Author: Saimat

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे, निवडणुकीत एकूण १३ जागांसाठी ३७ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी शिवसेना कट्टर समर्थक असलेल्या एका व्यक्तीस ३ अपत्य असल्याच्या कारणाने त्यांच्या विरुद्ध ८ जणांनी लेखी पुरावे सादर करून निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे लेखी हरकत घेतली होती. त्यानुसार तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून विश्वनाथ धोंडू पाटील या व्यक्तीचे नामनिर्देशनपत्र सहाय्यक निबंधक एस. एफ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी डी.जे.तडवी यांनी अवैध ठरविले. तिसरे अपत्य असल्याने नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्याचा निर्णय दि.१७ मार्च रोजी होळीच्या दिवशी सहकार कायद्यानुसार देण्यात आल्याने शिवसेनेला राजकीय होळीचा कायदेशीर चटका बसल्याचा…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील मेहूणबारे परिसरात खळबळजनक घटना उघडकीस  आली आहे. पतिने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालत खून केल्याची घटना घडली आहे. निनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी संशयीत आरोपी  कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहीती अशी की, मध्यप्रदेशातील मोहरतमाळ येथील असलेले  पावरा दाम्पत्य गेल्या वर्षांभरापासून मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात सालाने काम करतात. शेतातच एका शेडमध्ये ते राहत होते. काल रात्री  कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले आहे. असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर २ जणांवर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये  तरूणावर कोयत्याने  वार करन तो गंभीर जखमी झाला आहे तर दुस-या तरुणाने जीव मुठीत धरून रुग्णालयात पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. सुरेश विजय ओतारी (वय २८) आणि अरुण भीमराव गोसावी (वय ४७) दोन्ही रा. तुकाराम वाडी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचाराकामी आले होते. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर गेल्यावर गेटच्या समोरच त्यांच्यावर भूषण माळी व अन्य पाच ते सहा जणांनी धारदार कोयता, लाकडी बल्ल्या व अन्य धारदार शस्त्राने वार करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत असे की, सुरेश ओतारी व अरुण गोसावी…

Read More

अमृतसर : वृत्तसंस्था ‘आम आदमी पार्टी’कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर झाली आहे. हरभजनला राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पंजाबमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेवर आले आहे. हरभजन सिंगकडे क्रीडा विश्वविद्यालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधरमध्ये क्रीडा विश्वविद्यालय बनवण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या 117 पैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. हरभजन सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने आम आदमी पार्टी आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

Read More

पुणे : वृत्तसंस्था  गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात काश्मीर फाईल चित्रपट गाजू लागलाय. त्यावर दोन्ही बाजुने चर्चा आणि वाद सुरू झालेत. काहींचं म्हणणं आहे की या चित्रपटात अर्धवट इतिहास दाखवलाय. फक्त एक बाजू मांडली आहे तर काही म्हणतात हा वाद मुद्दाम वाढवला जातोय. यावर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच रहावं, द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळं जे गट पडलेत ते चुकीचे आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याने अधिकचं बोलणं उचित ठरणार नाही. एखाद्या चित्रपटावरून वाद होणं योग्य नाही. असेही…

Read More

जगात कोरोना प्रभाव कमी होत आहे, सर्व काही सुरळीत होत असतानाच आता काहीशी चिंता वाढविणारी बातमी येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या डेल्टाक्रॉनमुळे अनेक शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. हा नवा व्हायरस डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपासून बनलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने अहवाल दिला आहे, की या नवीन डेल्टाक्रॉन प्रकाराची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत. या प्रकाराची फारच कमी प्रकरणे आतापर्यंत पाहिली गेली आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञांना या नवीन प्रकाराबद्दल पुरेशी माहिती नाही. जागतिक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी येथील भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी शहरातील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले लव वामन झाडगे यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक नुकतीच भाजपाचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, भाजपा ओबीसी सेलचे अजय भोळे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, सतिष सपकाळे, रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत शहरातील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले लव वामन झाडगे यांच्या कार्याची दखल घेत सहकार क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या…

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीबाबत मंत्रालयात भरविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. या माध्यमातून सरकारच्या कामांचे अतिशय उत्तम प्रकारे मांडणी करण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मंत्रालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामांना अतिशय परिणामकारक अशा फलकांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे. आज ना. गुलाबराव पाटील यांनी या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन याबाबतची विस्तृत माहिती जाणून घेतली. सरकारच्या कामाला डीजीआयपीआरतर्फे चांगल्या प्रकारात प्रसिध्दी दिली जात असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी…

Read More