिनानिमित्त स्त्रीच्या कार्याला देण्यासाठी मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक शाळेत 150 विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात मानवी साखळी तयार करून आई हा शब्द साकारून सर्व महिलांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या.
जळगाव : प्रतिनिधी भादली बुद्रूक येथील पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंदिराची दुरुस्ती करून जीर्णोद्धार केला जाणार आहे. पंचायत समितीच्या सेस फंडातून सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून, त्याचेही भूमिपूजन झाले. सरपंच मिलिंद चौधरी, पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी, उपसरपंच मीराबाई कोळी, गोपाळ ढाके, पोलिस पाटील ॲड. राधिका ढाके, मुरलीधर महाराज रडे, माजी सरपंच मनोहर महाजन, राजेंद्र चौधरी, उपसरपंच मीराबाई कोळी, पूजा नारखेडे, संदीप कोळी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी गेल्या 52 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम केलेल्या अडकमोल परिवार यांचे सार्वजनिक,समाजिक काम पाहता त्यांना राजनंदिनी महिला संस्था जळगावकडून सन 21-22 साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांना समाजभुषण पुरस्कार महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ.मिलिंद बागूल, हैदर तडवी,ईश्वर मोरे,सौ.संदिपा वाघ,ज्ञानेश्वर वाघ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी अनिल अडकमोल यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्य देऊन सन्मान करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना अनिल अडकमोल यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षापासून अडकमोल परिवार हा सामाजिक,राजकीय जीवनात योग्यरित्या काम करीत आहे त्यात प्रमुख्याने शहरातील समतानगर ही वस्ती वसवून याठिकाणी…
पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील परधाडे येथे अनोखा वािवाहसोहळा पाहायला मिळाला. या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे, यामधील विक्रम व राजश्री हे दोघं वधू-वर हे दृष्टीहिन आणि दिव्यांग होते. यामुळेच हा विवाहसोहळा या भागातील सर्वांसाठी विशेष ठरला. या लग्न सोहळ्यावेळी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवीत अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी वधू-वरांचे दृष्टीहिन आणि दिव्यांग बांधवांनीही यावेळी उपस्थिती लावली होती. नशिबाने आयुष्यात अंध:कार भरला असला तरी जिद्दीने आयुष्यात ते यशस्वी झाले. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. पुणे येथील विक्रम या दृष्टीहिन तरुणाचा विवाह परधाडे येथील राजश्री या दृष्टीहिन तरुणीशी झाला. विक्रम हा एम.ए. झाला असून युनियन बँकेत…
चोपडा : संदीप ओली चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश असलेल्या यावल तालुक्यातील मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा नाशिक विभागांतर्गत राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत (सन 2021-22) पर्यटन विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव र. ज. कदम यांनी दिलेला आदेश जळगाव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांना नुकताच (11 फेब्रुवारी 2022) प्राप्त झाला. त्यामुळे मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा पर्यटनस्थळ विकास होण्याचा मार्ग सुकर बनला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाठविलेला प्रस्ताव व…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यासभेत पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी राजेश गोविंद जाधव, उपाध्यक्ष म्हणून प्रा.आशिषकुमार प्रभाकर चौधरी व जयंत श्रीकृष्ण जोशी (वरणगाव), कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद रामदास चौधरी, सचिव किशोर माधवराव पाटील, सहसचिव नरेंद्र विश्वनाथ भोई (वरणगाव), खजिनदार सचिन लोटन सुर्यवंशी (धरणगाव), सल्लागार प्रा.संजय भिकाजी पवार (पारोळा), प्रवीण वसंतराव पाटील, सदस्य योगेश शशिकांत सोनवणे व सचिन सोपान चौधरी यांचा समावेश आहे. यांप्रसंगी शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत व विविध गटात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यात मल्लखांब खेळाचा प्रचार व प्रसार करून…
मुबई : प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे. विधानसभेत ओबीसी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक मांडण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचे काही अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत. प्रभागरचन, आरक्षण ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ आता निवडणुका घेण्याचे अधिकार असतील. आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही. निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारनं त्यांच्याकडे घेतले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्या एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाकडे आता फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवण्यात आले आहेत. प्रभाग रचना करणं,…