जळगावःप्रतिनिधी येथे दि.11 मार्च पासुन ॲग्रोवर्ल्ड कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानावर दि.11 ते 14 मार्च दरम्यान हे कृषिप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कृषी विस्तारात सहा वर्षांपासुन प्रभावी ठरलेल्या ॲग्रोवर्ल्ड जी.एस.ग्राऊंडवर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.कृषी प्रदर्शन मोफत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे. चार एकरच्या परिसरात 220 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँके, प्राजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल, जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड य प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, ऱ्हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन…
Author: Saimat
महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आठ नाटके सादर झालीत.या टप्प्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मध्यप्रदेशातील इंदौरच्या नाट्यसंपदाने सादर केलेले ‘डेहूळ’ हे नाटक सर्वांगसुंदर झाल्याने सरस ठरल्याचे जाणवले.त्यामुळे या स्पर्धेत चुरस निर्माण झाली व पहिल्या टप्प्यात चांगली नाटके सादर करणाऱ्या जळगाव शहरासह जिल्ह्यातील संस्थांना व हौशी कलावंतांना बरेच काही शिकायला देखील मिळाले.स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर नाट्य स्पर्धा जवळ आल्यानंतर तालीम करून केवळ चालणार नाही तर नाटकाचा ध्यास हा वर्षभर घ्यायला हवा व त्यादृष्टीने सातत्याने कार्यरत रहावे, असा संदेश जणूकाही या स्पर्धेने दिला. दुसऱ्या टप्प्यात 28 फेब्रुवारी रोजी मु.जे. महाविद्यालयाच्या स्वायत्त विभागाने ब्लडी पेजेस,1 मार्च रोजी नाट्य भारती इंदूरचे श्रीराम…
जळगावःप्रतिनिधी एका 16 वषर्भय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. नराधमाने पिडीत मुलीचे फोटो सोशल मिडीयवर व्हायरल करण्याचे तसेच वडीलांना ठार मारण्याची देखिल धमकी दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकरणी औद्योगीक वसाहत पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक असे की, शहरातील रहिवासी 16 वर्षीय मुलगी आपल्या कुटूंबासोबत वास्तव्यास आहे. डिसेंबर 2020 मध्ये शहरातील एका मार्केट मध्ये पिडीत काप्ाडे खरेदी करण्यासाठी गेली होती. तेथे दिपक सोनवणे(पूर्ण नाव माहित नाही) या मुलाशी तीची ओळख झाली. यानंतर मुलीला काही न काही कारण सांगत शहरातील फुले मार्केेट मध्ये बोलावून तिच्यावर अतयाचार करीत असलय्ाचा प्रकार घडला.…
जळगावः प्रतिनिधी येथील नीलकमल हॉस्पिटलकडून 8 ते 16 मार्चदरम्यान किडनी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतलेले डॉ.मनोज टोके या किडनी सुरक्षा सप्ताहात रुग्णांच्या तपासण्या आणि उपचार करीत आहेत. या विशेष सप्ताहात रुग्णांसाठी नाममात्र 100 रुपये नोंदणी शुल्क असून शुगर, क्रियाटिन आणि लघवी तपासणी मोफत केली जात आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत रुग्णांची तपासणी केली जात आहे. नीलकमल हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्याखाली आणि चेहऱ्यांवर सूज दिसणे, हात आणि पायांना मुंग्या येणे, भूक कमी लागणे, मळमळ होणे, उच्चं रक्तदाब, साखर नियंत्रणात नसणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी…
धानोरा, ता. चोपडा : प्रशांत चौधरी संपुर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या हा होय, वर्षभर काबाड कष्ट करुण भोंगऱ्या सणानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार, ह्या तीन जिल्हयातील आदिवासी बांधव एकत्र या सणानिमित्त येत असतात. वाडया- वस्त्यांवर तरुण -तरुणीसह आबाद वृध्द ढोलला ताशांच्या तालावर ब बासरी च्या सुरांनी धुंद होऊन ‘ भोगऱ्या आया रेभाया, चालु ,चालू रे भोंगऱ्या देखांन चालु, अशी लोकगीते सादर करतात, आणी भोंगऱ्या सणाचा मनमुराद आनंद लुटतात. दोन वर्षापासुन कोरोना संकट असल्यामुळे भोंगऱ्या बाजार भरत नव्हता मात्र यंदा मोठया उत्साहात भोंगऱ्या बाजारसाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत. आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत आवडता व मन…
मलकापूर:सतीश ढांगे 10/3/22हरियाणा येथे होणार असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय सिनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सह्भागी होण्यासाठी विदर्भ महिला कबड्डी संघ चारकी दादरी हरियाणा करीता गंगानगर एकस्प्रेस रेल्वेने रवाना झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी विदर्भ महिला कबड्डी संघातील सदस्यांचे त्यांच्या प्रशिक्षकासहित मलकापूर येथील रेल्वे स्थानकावर पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते इंजिनीरिंग कॉलेजच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व पुढील यश मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या प्रसंगी त्यांना भोजनाचे पार्सल व पिण्याचे पाणी देण्यात आले. तसेच या ठिकाणी संघाचे प्रशिक्षक प्रदीप सेलूकर सर, आणि विदर्भ कबड्डी असोसिएशन चे सहसचिव सतीश डफले सर यांचाही पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. विशेष…
मलकापूर सतीश ढांगे येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंञालय व जिल्हाधिकारी बूलडाणा यांचे अादेशाने दिव्यांग व्यक्तींना संगणकीया प्रणालीद्वारे अाॅनलाईन प्रमाणपञ व वैश्र्विक ओळखपञ(UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी मलकापूर तालूक्यात अंध मूखबधिर कर्ण बधिर मनोरुगण अस्थिव्यांग सर्व दिव्यांग व्यत्किंना कळविण्यात येत आहे. येथील उपजिल्हा रुग्णाल्य मलकापूर येथे येणारी 16 मार्च 2022 ला सकाळी 10 वाजता अपंग तपासनी शीबीराचे अयोजन करण्यात आले आहे.यासाठी मलकापूर तालूक्यातील दिव्यांग ज्यांचे अाॅलाईना अपंग प्रमाणपञ बनलेले नााही त्यांनी मलकापूर काॅटेज हास्पिटल येथे येणारे विशेष तज्ञां डाॅक्टर कळून आपली तपासनी करुन शीबीराच्या लाभ घ्यवा असे अहवान अपंग जनता दलचे राज्य सचिव…
मुंबई : गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील मतमोजणीचे निकाल आज जाहीर होत आहेत. पहिल्या फेरीच्या निकालात गोवा आणि उत्तरप्रदेशातही शिवसेनेची पीछेहाट होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मतमोजणीविषयी भूमिका मांडली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेच्या एंट्रीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांच्या गोव्यातील प्रचारानंतर त्यांनी गोव्यात शिवसेनेचे खाते उघडण्याचा विश्वास व्यक्त केला होता. ही बातमी पण वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार मी मतमोजणी पाहत आहे. पोस्टल बॅलेटवर जाऊ नका. दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पंजाबमध्ये आप पुढे आहे, उत्तराखंडमध्ये टक्कर सुरू…
जळगाव – लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ हा सेवाकार्याचा मेळावा येत्या १२ ते १४ मार्च २०२२ दरम्यान सागर पार्क येथे संपन्न होणार असून त्यात या वर्षी नवीन संकल्पनांना समाविष्ट करण्यात आले आहे . स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच या वर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, करमणूक आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. हेल्प फेअर हा असा सोहळा आहे जिथे विविध सेवाभावी संस्था , गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी जागतिक वारसेचे जतन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अजंठा लेणीचे संवर्धन करायला हवे कारण अजंठा लेणी एक जागतिक अनमोल ठेवा असल्याचे प्रतिपादन डॉ. पी. एस. प्रेमसागर यांनी केले. ते मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय व प्राध्यापक प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अजंठा लेणी एक जागतिक वारसा’ या विषयावरील व्याख्याना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर एच. ए.महाजन आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए. पी. पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्रेमसागर यांनी आपल्या व्याख्यानातून जागतिक ख्यातीचे पर्यटन स्थळ ‘अजंठा लेणी’ विषयी आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अजंठा लेणी…