Author: Saimat

प्रतीनिधी  भडगाव कजगाव ता.भडगाव पंचायत समिती भडगाव श्री. माताजी चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगांव प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव तर्फे सावित्रीच्या लेकी चा सन्मान दि.१३ रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता मान्यवरांच्या उपस्थितीत कजगाव सह परिसरातील २५० महिलांचा पुष्पगुच्छ ट्राफि देऊन सन्मान करण्यात आला भडगाव पंचायत समिती, श्री.माताजी चॅरिटेबल ट्रस्ट व कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सावित्रीच्या लेकीचा सन्मान यात कजगाव प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावातील सन्मान सोहळ्यात आशा स्वयंसेविका, बचत गटांच्या महिला,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सह कोरोना काळात काम करणाऱ्या महिला सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते  पुष्पगुच्छ, ट्राफि देऊन गौरविण्यात आले प्रसंगी अनेक…

Read More

प्रतीनिधी भडगाव  कजगाव ता.भडगाव कजगाव चे मंडळ कार्यालय तलाठी कार्यालय तसेच पोलीस मदत केंद्र यांच्या उडणाऱ्या छताला दगडा चा सहारा घेत छत वाचवावे लागत आहे मोडकळीस राज्यआलेल्या या वास्तू च्या जागी नवीन वास्तू उभारण्यात यावी अशी मागणी केली जात आहे कजगाव हे परिसरातील पन्नास खेड्याचे व्यापारी केंद्र मोठी बाजारपेठ असल्याने सदैव येथे यात्राच भरते अशा या महत्वपूर्ण गावात तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय, पोलीस मदत केंद्र हे एकाच वास्तुत कार्यरत आहे मात्र सदर ची वास्तु हि पुर्णपणे मोडकळीस आली आहे वास्तविक पाहता मंडळ कार्यालय व तलाठी कार्यालय हे दोघ कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे या ठिकाणी महत्वाचे कागदपत्रे असतात मात्र या कार्यालया…

Read More

भडगाव प्रतीनिधी : अमीन पिंजारी तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व भडगावचे पञकार अशोक महादु परदेशी यांना आदर्श पञकार समाजभुषण जिवन गौरव पुरस्कार महाराष्टृ राज्य या राज्यस्तरीय पुरस्काराने शिवमल्हार गड भोर. जि. पुणे येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मानपञ व मानाची मल्हार पगडी या मराठमोळया सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार शिव मल्हार गड, शिवमल्हार प्रतिष्ठान व वाघ्या मुरळी परीषद महाराष्टृ राज्य यांच्या मार्फत प्रदान करण्यात आला. शिव मल्हार गड भोर जि. पुणे येथे दि. २ मार्च २०२२ रोजी महाशिवराञीच्या दुसर्या दिवशी आयोजीत शिव मल्हार महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पञकार अशोक परदेशी यांचे सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.…

Read More

मुंबईः प्रतिनिधी देशातीलच नाही तर जगात औद्योगिक क्षेत्रात ज्या घराण्याचा दबदबा होता ते घराणे म्हणजे अंबानी. धीरुभाई अंबानींचा आदर्श घेणारे अनेक उद्योजक आजही वेगवेगळ्या देशात आहेत. मात्र आता अंबानी बंधूमधील धाकटे बंधू अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल कंपनी कर्जदार झाली आहे. गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यासाठी सरसावल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून बोली लावण्याची तारीख 11 मार्च ते 25 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरेदीसाठी या कंपन्या सरसावल्या अंबानीच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीला खरेदी करण्यासाठी वर्दे पार्टनर, मल्टिपल फंड, निप्पॉन लाइफ, जेस्सी फॉलॉवर्स, ब्रूकफिल्ड, अपोल्लो…

Read More

सोयगाव : प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात उन्हाची दाहकता वाढू लागल्याने तसेच पाझर तलाव, कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी सोयगाव वनविभागाकडून सोयगाव वनपरिक्षेत्रामधील पाणवट्यामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या वन्यप्राण्यांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाझर तलाव कोरडे पडलेल्या वनक्षेत्रामध्ये पाणवटे भरण्यासाठी तत्परता दाखवून आपल्या परिक्षेत्रात येणाऱ्या बहुतांश ठिकाणी पाणवटेमध्ये पाणी भरून वन्यप्राण्यांच्या तहानेचा प्रश्न सोडविला आहे, जरंडी शिवार, बहुलखेडा शिवार याठिकाणी पाणवटे मध्ये पाणी सोडण्यात आले असून ज्या ठिकाणी पाणवटे नाहीत अशा ठिकाणी लवकरच पाणवटे तयार करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी माहिती दिली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ व सहायक वनरक्षक सिल्लोड पुष्पा…

Read More

सोयगाव : प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ला व अजिंठा लेणी परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय पर्यटन विकास योजनेतून 5 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून याबाबत तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघातील किल्ले संवर्धन व पर्यटन संख्येत वाढ व्हावी यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जंजाळा किल्ला, वेताळवाडी किल्ला, घटोत्कच लेणी, अजिंठा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जळगांव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटरसायकल चालकाने स्पीडब्रेकर समोर आल्याने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 06 ए.एफ.6388 काळ्या रंगाची ह्या वाहनाचे चालकाकडून ब्रेक न लागल्याने मोटरसायकल चालकास वाचविण्यासाठी विजेच्या खांबाला धडक देऊन मोटरसायकल चालकाचे प्राण वाचविले या दरम्यान चारचाकी मधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. खांबाला वाहनांची धडक लागल्याने चारचाकी वाहनाचे अंदाजे एक लाख रुपये पर्यतचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक नियंत्रणात आणून सुरळीतपणे सुरू केली.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील हरी ओम नगर जवळील नाल्यात आज सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. याबाबत सविस्तर असे की, शिवाजी नगर परिसरातील दत्तात्रय नगरातील रहिवासी गजानन मोहन पवार (वय 41) हे गेल्या 7 तारखेपासून घरातून कुणाला काही एक न सांगता निघून गेले होते. परिवारातील सदस्यांनी शोधले असता सापडले नसल्याने त्यांनी शहर पोलीस स्थानकात हरवल्याची नोंद केली होती. मात्र आज 5 दिवसांनी पवार यांचा मृतदेह घराजवळील नाल्यात आढळला. सापडलेल्या मृतदेह बघून घात आहे की अपघात आहे हे मात्र तूर्तास सांगणे अनुचित नसेल. घटनास्थळी तात्काळ शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी पोहोचले होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील सोयो सिस्टिम्स प्रा.लि.चे संचालक किशोर ढाके यांचे वडील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सेवा निवृत्त शिक्षक डालू कृष्णा ढाके (वय ८३) यांचे आज रोजी दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सुन, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या जळगाव येथील नेरीनाका स्मशानभूमीत अंतिमसंस्कार होणार असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरुन दि. १३ रोजी १० गजानन हाऊसिंग सोसायटी, चर्च जवळ, येथून सकाळी ९ वाजता निघेल.

Read More

सोयगाव : प्रतिनिधी संभाजीनगर समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कुटर मंजूर केल्या होत्या त्यानुसार जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या हस्ते व समाज कल्याण सभापदी मोनालीताई राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांना मंजूर करण्यात आलेल्या ७० तीनचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते संभाजी नगर समाज कल्याण सभापती मोनाली राठोड व संभाजी नगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या प्रयत्नातून तीनचाकी स्कुटरची मंजुरी मिळाली व स्कुटरचे वाटप देखील झाले. यामुळे समाधानी असलेल्या दिव्यांग बांधवांनी संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र…

Read More