Author: Saimat

मुंबई  यास्मिन शेख  हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज इलेक्‍ट्रॉनिक मिडियाशी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्‍हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे…

Read More

नाशिक ः प्रतिनिधी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. केमिकल प्रक्रिया करून मानवी अवयव ठेवल्याचे उघड झाले आहे.15 वर्षांपासून गाळा बंद असल्याचा दावा गाळा मालकाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. नाशिकमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बिल्डिंगमधल्या बंंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंंबई नाका पोलीस स्टेशन लगतही बिल्डींग आहे. याठिकाणी एका बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी कान, नाक असे अवयव ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम दाखल होऊन अवयव तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राच्या (केसीआयआयएल) कामाची उत्तम वाटचाल पाहून महाराष्ट्र शासनाच्या इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने १ कोटी ५ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खानदेशात स्टार्टअप उद्योगांना चालना मिळावी व नव उद्योजकांना प्रेरणा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने इन्क्युबेशन अर्थात केसीआयआयएलची उभारणी करण्यात आली असून गेल्या वर्ष भरात खानदेशात २० जणांना स्टार्टअप उद्योग या केंद्रामुळे उभारता आले आहे. यातील ४ उद्योगांचे उत्पादनही सुरू झाले आहे. या शिवाय ३० पेक्षा अधिक जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. कृषी, आरोग्य, इलेक्ट्रीक वाहन, अन्न प्रक्रिया आदी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपना ही मदत झाली आहे. नवीन उद्योग…

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाविकासआघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानतर जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कवाढीलाही विरोध होत आहे. जोपर्यंत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी काही जणांनी केली आहे. एक टक्का मुद्रांक शुल्क वाढणार 1 एप्रिलपासून, मुंंबईसह अशा सर्व शहरांमध्ये 1 टक्का मुद्रांक शुल्क वाढणार आहे जिथे मेट्रो ट्रेन्स बांंधल्या जात…

Read More

जामनेर:(प्रतिनिधी) :- भारतीय संस्कृतीत नारीला विशेष महत्व प्राप्त आहे. आपण नारी पूजन का करतो ? तर माता भुवनेश्वरी ने स्वामी विवेकानंद सारखे रत्न दिले. त्यांचे पूर्ण जगात नावलौकिक झाले.  त्याच प्रमाणे माता जिजाऊने सुध्दा समस्त समाजा च्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या दिव्य पुत्राला जन्म दिला. त्यांनी हिंदूंचेच नव्हे तर सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे रक्षण व स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. माता जयवंताबाईंनी महाराणा प्रताप सारखा शूर, वीर, पराक्रमी, तेजस्वी, ओजस्वी असा सुपुत्र जन्माला घातला या सुपुत्रांना घडवण्यात आईची भूमिका सर्वश्रेष्ठ राहिली आहे. आज आमच्या आया-बहिणींनी सुध्दा मुलांना चांगले संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे. डोक्यावर केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा चांगले…

Read More

  कोळगाव ता-भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे कृ.भ.को.चे दिवंगत संचालक तथा आमडदे ता.भडगाव येथील समाजकारण,राजकारणात आपला ठसा उमटवणारे स्व.आण्णासाहेब अशोक हरी पाटील यांच्या १७ व्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन करण्यात आले.   कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,ज्येष्ठ शिक्षक रामदास कुंभार,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या हस्ते स्व.आण्णासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.    सदर दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसर स्वच्छ करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब कोळगावकर यांनी केले तर सुत्रसंचालन एस.ए.वाघ तसेच आभार प्रशांत पाटील यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त दुसरं काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत जीवनाचा उत्तम अनुभव घेऊ शकता. वृषभ : आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. मिथुन : आज तुमची संवाद क्षमता उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमासाठी हा…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी केंद्र सरकारचे कामगार कष्टकरी विरोधी धोरनाच्या विरोधात कामगार ,कष्टकरी विद्यार्थी ,युवक महिला वर्ग रस्त्यावर उतरला आहे ,कृषी कायद्याप्रमाणे संसदेत कोनतीही चर्चा न करता संपूर्ण संसदीय लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवून केंद्र सरकारने अजून एक घातक पाउल उचलले आहे ,गेल्या एक शतकापासून कामगारांनी लढुन मिळवलेल्या कामगार कायद्यांना उद्ध्वस्त करुन केंद्र सरकारने नवीन चार श्रम संहिता (कोड बिल )मंजूर करून घेतले आहेत, त्यामुळे कामगार कायदे नष्ट होऊन मालक धार्जिने कायदे अस्तित्वात आले आहे त्यामुळे किमान वेतन ,कामाचे तास ,औद्योगिक कलह ,सामुहिक वाटाघाटी ,कामगार संघटना नोंदित करण्याचा अधिकार आदी बाबतीत कामगारांच्या अधिकारावर गदा आली आहे,खाजगीकरण ,कंत्राटीकरन , महागाई ,बेरोजगारी च्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गौरी महाजन व सन्मुख महाजन या बहीण-भावाला राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झालेे. गौरी ही लुंकड कन्या शाळेची विद्यार्थिनी तर सन्मुख हा मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. गौरीने 14 वर्षे वयोगटात तर सन्मुखने 19 वर्षे वयोगटात राज्य-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. त्यांचा महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Read More

जळगाव  : प्रतिनिधी निसर्ग मित्र समितीतर्फे उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी सहज व थंड पाणी उपलब्ध या उद्देशाने परळ वाटपाचा कार्यक्रम काल पार पडला. या प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव अक्षय सोनवणे, भाजयुमो सरचिटणीस महेश पाटील, चेतन मुथा, मदन खडे, रवी भोई, हे उपस्थित होते. नागरिकांना परळ वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी जितेंद्र बागरे, विकास वाघ यांचे सहकार्य लाभले, असे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

Read More