pan 7
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे यंदा आंतर महाविद्यालयीन “युवारंग युवक महोत्सव” हा दि . १९ एप्रिल ते २४ एप्रिल २०२२ ह्या तारखांना होणार युवक महोत्सव तूर्त रद्द करावा अशी मागणी कुलगुरूकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड कुणाल पवार , जिल्हाध्यक्ष भुषण भदाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहेकी, भर उन्हाळ्या मध्ये सुमारे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात जळगाव जिल्हा रोज चर्चेत आहे त्या तापमानामध्ये ऐन परिक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा विचार न करता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवारंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे.त्यामागे कोणाचे कोणते आर्थिक फायदे आहेत हे…
मेष : मेष राशीच्या लोकांना आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. इतरांच्या विचारांनी आणि बोलण्याने जास्त प्रभावित होऊ नका. कामाच्या बाबतीत दिवस तुमच्या अनुकूल असेल. आर्थिक स्थितीबाबत अजूनही थोडे सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि आशा यांचा संचार असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात पूर्ण काळजी घ्याल, तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळेल. तुमचे अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. काही कामात तुमचा अनुभव फायदेशीर ठरेल. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय…
लोणार ( गुलाब शेख ) मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोरोना आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगीतले , त्यानुसार मयत व्यक्तीच्या वारसांनी ऑनलाईन अर्ज सुध्दा केले .परंतू आजपर्यंत दोन वर्ष उलटून सुध्दा शासनातर्फे कुठल्या प्रकारची मदत मयत व्यक्तीच्या वारसांना मिळालेली नाही . कोरोना आजारामुळे मयत पावलेले कुटूंब प्रमुख्य व्यक्तीच्याटूंबावर उपासमारीची वेळ आलेली असतांना सुध्दा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनातर्फे मिळाली नाही . मयत व्यक्तीच्या वारसांनी खूप प्रयत्न व कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन अर्ज केले होते परंतु आज पर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आली आहे . तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून लवकरात लवकर कोरोना आजाराने मयत…
प्रतीनिधी : अमीन पिंजारी कजगाव ता भडगाव सध्या उन्हाचे तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मनुष्यासह प्राण्यांच्या जिवाचीही लाहिलाही होत आहे त्यातच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. सध्या उन्हाचे तापमान पाहता मनुष्य आपली व्यवस्था करून घेतो मात्र वनात फिरणारे वन्य प्राण्यांना वन विभागाच्या हद्दीत व वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या बऱ्याच ठिकाणी पाणवठे आढळून येत नाही त्यामुळे वन्य प्राण्यांना गावालगतील शेतात येऊन आपली तहान भागवून घ्यावी लागत आहे मात्र पाण्यासाठी प्राण्याची होणारी वाताहतमुळे प्राणीप्रेमी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे पाणवठे तयार करण्यात यावे अशी…
यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल कडून शिवसेनेचा दारुण पराभव करण्यात आला यामुळे यावल तालुक्यातील एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत यावल तालुक्यात आणि जळगाव कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे निवडणुकीत त्या एका पदाधिकाऱ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नडल्याचे बोलले जात आहे कारण विरावली विविध कार्यकारी सोसायटीत 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला तर फक्त दोन जागा शिवसेना पुरस्कृत पॅनलला मिळाल्या आहेत. विरावली विकास सहकरी सोसायटीची निवडणूक सन 2021 ते 2026 या वर्षासाठी घेण्यात आली निवडणुकीत एकूण बारा जागांसाठी 39 फॉर्म भरले गेलेत यात छाननीच्या दिवशी विश्वनाथ पाटील यांच्या फॉर्मवर परिवर्तन पॅनल…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील हुडको येथे आज रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास एका ४० वर्षीय इसमाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०, रा. शिवाजी नगर) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. सोमवारी मुसेफचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे.…
जळगाव- जिल्हा पोलिस दलातर्फे तरंग महोत्सवानिमित्त चला हवा येवू दया चा चमू जळगावात आला असता. या कलावंत चमूने वाघूर धरणाजवळील परेश हॉलिडे रिसोर्टला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाऊ कदम, भरत गणशपुरे, सागर कारडे, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे यांचे स्वागत करतांना ‘साईमत’ चे संपादक प्रमोद बऱ्हाटे, लोकहित दर्पणच्या संपादीका सुरेखाताई बऱ्हाटे, परेश हॉलिडे रिसोर्टचे संचालक परेश बऱ्हाटे, सुप्रिया बऱ्हाटे आदी. (छाया ः योगेश चौधरी)
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 31 मार्चपर्यंत तब्बल 95.25 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. निधी खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात युद्धपातळीवर कामे पुर्ण केली आहेत. त्यामुळे यंदा शासनाकडे निधी परत जाण्याचे प्रमाण घटले आहे. 536 कोटी 5 लाख 59 हजार रुपयांपैकी 510 कोटी 59 लाख 65 हजार रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. या कामांमध्ये ग्रामीण रस्ते, फर्निचरसह ग्रामपंचायत इमारती, अंगणवाड्या, स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण, साठवण बंधारे, नाविन्यपूर्ण कामे, ट्रान्सफार्मर्ससह विजेची अन्य कामे, जि.प. शाळांना संरक्षक भिंती उभारणे, सौर उर्जा कामे यांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी 90 टक्क्यांंपेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात…