जामनेर:(प्रतिनिधी) :- भारतीय संस्कृतीत नारीला विशेष महत्व प्राप्त आहे. आपण नारी पूजन का करतो ? तर माता भुवनेश्वरी ने स्वामी विवेकानंद सारखे रत्न दिले. त्यांचे पूर्ण जगात नावलौकिक झाले. त्याच प्रमाणे माता जिजाऊने सुध्दा समस्त समाजा च्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या दिव्य पुत्राला जन्म दिला. त्यांनी हिंदूंचेच नव्हे तर सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे रक्षण व स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. माता जयवंताबाईंनी महाराणा प्रताप सारखा शूर, वीर, पराक्रमी, तेजस्वी, ओजस्वी असा सुपुत्र जन्माला घातला या सुपुत्रांना घडवण्यात आईची भूमिका सर्वश्रेष्ठ राहिली आहे. आज आमच्या आया-बहिणींनी सुध्दा मुलांना चांगले संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे. डोक्यावर केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा चांगले…
Author: Saimat
कोळगाव ता-भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे कृ.भ.को.चे दिवंगत संचालक तथा आमडदे ता.भडगाव येथील समाजकारण,राजकारणात आपला ठसा उमटवणारे स्व.आण्णासाहेब अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,ज्येष्ठ शिक्षक रामदास कुंभार,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या हस्ते स्व.आण्णासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसर स्वच्छ करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब कोळगावकर यांनी केले तर सुत्रसंचालन एस.ए.वाघ तसेच आभार प्रशांत पाटील यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
मेष : मेष राशीच्या लोकांची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त दुसरं काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत जीवनाचा उत्तम अनुभव घेऊ शकता. वृषभ : आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. मिथुन : आज तुमची संवाद क्षमता उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमासाठी हा…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी केंद्र सरकारचे कामगार कष्टकरी विरोधी धोरनाच्या विरोधात कामगार ,कष्टकरी विद्यार्थी ,युवक महिला वर्ग रस्त्यावर उतरला आहे ,कृषी कायद्याप्रमाणे संसदेत कोनतीही चर्चा न करता संपूर्ण संसदीय लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवून केंद्र सरकारने अजून एक घातक पाउल उचलले आहे ,गेल्या एक शतकापासून कामगारांनी लढुन मिळवलेल्या कामगार कायद्यांना उद्ध्वस्त करुन केंद्र सरकारने नवीन चार श्रम संहिता (कोड बिल )मंजूर करून घेतले आहेत, त्यामुळे कामगार कायदे नष्ट होऊन मालक धार्जिने कायदे अस्तित्वात आले आहे त्यामुळे किमान वेतन ,कामाचे तास ,औद्योगिक कलह ,सामुहिक वाटाघाटी ,कामगार संघटना नोंदित करण्याचा अधिकार आदी बाबतीत कामगारांच्या अधिकारावर गदा आली आहे,खाजगीकरण ,कंत्राटीकरन , महागाई ,बेरोजगारी च्या…
जळगाव ः प्रतिनिधी गौरी महाजन व सन्मुख महाजन या बहीण-भावाला राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झालेे. गौरी ही लुंकड कन्या शाळेची विद्यार्थिनी तर सन्मुख हा मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. गौरीने 14 वर्षे वयोगटात तर सन्मुखने 19 वर्षे वयोगटात राज्य-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. त्यांचा महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव : प्रतिनिधी निसर्ग मित्र समितीतर्फे उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी सहज व थंड पाणी उपलब्ध या उद्देशाने परळ वाटपाचा कार्यक्रम काल पार पडला. या प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव अक्षय सोनवणे, भाजयुमो सरचिटणीस महेश पाटील, चेतन मुथा, मदन खडे, रवी भोई, हे उपस्थित होते. नागरिकांना परळ वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी जितेंद्र बागरे, विकास वाघ यांचे सहकार्य लाभले, असे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
जळगाव : प्रतिनिधी येथील दिव्य सूर्य महिला बचत गटातर्फे बांभोरी येथील गजानन महाराज मंदिरात पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष यशवंत पाटील (अण्णा महाराज), पूष्पा पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन झाले. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा आशा वाणी, प्रतिक्षा भावसार, हिरा श्रावगी, निळकंठ वाणी, राजू फडणीस, कमलाकर फडणीस, राजू बारी आदी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा, विविधतेने नटलेला, संस्कृतीने परिपूर्ण आहे. खुदाई खिदमदगार किंवा महाराष्ट्र गो विज्ञान समिती या संस्था संस्कृती टिकवण्याचे काम करत आहेत. आज गायींची दुरवस्था झालेली दिसते. गाईच्या जमिनीवर मानवाने अतिक्रमण केले आहे. गो मातेला तिची जमीन देऊन पूर्ववैभव प्राप्त करून देऊ, असे आवाहन हरिद्वारचे स्वामी सुशीलानंद यांनी केले. जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधीतीर्थने पुरस्कृत 25व्या जमनाबेन लोकसेवक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. मालेगाव येथील महाराष्ट्र गो विज्ञान समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. खुदाई खिदमदगारचे फैसल खान, किरपालसिंह मंडलोई यांना स्वामी सुशीलानंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रमेश दाणे…
भुसावळ : प्रतिनिधी मार्चअखेर असल्याने पालिकेने थकीत गाळेधारकांवर कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत पालिकेच्या तीन व्यापारी संकुलातील 11 गाळे सील करण्यात आले. या मोहिमेत 8 लाख 60 हजारांचा कर वसूल करण्यात आला. 31 मार्चपर्यंत व त्यानंतरही ही कारवाई सुरूच राहील. पालिकेची यंदाची कर वसुली अवघी 26 टक्क्यांपर्यंत आहे. शहरात पालिकेचे 1,260 गाळे आहेत. मात्र, गाळे धारकांकडून अल्प रक्कम थकीत असूनही वेळेत भरणा होत नाही. यामुळे पालिकेने थकबाकी वसुलीची धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पालिका पथकाने शहरातील महात्मा गांधी मार्केट (डी.एस.हायस्कूल मार्केट), पालिका रुग्णालय मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील 11 गाळे थकबाकीपोटी सील केले. या कारवाईपूर्वी…
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील कसबा पिप्री येथील यांचा शिवसेनेत प्रवेश आज दुपारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते शिवबंधन धागा बांधुन भगवा रुमाल टाकून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथील गजानन राऊत, विलास भुसारी, नीलेश राऊत, नजीर तडवी, मोसिन तडवी, मस्तान तडवी, आरिफ तडवी, पुद्दिन तडवी या तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे गणेश पांढरे तुकाराम काळे मुकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते