राज्य नाट्य स्पर्धा जळगाव : हेमंत काळुंखे केंद्रावरील राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धेचा समारोप काल झाला.जळगावच्या युवा ब्रिगिडीअर्स बहुउद्देशिय फाऊंडेशनने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तरुणींच्या जोडीदार निवडीच्या विषयावर प्रकाशझोत टाकणारे ‘फक्त चहा’ हे नाटक सादर करुन लेखक व दिग्दर्शक आकाश बाविस्कर व त्यांच्या टीमने अपेक्षित उंची गाठण्याचा जो प्रयत्न केला तो निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय. प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांचे एकच स्वप्न असते की तिला तिचा जोडीदार सुयोग्य मिळावा. तिचे वय, शिक्षण पूर्ण झालं की तिने लवकर लग्न करणे. मात्र, आजच्या आधुनिक मुलींची इच्छा ही त्यांच्या शिक्षणाचा उपयोग स्वावलंबी बनण्यात आणि तिच्या विचारांशी जुळणाऱ्या मुलाशी लग्न करण्यात असते. प्रतीक्षा ही स्वतःवर प्रेम…
Author: Saimat
यावल : प्रतिनिधी यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्चा सभागृहात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविद्र पाटील , जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थीतीत अतुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रवक्तेपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी उपास्थीत होते.
मुंबई:प्रतिनिधी ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 लाख (बारा कोटी त्र्यान्नव लक्ष फक्त) रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दि. 16 व 17 मे, 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच राज्याच्या काही भागात जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी 93 लक्ष रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासननिर्णय दिनांक ७ मार्च २०२२ रोजी महसूल…
मुंबई प्रतिनिधी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी महाजन व जनक व्यास यांच्या जनहित याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. इतकंच नाहीतर महाजन यांनी कोर्टात भरलेले दहा लाख रुपये आणि व्यास यांनी भरलेले दोन लाख रुपयेही हायकोर्टाने जप्त केले आहेत. खरंतर, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिकेवर आज कोर्टाकडून सुनावणी करण्यात आली आहे. याआधीही मुंबई हायकोर्टाने भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या हेतूवर शंका उपस्थित करतानाच, महाजन यांना सुनावणी हवी असल्यास आधी १० लाख रुपये जमा करण्याचे…
दिल्ली- रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील अनेक नागरिक युक्रेनमध्ये फसले आहते. भारत सरकार ने आपल्या नागरिकांना आपल्या मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ राबवत आहे. ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थी तसेच नागरिकांना भारतात परत आणले आहे. भारताने फक्त भारतीय नागरिकांनाच युक्रेनबाहेर न काढता पाकिस्तान, नेपाळ या देशांतीलही नागरिकांची सुटका केली व नऊ बांगलादेशी नागरिकांना नुकतेच युक्रेनमधून बाहेर काढले आहे, या उत्कृष्ट कामगिरी बदल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या आधी ही भारताने नेपाळ,पाकिस्तान या देशातील नागरिकांना सहायता केली आहे. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये पाकिस्तानी विद्यार्थिनीनी संघर्षग्रस्त भागातून…
यावल (सुरेश पाटील) इयत्ता बारावी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असल्याने परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू आहे किंवा नाही याची चौकशी व पाहणी करण्याकामी यावल येथील बीआरसी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी “धनके” हा बेकायदा आणि बेकायदेशीरपणे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शिक्षण संस्थेचे म्हणजे डिएन कॉलेज मध्ये गेल्याने याबाबत यावल पंचायत समिती सदस्यांच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांच्याकडून संतापजनक चर्चा करण्यात आली या धक्कादायक कृत्याला बीआरसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मीटिंगमध्ये दुजोरा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत काल दि.8 रोजी शिक्षण विस्तार अधिकारी “धनके” यांना कोणताही अधिकार नसताना परीक्षा केंद्रावर तसेच इतर कार्यालयीन कामकाज…
निंभोरा ; प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निंभोरा येथे बस स्टँड एरिया ढाके वाड्यात शेजारील महिलांना आमंत्रित करून महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे यांनी आपल्या माते समवेत ज्येष्ठ महिला भगिनी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आपल्या मनोगतात त्यांनी महिलांचे अधिकार महत्व काय आहे हे पटवून सांगितले यावेळी ज्येष्ठ महिला शांताबाई पाटील उर्फ अक्का सुभद्रा कोंडे, सिंधुबाई शेलोडे, करुणा ढाके, इंदुबाई ढाके, वत्सलाबाई दोडके, कमल मनुचारी, सरला चौधरी, चारुलता नेहते, शारदा चौधरी, सविता पाटील, आरती आखरे, ममता भंगाळे, हर्षा कोळंबे यांनी उपस्थिती दिली कार्यक्रमाचे आभार चारुलता नेहते यांनी मानले.
अमरावती : वृत्तसंस्था एकाच विहरीत दोघा भावांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत मृतदेह सापडले होते. प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. दोघा भावांचा अपघात झाला, त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी पोलिसांचा तपास सुरु आहे. आत्महत्या, घातपात की अपघात? प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. मात्र दोघा भावांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात झाला की त्यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील कुसुमताई फाऊंडेशन (निस्वार्थ अन्नसेवा) जळगाव शहरातील रस्त्यावरील निराधार आजी-आजोबा व गरीब गरजूंना रोज भुक क्षमविण्याचे काम 5 वर्षापासून सतत करत आहे. अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. याकामाची दखल घेवून रत्नागिरी येथील जय मल्हार सामाजिक चॅरिटी ट्रस्टच्यावतीने जागतिक महिलादिनी सुप्रसिध्द अभिनेत्री किशोरी अंबिके यांच्या हस्ते राज्यस्तरीय 2022 चा रत्नदुर्गकोकण रत्न पुरस्कार मॅडेल, ट्रॉफी, प्रशस्ती पत्रात मानाचा फेटा शाल देवून गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.