जळगाव : प्रतिनिधी शहरातील केळकर मार्केट परिसरातील कापड दुकानांना शार्टसर्कीटमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना रात्री घडली आहे. याआगीत किमान लाखो रूपयांचे कापड जळून खाक झाले आहे. याठिकाणी अग्निशमन बंबाच्या पथकाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते. जळगाव शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेश मार्केट मधील कापड दुकानांना शुक्रवारी ११ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. यात मार्केटमधील राजेश मोतीरामानी व गिरीश मोतीरामानी यांचे सारीका साडीया, सारीका टॉप, सारीका टेक्सटाईल दुकानात कापड, साडी व लेडीज ड्रेस यांना मोठ्या प्रमाणावर आग लागली. यावेळी महापालिकेचे अग्निशमन विभागाचे तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचे काम सुरू…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी शहरातील लक्ष्मी नगरातील ३२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात ११ मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत हा लक्ष्मी नगरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. शुक्रवार ११ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण खालच्या घरात असतांना प्रशांतने वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. खोली बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. प्रशांतने आत्महत्या केल्याची मोठा भाऊ हेमंत मांडोळे याच्या लक्षात आले. आईवडील व नातेवाईकांनी आक्रोश केला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…
जळगांव प्रतिनिधी इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार- 2021 गौरवण्यात आल्याने यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नसीम अन्सारी यांनी पवित्र कुराण पठणाने केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. इकबाल शाह हे होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस यांनी प्रस्तावना केली. इकरा युनानी मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, इकरा डी.ऍड. कॉलेज चे प्राचार्य प्रो. सईदा वकील, इकरा बी.ऍड. कॉलेज चे प्राचार्य प्रो. इरफ़ान शेख, . इकरा रेसिडंशियल पब्लिक स्कुल चे हेडमास्टर काझी जमिरुद्दीन आणि शिक्षक़ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ.अब्दुल…
मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. विकासाची पंचसुत्री राबविणार असून कृषी क्षेत्र आपल्या विकासाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोल डिझेलवरील कर कमी न केल्याने सामान्यांना दिलासा मिळाला नाही. परंतू घरगूती वायू वापराला प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक वायुवरील मुल्यवर्धित कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजीचे दर कमी होणार आहे. हा एकप्रकारे जनतेसाठी दिलासा ठरणार आहे. सोबतच सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्पात विकासाची पंचसुत्री राबविणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगीतले. राज्य कर कायद्याअंतर्गत दहा हजारांची थकबाकी रक्कम माफ करणार…
मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या अर्थसंकल्पामधून २०२२-२३ वर्षासाठी महिला आणि बालकल्याण विभागासाठी २ हजार ४७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून. एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e – शक्ती योजनेतून राज्यातील एक लाख ३० हजार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक महिलांना मोबाईल देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली . त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. -0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रु वरून 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी…
मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख ) महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्याला एक पाऊल पुढे नेणारा आहे. समाजितल प्रत्येक घटकला यात सामावून घेण्याचा यात प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगीतले. विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते . यावेळी अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगितले की भूविकास बैंकेच्या 985 कर्जदार शेकर्यांचा 7/12 सरकार ने कोरा केला असून भूविकास बँकेच्या जमिनी इमारती सरकार ने ताब्यात घेतल्या आहेत . शेततळ्याना 50 हजार ऐवजी75 हजार रुपये अनुदान सरकार देणार आहे . ग्रामसडक योजनेच्या मर्यादेत वाढ केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले ,…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये भारती लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळल आहे. या हेलिकॉप्टरमधील पायलट आणि को-पायलट मात्र बेपत्ता आहेत. गुरेज भागात गुजरा नाला भागात हे हेलिकॉप्टर गस्तीवर होते. हिमाच्छादीत भागात हे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. https://twitter.com/ANI/status/1502195313238745088?s=20&t=vutQ-Za2dP5F4pgi0WOUXA हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. पायलय आणि को-पायलटचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पायलट आणि को-पायलट सुरक्षित बाहेर पडल्याचं बोललं जात आहे. पण अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
जळगावः प्रतिनिधी जिल्हातील वयोवृध्दा इसमांना गाठुन त्यांना मोटारसायकलवर बसवुन त्यांचा कडील पैसे व सोन्याचे दागिणे जबरी हिसकावून घेणारा संशईत आरोपीस एमआयडीसी पोस्टे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक श्री प्रविण मुंडे सो., जळगाव जिल्हा यांचा कडुन जळगाव शहरात तसेच जिल्हात इतर ठिकाणी अज्ञात इसमांना कडुन वयोवृध्द इसमांना गाठून त्यांना गाडीवर बसवून त्यांचा कडील पैसे व सोन्याचे दागिणे जबरी हिसकविण्याबाबत गुन्हा दाखल झाले आहे. सदचे गुन्हे उघडकिस आणण्याकामी पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे एमआयडीसी पोस्टे जळगाव यांना आदेश देण्यात आले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांनी एमआयडीसी पोस्टे मधील शोध पथकातील कमर्चारी विकास मारोती सातदिवे, पोना सुधिर संजय साळवे, पोना…
भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील रेल्वे हायस्कूल मागे असलेल्या रेल्वे फिल्टर हाऊस नजीक अनिल नगर (मूळ रा.पाळधी ता. धरणगाव) मधील रहिवासी लक्ष्मीबाई प्रल्हाद नन्नवरे(वय 78) यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून त्या काँग्रेसचे कार्यकर्ते तथा न्हावी अनुराधा इंडियनचे संचालक शैलेंद्र नन्नवरे व भाजपचे कार्यकर्ते अनंतकुमार नन्नवरे यांच्या मातोश्री होत.