Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंंत्राटी संघटना कृती समितीनेही दोन दिवसीय  संपाला आजपासून सुरुवात केली असून आपआपल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करुन केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. वीज कंपन्यांमध्ये कार्यरत 27 संघटना आणि कंत्राटी कामगाराच्या सर्व संघटना यांच्यावतीने दि.28 च्या शुन्य तासापासून दोन दिवसाचा संप आज सकाळपासून पुकारण्यात आला असून त्याचे पडसाद उमटले आहेत. वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणांच्या विरोधात असल्यामुळे वीज ग्राहक व सामान्य जनता यांनी या संपात सहकार्य करावे असे आवाहन कर्मचारी संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे. ऊर्जा सचिव…

Read More

जळगाव :  ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका व शास्त्रीनगर येथील रहिवासी वंदना उमाकांत मोरे यांचे २६ मार्च रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्या जिल्हा परिषद जळगाव पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुभाष सूर्यवंशी यांच्या पत्नी असून त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे.

Read More

पणजी : वृत्तसंस्था गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.

Read More

जामनेर : प्रतिनिधी कवी आणि कविता नसते तर जन्म ओसाड आणि रटाळ झाला असता असे प्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी साहित्यिक वा.ना.आंधळे यांनी केले.        जामनेर येथे स्वर्गीय दा.शा. पाटील स्मृती भवनात कवयित्री बहिणाबाई चौधरी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक  मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने  स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. त्यांनी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या  प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रारंभी सरस्वती देवी, सावित्रीबाई फुले आणि स्वर्गीय दा.शा. पाटील यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे…

Read More

प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव निसर्गाच्या अनियमित व ढगाळ लहरीपणामुळेमका पिकावर अनिष्ट परिणाम झाला असून कणीसाच्या वरील भाग हा लष्करी अंळीने मोठ्या प्रमाणात पूर्णता फस्त केला असून मका पिकावर परिणाम झाला आहे , मका उत्पादनातवर दहा ते पंधरा टक्के घट होणार आहे गणेश दुधाळ अवस्थेत असताना रानडुकरांनी पिकाची नासाडी केली व त्याच्यातच शेतीपंपाला होणारा वीजपुरवठा कमी दाबाचा तसेच मध्येच खंडित होत असल्याने शेती पिकांना पाणी भरणे कठीण होतं असून विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे , याच कारणामुळे बरोडा भागातील पिके सुकू लागली आहेत अगदी तोंड आलेले शेतीचे उत्पन्न हातचे जायला नको म्हणून शेतकरी रात्रंदिवस एक करीत आहे…

Read More

यावल  (सुरेश पाटील) यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावापासून भुसावळ कडे जाताना बंद पडलेल्या जुन्या पोलीस चौकीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे जिवघेणे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे याकडे यावल सार्वजनिक बांधकाम उपविभागासह जलसिंचन विभागाचे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे. शेळगाव बॅरेजचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,अंजाळे गावाजवळ मोर नदीपात्रात शेळगाव बॅरेजचे बॅकवाटर/पाणी सतत राहणार असल्याने या ठिकाणी उंच पुलासह रस्त्याचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीस पर्यायी रस्ता करण्यात आला आहे,अंजाळे गावापासून भुसावळकडे जाताना रस्त्यावर अर्धा किलोमीटर अंतरावरील उतार आणि चढावावर मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले…

Read More

यावल (सुरेश पाटील) केंद्रीय पुरस्कृत एका अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेत शैक्षणिक कायद्यांची पायमल्ली करून इयत्ता 10वी परीक्षा बोगस घेतली जात असल्याची तसेच शाळेला मिळालेला सांकेतिक क्र.हा सुद्धा संशयास्पद असल्याने इयत्ता 5वी ते 9वीतील विद्यार्थी हे सुद्धा प्रत्यक्षात नसताना कागदोपत्री दाखवले गेल्याने या शाळेमार्फत शासनासह विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक व शैक्षणिक फसवणूक केली गेली त्यामुळे या गैरप्रकाराकड़े संबंधित सर्व शिक्षण अधिकारी जबाबदार असल्याचे जिल्ह्यात शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात बोलले जात आहे. या एका निवासी आश्रम शाळेत कागदोपत्री जे विद्यार्थी मुलं-मुली दाखविले गेले त्यांच्या पटसंख्येनुसार आधार कार्ड नोंदणी संशयास्पद आहे,विद्यार्थी इयत्ता 9वी पर्यंत शाळेत दाखल नसताना ते विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक नियमानुसार इयत्ता…

Read More

मेष : आज मेष राशीचे लोक आपले काम प्रामाणिकपणे करतील. तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता येईल. आर्थिक बाबतीत आज लोभाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांची सर्व कामे सहज पार पडतील. आज व्यापार्‍यांना विशेष फायदा अपेक्षित आहे. आर्थिक देवाणघेवाण करताना एखाद्याला साक्षीदार म्हणून ठेवा. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. तरुणांना इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आज तुम्ही तुमच्या विचारानुसार काम कराल, त्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची…

Read More

जळगाव प्रतिनिधी या संदर्भातील माहिती अशी की, जळगावातील परवेज निसार खाटीक (वय २२, लक्ष्मीनगर, जळगाव ) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, उस्मानिया पार्क ) हे भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्वास घेतला.

Read More

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग जळगाव, व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक माननीय श्री आर एम लोळगे, माहिती व तंत्रज्ञान कायदा सोशल मीडिया, सहदिवाणी न्यायालय, रावेर, यांनी रॅगिंग म्हणजे विद्यापीठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही लेखी किंवा तोंडी कृती की, ज्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुःख किंवा कष्ट होईल असे असभ्य वर्तन होय. अशी व्याख्या सांगितली. त्यांनी मेसेज मधून एखाद्या इमेल मधून फोटो मधून डाटा मधून सुद्धा चूक होऊन त्याचे रॅगिंग मध्ये रूपांतर होते असे सांगितले.…

Read More