भुसावळ : प्रतिनिधी संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून केलेली भक्ती आणि भारूडातून केलेले समाजप्रबोधन यावर पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या प्रबंधाला ग्रंथरूप देत आहेत. श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून ‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भुसावळ येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेचे मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना 2012 मध्ये ‘संत एकनाथ अभंगगाथा : भक्ती विचार’ या विषयावर प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाचे ग्रंथरूप व्हावे या उद्देशाने श्री संत एकनाथ…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी धर्मरथ फाउंडेशन जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, क्रीडा सांस्कृतिक, खेळाडू व सामाजिक पुरस्कार आणि शिवव्याख्यान २०२२ जळगाव जिल्ह्यातील क्रीडा सांस्कृतिक व परंपरेचा वारसा तसेच आपआपल्या क्षेत्रातील जडणघडणी मध्ये प्रचार प्रसार करून अग्रेसर असण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधुन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रंजना पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , माजी मंत्री जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर, प्रशांत तायडे, सुजाता गुलाने यांच्या हस्ते पुरस्कार वाटप करण्यात आले. यावेळी मेहुनबारे क्रीडाशिक्षक योगेश रामराव साळुंखे, गणेश नारायण पाटील, सुनील शामराव पाटील, भूषण परशुराम…
जळगाव : प्रतिनिधी दि.20 रोजी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त जामनेरात राज्यातील मंत्र्यांची मांदीयाळी आलेली होती. या कार्यक्रमास माजीमंत्री महादेव जानकर यांनी सुध्दा विवाह समारंभास हजेरी लावलेली होती. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा क्षितीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी यांच्या निवासस्थानी माजी मंत्री जानकर यांनी भेट दिली. यावेळी वंजारी कुटूंबियांतर्फे जानकरांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच माजी मंत्री जानकर यांनी क्षितीज फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेवून कौतुकाची थाप यावेळी गजाननला दिली. या प्रसंगी माजी सैनिक किशोर ढाकने यांच्या हस्ते माजी मंत्री.माधवराव जानकर यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधानभाऊ पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष जळगाव महानगराध्यक्ष गणेश…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील तांबापुरा परिसरात १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. जगदीश सुखदेव कुडपे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने आईने एकच हंबरडा फोडला. जगदीश याच्या वडीलांचे निधन झाले असून त्याची आई मोलमजुरी करून आल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जगदीश सुरत रेल्वे मालधक्क्य़ावर हमाली काम करत होता. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी तो कामाला गेला परंतु त्याठिकाणी काम नसल्याने तो घरी निघून आला. त्यानंतर दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याने जगदीश याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी जगदीशला बघण्यासाठी त्याचे मामा भरत हटकर त्यांच्या घरी आले…
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित…
मेष : मेष राशीच्या व्यावसायिकांना नवीन ट्रेंड आणि मार्ग सापडतील ज्यामुळे त्यांची वाढ होईल. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि तुम्हाला पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवसायाच्या क्षेत्रात इतर लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायाच्या संदर्भात महत्त्वाकांक्षी योजना सुरू करता येतील. जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे असेल तर तुमची निराशा होणार नाही. अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, नवीन घर खरेदी करू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल.…
आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, प्रत्येक जण घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहातो. अशावेळी जर तुम्हाला तुमचे ड्रीम होम स्वस्तात मिळाले तर तुमचा आनंद दुप्पट होऊ शकतो. घर खरेदी करू पहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशीच संधी बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) उलब्ध करून दिली आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने बँकेकडे गहान असलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव येत्या 24 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही देखील या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या हक्काचं घर किंवा दुकान खरेदी करू शकता. 24 मार्चला बँक ऑफ बडोदाच्या वतीने थकबाकिदारांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही देखील तुमच्या बजेटनुसार बोली…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यासह शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड येत असते. यातच जिल्ह्याचे पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार, नगरसेवकांनी आपापल्या गावात होळी सोबतच धुलिवंदन उत्साहात रंगून जात साजरे करून रंगीबेरंगी वातावरण निर्माण केले होते. राज्यात विविध टोकाला गेलेले गचाळ राजकारण मात्र धुलिवंदनाने धुवून निघाले आहे. जळगाव जिल्ह्यासह शहरातील पालकमंत्र्यांसह विविध पक्षाचे नेते तसेच आमदार-खासदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदार संघात नागरिकांना विविध रंगीबेरंगी लावून धुलिवंदनाची रंगत वाढविली.यामध्ये शिवसेनेची मुलुख मैदान तोफ तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी होळीच्या दिवशी होळी दहन करून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या तर खासदार उन्मेश पाटलांनी चाळीसगाव येथील निवासस्थानी नागरिकांसह परिवारासोबत रंगपंचमीचा आनंद लुटला. शहराचे आ.राजुमामा भोळे…
धानोरा ता. चोपडा : वार्ताहर धानोरा ते पेरणापीठ ( अहमदाबाद गुजरात ) त्यांची सुरुवात आज सकाळी धानोरा गावा पासुन झाली. दि १९मार्चे ते 0२ एप्रिल पर्यंत ही पदयात्रा आहे .परमात्याकडे स्वःत ह पायी चालत गेले पाहिजे ही श्रध्दां अंगी बाणून धानोरा सह इतर गावाहुन आलेल्या पदयात्रींनी व्यक्त केली. या पदयात्रेत सर्वसमाजातील लोक सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन होत असते.परम पुज्य महामंडेलेश्वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज ( फैजपुर संस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली या पदयात्रेची सुरुवात सन २००९पासुन करण्यात आलेली आहे, सुरुवातीला यांनी ही पदयात्रा सुरत ते पेरणापीठ अशी पाच वर्ष सुरु केली होती. या पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे…