Author: Saimat

यावल : प्रतिनिधी  भिम आर्मी”भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट चा पदविस्तार सोहळा यावल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यामुळे यावल तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले.            “भिम आर्मी”भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे व संपूर्ण जळगांव जिल्हा युनिटची यावल येथे आढावा व नवपदनियुक्त बैठक संपन्न झाली.           सदर बैठकीवेळी जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्धजी खरे व नवनियुक्त जिल्हा सहसचिव संतोष जी तायडे यांनी संबोधित करतांना संघटनेची पार्श्वभूमी,संघटना कशी असावी,संघटन बांधणी कशी करावी व सच्चा,निडर,निस्वार्थी,स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा यावर मार्गदर्शन…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील देवळात मुलगा दर्शनासाठी गेला होता. त्यासोबत एक १५ वर्षीय व १६ वर्षीय असे दोन अल्पवयीन मुले देखील सोबत होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पीडित मुलाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता. दरम्यान, हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मुलाच्या नातेवाईकांनी बघितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दिली…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे सकारात्मक वागणे लोकांना प्रभावित करेल. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. तसेच आज तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एखादे प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मिथुन: आज मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक बाबतीत समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे संशोधन कार्य करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. जर तुम्ही…

Read More

यावल(सुरेश पाटील) तहसील कार्यालयापासून काही अंतरावर तसेच तापी नदी किनाऱ्याल्या लागून आणि तालुक्यात ठिकठिकाणी तसेच काही ठिकाणी रस्त्याला लागून, बागायती शेत जमिनीवर,एन.ऐ. केलेल्या रहिवास जागांवर, वाटेल त्या ठिकाणी सोयीच्या जागेवर अनेक वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याचे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम वीट भट्टी टाकून आपले वीट भट्टीचे व्यवसाय, कारखाने सुरू केले आहेत. यावल तालुक्यात काही वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याच्या नियमानुसार वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. परंतु अनेक वीटभट्टी चालकांनी महसूल खात्याची तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रीतसर परवानगी न घेता सोयीनुसार वाटेल त्या ठिकाणी मर्जीनुसार वीटभट्टया कारखाने सुरू केले आहेत,भुसावळ येथे तापी नदी पुलाजवळ रहिवासासाठी प्लॉट पाडलेल्या…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजनेतून पडताळणी समितीने पात्र असलेल्या परंतु चुकीच्या पद्धतीने निकष लावलेल्या घोसला येथील त्या ६१ लाभार्थ्यांना आवास योजनेत समाविष्ट करण्याचा विश्वास सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी गुरुवारी केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या भेटीनंतर स्पष्ट केल्याने तय ६१ पात्र असलेल्या परंतु तूर्तास वगळणी केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड प्रपत्रात घोसला ता.सोयगाव येथील २५५ लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली होती.यादी प्राप्त होताच पंचायत समितीच्या वतीने पडताळणी समितीकडून सदरील समाविष्ट लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी करून त्यांचे पक्के घरे व कच्ची घरे या वर्गवारीत पडताळणी करण्यात आली परंतु घोसला येथे पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पडताळणी साठी…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला कर्मचारी प्रेरिका विविध मागण्यांसाठी संविधान चौकात अन्न जलत्याग आंदोलन सुरू करणार आहे तीन टप्प्यात होणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात बुधवारी स्थानिक संविधान चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाने सुरुवात झाली आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवार ३ एप्रिल पासून अन्नत्याग करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करणे हा महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना मागील प्रमुख उद्देश आहे या योजनेच्या या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे यासाठी त्यांना प्रति महिना तीन हजार रुपये मानधन दिले जाते मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही त्यामुळे थकीत मानधनासाठी ३०…

Read More

जळगाव : प्रतिनिधी समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु ता. एरंडोल जि. जळगाव या संस्थेने एरंडोल व धरणगाव या तालुक्यात पथनाट्याद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा माहिती कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी धरणगाव व एरंडोल या दोन्ही तालुक्यात मिळून एकूण १४ गावात करण्यात आला या जागर अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या शासनाच्या अशा बऱ्याच योजना आहेत, ज्या जनसामान्य ग्रामीण भागाच्या लोकांना माहिती नाही म्हणून त्या योजना या दुर्लक्षित केल्या जातात व त्या योजनांचा कोणीही लाभ घेत नाही पण पथनाट्य…

Read More

जळगाव :प्रतिनिधी  युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई खान्देश दौर्‍यावर आले आहे. काल त्यांनी जळगावात आयोजित युवा सेना निश्चय दौर्‍यात वेळात वेळ काढून शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्ष’ला सदिच्छा भेट दिली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्ष’ला सदिच्छा भेट दिली. तसेच तेथील कार्यरत सहकार्‍यांकडून संपूर्ण कार्यप्रणाली समजावून घेत वर्षभरात जवळपास दहा हजारांवर जळगावकरांच्या समस्या/तक्रारींचे निवारण झाल्याची माहिती जाणून घेतली. त्यात नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर तिचा पाठपुरावा महापालिका आयुक्त, उपायुक्त व संबंधित अधिकार्‍यांकडे केला जातो. त्यानंतर ती सोडविल्याचे महापालिकेकडून ‘महापौर सेवा कक्ष’च्या प्रतिनिधींना सांगितल्यानंतर पुन्हा नागरिकांशी संवाद साधून ती निवारण झाल्याचे कळविले जाते. ‘कोविड-19’च्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भारतातील प्रथम क्रमांकाच्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सूक्ष्मसिंचन प्रणाली उत्पादन करणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने 29 मार्च 2022 ला झालेल्या सर्व कर्जदारांच्या संयुक्त सभेत ‘कर्ज निराकरण योजना’, 10 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मास्टर रिस्ट्रक्चरींग अॅग्रीमेंटनुसार काही अटींची पूर्तता केल्यावर मंजूर व जाहीर करण्यात आली. ही कर्ज पुनर्रचना पूर्ण झाल्यावर कंपनीच्या सर्व कर्जदारांनी कंपनीच्या कर्ज सुविधा सामान्य केल्या असून मागील काळातील सर्व अनियमितता, निष्क्रियता दूर केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने 7 जून 2019 ला विशिष्ट धोरण असलेल्या (संपत्तीच्या) कर्ज निराकरणासाठी धोरणपूर्वक मांडणी जाहीर केल्यानंतर या कर्ज निराकरण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेला आयसीआरए आणि क्रिसिल या संस्थांनी RP-4 रेटींग…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा  रेखा शर्मा यांनी आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रेखा शर्मा यांना आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची वेगवेगळ्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. श्रीमती शर्मा यांनी महिलांच्या तक्रार निवारणासाठी कार्यरत असलेला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 155209 या  टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती घेतली तसेच आयोगाच्या सादर करण्यात आलेल्या  कार्यअहवालावर त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग यांनी एकत्रितपणे काम करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली तसेच राष्ट्रीय महिला आयोगाचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची…

Read More