मुंबई :- शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा असावी ही शासनाची भूमिका आहे. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. जर बाजार समितीमध्ये शेतमाल दिला तर यात फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मोठे असून शेतमालाच्या व्यापार वृद्धीसाठी कायदा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत 97 अन्वये सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या आपत्कालीन चर्चेला उत्तर देताना सहकार व पणन मंत्री श्री. पाटील बोलत होते. राज्यात पणन कायदा हा 1960-61 पासून सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा माल विक्रीला येताना त्यांना हक्काच्या बाजारपेठेत योग्य तो दाम मिळाला पाहिजे…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 26 मार्च व सोमवार दि. 28 मार्च 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यात राबविली जाणारी अटल भूजल योजना, या योजनेचे महत्त्व, तिची सद्यस्थिती आणि उद्दीष्ट याविषयी सविस्तर माहिती या मुलाखतीतून देण्यात आली आहे.
????️ हिंदू नववर्ष तथा आपला पहिला सण शालिवाहन शके 1944 चैत्र शु.1 शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा… ????????चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवस्तराचा आरंभ होतो, प्रत्येकाने आपल्या घरी ध्वजारोपण करावे, निंब पत्राचे भक्षण,वर्ष फळाचे श्रवण, नवरात्र ला आरंभ या दिवशी तैलभ्यंग करावे. ???? 4 महिन्यापर्यंत जलदान करावे,पाणपोई सुरु करण्यास असमर्थ असेल त्याने उदकाने कुंभ भरून वेदोक्त ब्राम्हणाच्या घरी द्यावा. ????गुढीपाडवा ला करावयाचे उपाय… ????️ग्रंथात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा ज्या वारी आला त्या वारा संबंधित देवतेचे पूजन करावे म्हणजे संपूर्ण वर्ष चांगले जाते. म्हणजे 2 तारखे ला शनिवार ???? शनिवार हा हनुमानाचा आवडता वार… म्हणून हनुमानाची पूजा.. शनि देवा ची पूजा,…
कलजगाव ता.भडगाव : अमीन पिंजारी ऑनलाईन प्रणालीचा घोळ वीज वितरण चे बिल वसुली चे उद्दिष्ट या धोरणामुळे कजगाव सारख्या मोठ्या गावाचा पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांचा पाणीप्रश्न उभा ठाकला असल्याने वीज वितरण बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन महिला सरपंच ला सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सरपंच वैशाली पाटील केला आहे. बाबत वृत्त की शासन निर्णया नुसार ग्रामपंचायत चे खाते हे राष्टीयकृत बँकेत उघडण्यात येऊन तेथूनच ऑनलाईन प्रणाली द्वारे व्यवहार करण्यात यावे या साठी आयसीआय बँकेत खाते उघडण्या बाबत चे फर्मान शासनाने दिल्याने ग्रामपंचायत चे खाते आयसीआय बँकेत उघडण्या बाबत ची प्रक्रिया पुर्ण झाली मात्र खाते कार्यान्वित…
मुंबई : NACL घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. उद्या प्रताप सरनाईक यांनाही अटक होऊ शकते, असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. प्रताप सरनाईक यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ईडीने (ED) ही कारवाई केल्याचे आता समजते. अटक करणार… प्रताप सरनाईक यांच्या ११.३५ कोटींच्या मालमत्ते जप्तीबाबत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या साथीदाराने एनएसीएल घोटाळ्यात २१६ कोटींचा घोटाळा केला आहे. ३५ कोटी सरनाईकांच्या बँक खात्यात आले होते. या पैशातून त्यांनी टिटवाळ्याची जमीन घेतली होती. त्यामुळेच आज ईडीने ही कारवाई…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सागर पार्क मैदानाच्या पार्किंगमधून तरूणाची दुचाकी लांबवल्याप्रकरणी मार्च रोजी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादावाडी परिसरातील कल्याणीनगर येथील नीलेश बापुराव पाटील (वय ३०) हे २० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागर पार्क मैदानावर आले. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ एएम ५२७१) या क्रमांकाची दुचाकी सागर पार्क मैदानाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. काम आटोपल्यावर परत घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी नीलेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट होते ते आता संपले परंतु कोरोना काळात लॉकडाउन झाले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले तसेच लॉकडाउन काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते फक्त सरकारी नोकरदारांना पगार सुरु होते त्यामुळे आता लग्न करण्यासाठी वधू पित्याची शासकीय नोकरदारास अधिक प्राधान्य दिले जाते. यामुळे शेतमजून व रोजदारी करणाऱया युवकांना मात्र विवाह होण्यास खूप वेळ लगत आहे. त्यामुळे युवकांना मानसिक त्रास होत असल्याने काही युवक जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेताना समजून येत आहे. तालुक्यातील नशिराबाद येथे एका ३० वर्षीय तरुणाने विवाह होत नसल्या कारणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन खरोटे (वय…
मुबई : प्रतिनिधी शिवसेना नेते प्रताप सरनाईक पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनलायाच्या (ED) रडारवर आले आहेत. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार…
प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. पुण्यातील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. तसंच मागोवा आणि तात्पर्य या मासिकांचे संपादकही होते. डेक्कन जिमखाना परिसरातील त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव आज दुपारी ४ नंतर ठेवण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार केले जातील. मागोवा आणि तात्पर्य या मासिकांच्या माध्यमातून तसंच मागोवा या गटाद्वारे सत्तरीच्या दशकातल्या तरुण पिढीला मार्क्सवादी विचारांकडे वळवण्याचं कार्य केलं.