मेष : आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, आज तुम्ही प्रत्येक गोष्टीत चमकाल. नोकरदार लोकांना कोणतेही विशेष काम यश मिळवून देऊ शकते. कामात पूर्ण सहकार्य कराल. आज हवामानामुळे तब्येत थोडी बिघडू शकते. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक काही लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पदोन्नती किंवा बदली संबंधित बोलणी आज होतील. आज मुला-मुलींकडून कौतुकास्पद काम होईल. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. आज ८९% नशिबाची साथ आहे.…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी रुग्णालयात असो वा शिबिरस्थळी आलेल्या गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करत शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेले डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे रुग्णसेवेप्रतीचे कार्य महत्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मलकापूर व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, ३१ मार्च रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी खडसे बोलत होते. मलकापूर येथील भ्रातृ मंडळ चाळीस बिघा येथे सकाळी शिबिरास प्रारंभ झाला. शिबिराचे उद्घाटन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन व संत…
चाळीसगाव : प्रतिनिधी शिक्षकांच्या शिकवणुकीमुळे मला कधीही व्यसनाने शिवले नाही. शिक्षक हे समाजाचे खरे आदर्श असतात. चाळीसगाव तालुक्यात अनेक शिक्षक चांगल्या संकल्पना मांडत असतात. त्यांचेही अभिनंदन असे मनोगत पंचायत समिती शिक्षण विभाग व कृतिशील शिक्षण मंच यांच्या यांच्या संयोजनाने तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन राजपूत मंगल कार्यालय येथे आ. मंगेश चव्हाण यांनी केले. तालुक्यात गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतुन व गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या माध्यमातून शाळांसाठी B- plus अंतर्गत बाला उपक्रमाचे उदघाटन आ. मंगेश चव्हाण यांनी केले. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नंदकिशोर वाळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विकास पाटील हे उपस्थित होते. विलास भोई गटशिक्षणाधिकारी व नंदकुमार वाळेकर यांनी…
यावल : प्रतिनिधी भिम आर्मी”भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट चा पदविस्तार सोहळा यावल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यामुळे यावल तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले. “भिम आर्मी”भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे व संपूर्ण जळगांव जिल्हा युनिटची यावल येथे आढावा व नवपदनियुक्त बैठक संपन्न झाली. सदर बैठकीवेळी जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्धजी खरे व नवनियुक्त जिल्हा सहसचिव संतोष जी तायडे यांनी संबोधित करतांना संघटनेची पार्श्वभूमी,संघटना कशी असावी,संघटन बांधणी कशी करावी व सच्चा,निडर,निस्वार्थी,स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा यावर मार्गदर्शन…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील देवळात मुलगा दर्शनासाठी गेला होता. त्यासोबत एक १५ वर्षीय व १६ वर्षीय असे दोन अल्पवयीन मुले देखील सोबत होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पीडित मुलाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता. दरम्यान, हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मुलाच्या नातेवाईकांनी बघितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दिली…
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे सकारात्मक वागणे लोकांना प्रभावित करेल. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. तसेच आज तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एखादे प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मिथुन: आज मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक बाबतीत समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे संशोधन कार्य करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. जर तुम्ही…
यावल(सुरेश पाटील) तहसील कार्यालयापासून काही अंतरावर तसेच तापी नदी किनाऱ्याल्या लागून आणि तालुक्यात ठिकठिकाणी तसेच काही ठिकाणी रस्त्याला लागून, बागायती शेत जमिनीवर,एन.ऐ. केलेल्या रहिवास जागांवर, वाटेल त्या ठिकाणी सोयीच्या जागेवर अनेक वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याचे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम वीट भट्टी टाकून आपले वीट भट्टीचे व्यवसाय, कारखाने सुरू केले आहेत. यावल तालुक्यात काही वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याच्या नियमानुसार वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. परंतु अनेक वीटभट्टी चालकांनी महसूल खात्याची तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रीतसर परवानगी न घेता सोयीनुसार वाटेल त्या ठिकाणी मर्जीनुसार वीटभट्टया कारखाने सुरू केले आहेत,भुसावळ येथे तापी नदी पुलाजवळ रहिवासासाठी प्लॉट पाडलेल्या…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजनेतून पडताळणी समितीने पात्र असलेल्या परंतु चुकीच्या पद्धतीने निकष लावलेल्या घोसला येथील त्या ६१ लाभार्थ्यांना आवास योजनेत समाविष्ट करण्याचा विश्वास सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी गुरुवारी केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या भेटीनंतर स्पष्ट केल्याने तय ६१ पात्र असलेल्या परंतु तूर्तास वगळणी केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड प्रपत्रात घोसला ता.सोयगाव येथील २५५ लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली होती.यादी प्राप्त होताच पंचायत समितीच्या वतीने पडताळणी समितीकडून सदरील समाविष्ट लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी करून त्यांचे पक्के घरे व कच्ची घरे या वर्गवारीत पडताळणी करण्यात आली परंतु घोसला येथे पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पडताळणी साठी…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला कर्मचारी प्रेरिका विविध मागण्यांसाठी संविधान चौकात अन्न जलत्याग आंदोलन सुरू करणार आहे तीन टप्प्यात होणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात बुधवारी स्थानिक संविधान चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाने सुरुवात झाली आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवार ३ एप्रिल पासून अन्नत्याग करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करणे हा महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना मागील प्रमुख उद्देश आहे या योजनेच्या या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे यासाठी त्यांना प्रति महिना तीन हजार रुपये मानधन दिले जाते मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही त्यामुळे थकीत मानधनासाठी ३०…