Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी दिड वर्षापुर्वी पतीचे निधन झालेल्या तरुण विधवेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एकास अटक करण्यात आली आहे. मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव असे एमआयडीसी पोलिसांच्या अटकेतील संशयिताचे नाव असून महिलेचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पिडीत महिला ही रामेश्वर कॉलनी परिसरात राहते. तिच्या घराजवळच संशयीत मंगलसिंग जाधव हा राहतो. 30 मार्चच्या रात्री बारा वाजता पिडीत फिर्यादी महिला तिच्या घरात लहान मुलीसह झोपलेली असतांना तेव्हा तिच्या दरवाज्यावर कुणीतरी ठकठक केले. दरम्यान संशयीत लपून बसला. पिडीतेने इमारतीमधील एका भाडेक-यास आपल्या दरवाज्याजवळ कुणी दिसत आहे का अशी विचारणा केली. कुणी दिसत नसल्याचे त्यांनी सांगीतल्यानंतर खात्री करण्यासाठी दरवाजा उघडून महिला बाहेर आली. पिडीत महिलेने आपल्या…
मेष : आज मेष राशीच्या लोकांना कुटुंबाचे पूर्ण सुख मिळेल. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या मनात नवीन उत्साह दिसून येईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज ७६% नशिबाची साथ आहे. पिवळी वस्तू दान करा. वृषभ : आज वृषभ राशीच्या व्यापारी वर्गाला आज चांगले फळ मिळणार आहे. यासोबतच आज तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. व्यवसायिकांना भागीदारी किंवा सहवासातून चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मिथुन: आज मिथुन राशीच्या लोकांमध्ये उत्साह…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव पोलीस ठाण्याला आता नवीन वाहन मिळाल्याने नादुरुस्त वाहना अभावी आता पोलिसांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येणार नसल्याने आता सोयगाव पोलिसिंग सुसाट होणार आहे.त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला गतीही मिळेल असा विश्वास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे. सोयगाव पोलीस ठाण्याचे जुनाट आणि जीर्ण झालेले नादुरुस्त वाहनावर सोयगाव पोलीस ठाण्यातील ५२ गावांचा भार अवलंबून होता,परंतु सदरील वाहन नादुरुस्त असल्याने जुनाट आणि जीर्ण झालेल्या वाहनामुळे सोयगाव पोलिसांना आरोपींचा पाठलाग आणि रात्रीच्या गस्तीत मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या परंतु आता नवीन वाहन मिळाल्याने सोयगाव पोलिसिंग सुसाट होणार आहे. आता रस्त्यांची अडचण पोलिसांना डोकेदुखी ठरणार नवीन वाहन मिळाल्यावर आता सोयगाव…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी जरंडी(ता.सोयगाव)गावालगत असलेल्या शिवारातील गट क्रमांक-७५ मधील महावितरणचं ए-बी स्वीच मध्ये अचानक शोर्ट सर्किट झाल्याने तुटलेली मुख्य प्रवाहाची तार शेतात ज्वारीच्या शेतात कोसळल्याने दोन एकरातील रबीची काढणीवर आलेली ज्वारीचा कोळसा झाला आहे.या आगीच्या घटनेत १६ क्विंटल ज्वारीचा कोळसा झाला असून जनावरांसाठीचा चारही जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे ८० हजाराचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी महावितरणच्या वीज मंडळाने घटनेची प्राथमिक पाहणी केली आहे. जरंडी ता.सोयगाव गावालगत चिंतामण देवाजी गोरे यांचे गट क्रमांक-७५ शेत आहे.या शेतकऱ्याने खरिपाच्या ज्वारीचे अतिव्रीष्टीमुळे उत्पन्न हाती न आल्याने पोटाच्या भाकरीसाठी रबी हंगामात दोन एकर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली होती.परंतु शेतातून निंबायती गावाकडे जाणाऱ्या मुख्य वीजवाहिनीच्या ए-बी स्वीच मध्ये…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी येथील शेंदुर्णी रोडवरील ह. भ. प.सदगुरु नाईक दादा गुरुजी मंदिर येथे त्याचें भक्त सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एकनाथ सोनाजी आगे, सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन एम आर नाईक नाना व विजय अहिरे यांच्या सहकार्याने आर ओ फिल्टर शुद्ध व शीतल पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे आज (दि ३०) उदघाटन प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मधुकर आहिरे गुरुजी,प्रल्हाद चौधरी,प्रमोद पाटील,प्रकाश बोर्डे ,पंडित काकडे,कडुबा मानकर,शिवाजी चौधरी,सारंग बागले, किशोर पाटील, छोटू चौधरी शांताराम चौधरी,गोलू आहिरे, सुकलाल परदेशीं आदिसह भक्त मंडळ उपस्थित होते.
यावल : प्रतिनिधी तालुकयातील सांगवी या गावातील एका शाळेत १३ वर्षीय अल्पवयीन विध्यार्थीनीचे ११ वीतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांने आक्षेपार्ह फोटो काढून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगवी ता.यावल येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून पोस्को अन्वये गुन्हा झाला आहे. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक शाळेतील विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून ती मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शाळेच्या पायरीवर बसलेली असताना डोंगर काठावरील दोन ११ वीतील विध्यार्थी तेथे आले. व तिचा आक्षेपार्ह फोटो काढत विनयभंग केला. हा प्रकार विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना सांगितला असता त्यांनी मोबाईल मधील फोटो डिलीट केले. मात्र, विध्यार्थीनीच्या नातेवाईकांनी याबाबत यावल पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या नवीपेठ परिसरात एका घरात चोरी झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. लोखंडी खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी अंदाजे 16 ते 18 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. नवीपेठ परिसरात पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल (वय 52) हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.24 मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते. चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील शनिपेठ परिसरातील काट्या फैल येथे 38 वर्षीय महिलेचा घरात पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी घडली. याबाबत शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील शनिपेठ परिसरातील काट्या फैल येथील मोना इम्रान सैय्यद (वय 38) यांचा घरात काम करत असतांना पाय घसरुन डोक्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी सकाळी घडली. त्यांना लागलीच परिवाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हलविले असता महाविद्यालयाचे डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना मयत घोषित करून शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा तपास पोलिस हवालदार अमोल विसपुते करीत आहे.