Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित ‘सुस्वागतं रामराज्यं’ या सुंदर नृत्य-नाटिकेद्वारे गुढीपाडव्याची सायंकाळ रंगली. नर्तन-कीर्तनाच्या सुरेल संगमाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. भवरलाल व कांताबाई फाउंडेशनच्या सहकार्याने  छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. सराफा व्यावसायिक अशोक जोशी, राम मंदिर संस्थानचे गादीपती श्रीराम जोशी, जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अनिल जोशी, नृत्य नाटिका सादरकर्ते अक्षय आयरे, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरद छापेकर, दीपक चांदोरकर उपस्थित होते. अशोक जोशी, श्रीपाद जोशी, जैन इरिगेशनचे व्ही.एम. भट,डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते गुढी देऊन कलावंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गीत रामायण कीर्तन आणि नर्तन, या दोन्ही…

Read More

 जळगाव ः प्रतिनिधी   जिल्ह्यात कोवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्‍यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने पारित करण्यात आलेले सर्व आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागे घेतले आहेत. अर्थात, जिल्हा आजपासून खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त झाला असून हॉटेल्स, बार रात्री 10 नंतरही खुले राहतील. जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व घटक यांनी आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षिततेसाठी कोविड अनुरूप वर्तनासाठी चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मार्च 2020पासून महाराष्ट्रात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. बाधित रुग्णसंख्येत घट झालेली असून, काही…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी इंधन दरवाढ विरोधात युवासेनेतर्फे काल शहरात केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी राज्यात इंधनरवाढ विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत जळगावात युवासेनेतर्फे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. इंधन व महागाई वाढीचा निषेध करीत थाळी वाजवण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या सूचनेनुसार महानगर शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे, युवासेना जिल्हाप्रमुख…

Read More

 जळगाव ः  प्रतिनिधी   चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यातील 195 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश वितरण कार्यक्रम गणपतीनगरात रोटरी हॉल येथे झाला. जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, नाम फाउंडेशनचे जळगाव विभागाचे समन्वयक डॉ.प्रताप जाधव, संजय शहा यांच्याहस्ते हे धनादेश वितरित झाले. ‘नाम’तर्फे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी हिताचे कार्यक्रम राबवले जातात. त्यात प्रामुख्याने नदी व नाले रुंदीकरण, खोलीकरण कामाचा समावेश आहे. डॉ. प्रताप जाधव यांनी प्रास्ताविक केले. धनादेश उपलब्धतेसाठी हरीश इथापे यांचे सहकार्य लाभले. धनादेशासोबत स्व. प्रेमजी भवानजी शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाचे…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत स्पष्ट भूमिका ठेवा. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. मनोरंजनाच्या साधनांमध्ये रुची राहील. घराबाहेर आनंद राहील. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी आज सर्वांशी नम्रपणे बोला. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी चांगली वेळ आहे. कौटुंबिक सुख चांगले राहील. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जुन्या सातारा भागात गुढीपाडवा आणि मरीमाता देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या महोत्सवाला गालबोट लागले आहे . ४-५ लोक चिरडले गेले असून २ लोकांचे पायांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते. यामध्ये  १ व्यक्ती दगावल्याची देखील बातमी आहे.मात्र,अधिकृत रित्या पोलीस विभागाकडून या घटनेस दुजोरा मिळू शकलेला नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मरी मात्रा यात्रेत बारागाड्या ओढत असताना चेंगराचेंगरी मध्ये गाडी ओढणारे सुतार गल्लीतील गिरीश कोल्हे (वय ३९) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्यमध्ये माजी नगरसेवकाचे बंधू असल्याचे कळते.

Read More

मुंबई – मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम भवन उभे रहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद…

Read More

लोणार तालुका प्रतिनिधी   अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदेश नुसार महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन दिनांक 1 एप्रिल2022 रोजी सकाळी 11 वाजता लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणार बस स्थानक समोर गॅस सिलेंडर स्कूटर मोटर सायकल ला सजवून केंद्र सरकारचा महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलेआहे. या आंदोलनात तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असून, आंदोलन हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी,शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले असून. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनतेचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेचे लुट करत…

Read More

 लोणार  तालुका प्रतिनिधी  संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदारांच्या राशन वाटपाचे ई.पि.एस.मशीन ची मुदत कालबाह्य झाल्या मुळे गेल्या अनेक महिन्यापासून राशन वाटपासाठी दुकानदारांसह ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुदतबाह्य झालेल्या मशीन ची वेळोवेळी बिघाड होत असून या मशीन मध्ये असणारे सिमकार्ड हे 3 जी नेटवर्क चे असून आता 4 जी सह 5 जी नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेले असल्यामुळे या 3 जी सिमकार्ड चे नेटवर्क कमी पडत असल्यामुळे पर्यायाने रास्त भाव दुकानदारांना आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून हॉसपॉट च्या माध्यमातून मशीन कनेक्ट करून चालवाव्या लागत आहे.परंतु त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी ई.पी.एस.मशीन वरील व आधार सीडींग वरील साईड वर सुरू…

Read More

पुणे प्रतिनिधी –  राज ,रचना,कला एवं साहित्य परिषद रायपुर च्या वतीने ‘फ़ेस ऑफ़ इंडिया 2022पुरस्कार प्रदान करण्यात आले.भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई मोदिजी सहित नऊ केंद्रीय मंत्री,,भारतातील माननीय दहा मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रात सराहनीय ,कार्य करनरया समर्पित कार्यकर्त्याना ‘फेस ऑफ़ इंडिया ‘ अवार्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.ह्याकार्यकमात महाराष्ट्रातिल सुप्रसिद्ध समाजिक ,अध्यात्मिक,अपंग तसेच वैध्यकीय क्षेत्रांतील जेस्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ रविंद्र दिनकर भोळे याना वरिल’ फेस ऑफ़ इंडिया ‘अवार्ड प्रदान करण्यात आला डॉ रविंद्र भोळे ह्यानी विविध क्षेत्रात समर्पित तसेच निस्काम कर्मयोगी कार्ये केलेली असुन विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्याब्द्दल त्याना यापूर्वीही रोमन मगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री स्व.डॉ मणीभाई देसाई ह्यानी1991 सन्मान्पत्र…

Read More