Author: Saimat

मुंबई : सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. म्हणूनच सकाळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ते तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी काम करते. तुम्ही तळलेले आणि अस्वास्थ्यकर अन्नाऐवजी काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता जे ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करतात. तुम्ही पपई, भिजवलेले बदाम आणि भाज्यांचे रस इत्यादी अनेक गोष्टी सकाळी नाश्त्यात (Breakfast) घेऊ शकता. हे वजन कमी करण्यास देखील मदत करतील. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही नाश्त्यात रिकाम्या पोटी घ्यावेत. या 5 आरोग्यदायी पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा! पपई सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात…

Read More

मेष: आज मेष राशीचे लोक कामाच्या ठिकाणी संपूर्ण वेळ व्यस्त असतील. काही रखडलेले प्रकल्प आता वेगाने सुरू होतील. नोकरदार लोकांचा प्रभाव वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. काही चांगले बदल देखील होऊ शकतात. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, तुमच्याकडे नवीन गोष्टी येतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कामात भरपूर यश मिळेल. सासरच्यांशी चर्चा होईल. मिथुन: आज मिथुन राशीच्या…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी दि.२९मार्च २०२२ वार :- मंगळवार रोजी सप्ताहाची सांगता झाली. यामध्ये प.पु.वैकुंठ वासी रामकृष्ण नाईक (दादा) यांच्या आशिर्वादाने , ह.भ.प.भागवत महाराज गाडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने ह.भ.प.श्री रवींद्र महाराज परेराव यांच्या संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. व दररोज रात्री ह।भ.प.श्री नारायण महाराज ढासाळेकर, अरुण महाराज जामठीकर, सौ.साक्षीताई भगत चौधरी, मनोज महाराज ऐनगाव, ताराचंद महाराज पाटील, आळंदी देवाची, गोरक्षनाथ महाराज काकडे ,वाघलगांव , रमेश महाराज पाटील, सुसरीकर आदी महाराजांची साप्ताहिक किर्तने झाली ह.भ.प.रवींद्र महाराज परेराव यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. यावेळी संस्थान व ग्रामस्थ मंडळी यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणें विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान व ग्रामस्थ…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.२९ रोजी गावांची भुमीपुत्री रेणुका देविदास राजपुत (परदेशी) यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलिस उपनिरीक्षक(PSI) या पदी निवड झाली त्याबद्दल सोयगाव तालुका प्रशासकीय यंत्रणा व कंकराळा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता , यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सोयगाव तहसिलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक , पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट , विस्तार अधिकारी साळवे , शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे , तालुका संघटक दिलीप मचै , जि.प.सदस्य गोपीचंद जाधव , पंचायत समिती सदस्य संजिवन सोनवणे , लोकनियुक्त सरपंच चंदाताई राजपुत , उपसरपंच मनिषा जैस्वाल , ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक…

Read More

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रथापित केले. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसबद्दल (Congress) मोठे वक्तव्य केले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) काँग्रेसला जोरदार धक्का दिला. यानंतर येत्या काळात काँग्रेसची जागा आप घेईल, असे गडकरी म्हणाले. राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्ष कमी होत असताना त्याची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहे. मात्र हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे गडकरी म्हणाले. एका मुलाखतीत त्यांना विरोधक आणि लोकशाही यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी काँग्रेसबद्दल भूमिका मांडली. काँग्रेस पक्षाला मजबूत होण्याची गरज आहे. लोकशाही ही सत्ताधारी पक्ष आणि…

Read More

मुंबई  यास्मिन शेख  हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज इलेक्‍ट्रॉनिक मिडियाशी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्‍हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे…

Read More

नाशिक ः प्रतिनिधी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. केमिकल प्रक्रिया करून मानवी अवयव ठेवल्याचे उघड झाले आहे.15 वर्षांपासून गाळा बंद असल्याचा दावा गाळा मालकाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. नाशिकमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बिल्डिंगमधल्या बंंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंंबई नाका पोलीस स्टेशन लगतही बिल्डींग आहे. याठिकाणी एका बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी कान, नाक असे अवयव ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम दाखल होऊन अवयव तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राच्या (केसीआयआयएल) कामाची उत्तम वाटचाल पाहून महाराष्ट्र शासनाच्या इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने १ कोटी ५ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खानदेशात स्टार्टअप उद्योगांना चालना मिळावी व नव उद्योजकांना प्रेरणा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने इन्क्युबेशन अर्थात केसीआयआयएलची उभारणी करण्यात आली असून गेल्या वर्ष भरात खानदेशात २० जणांना स्टार्टअप उद्योग या केंद्रामुळे उभारता आले आहे. यातील ४ उद्योगांचे उत्पादनही सुरू झाले आहे. या शिवाय ३० पेक्षा अधिक जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. कृषी, आरोग्य, इलेक्ट्रीक वाहन, अन्न प्रक्रिया आदी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपना ही मदत झाली आहे. नवीन उद्योग…

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाविकासआघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानतर जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कवाढीलाही विरोध होत आहे. जोपर्यंत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी काही जणांनी केली आहे. एक टक्का मुद्रांक शुल्क वाढणार 1 एप्रिलपासून, मुंंबईसह अशा सर्व शहरांमध्ये 1 टक्का मुद्रांक शुल्क वाढणार आहे जिथे मेट्रो ट्रेन्स बांंधल्या जात…

Read More