Author: Saimat

जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवाशी उत्तम रघुनाथ ढोणी वय ३८ यांचा  मृतदेह आढळून आल्याची घटना आज दि.६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. उत्तमने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केल्यामुळे पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,मयत उत्तम हा स्वत:च्या चारचाकी वाहनांमधून प्रवाशी वाहतूक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता.गावातील ग्रा.पं.सदस्य राजेंद्र काशिकर हे सावकारी करीत असून मयत उत्तमने त्यांच्या कडून व्याजाने पैसे घेतलेले आहे.हलाखीची परिस्थिती असल्यामुळे उत्तम घेतलेले पैसे वेळेवर देऊ शकत नसल्याने काशिकर त्याच्या मागे पैशाचा तगादा लावत होता.दि.५…

Read More

 जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा बँकेचे मध्यस्थ म्हणून शेतकऱ्यांना कर्जवाटप करणाऱ्या तब्बल 159 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रम केला आहे. या सोसायट्यांनी तब्बल 100 टक्के कर्जाची वसुली केली आहे. वसुलीच्या माध्यमातून जिल्हा बँकेची वार्षिक पीककर्ज वसुली तब्बल 650 कोटींवर पोहोचली. शासनाच्या नव्या धोरणानुसार बँकेकडून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या मर्यादेत विनाव्याजी कर्ज दिले जाते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने 6 महिन्यांपासून बँकेकडून कर्जवसुलीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, 31 मार्चपूर्वी 650 कोटी रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. जिल्हा बँकेची पीककर्जाची थकबाकी वाढल्याने बँकेचा एनपीए वाढला आहे. दरम्यान, कर्जवसुलीसाठी बँकेने राबवलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे.…

Read More

 जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेला कधी नव्हे एवढा निधी मिळाला आहे. त्यातून रस्त्यांची व गटारींची कामे करताना गुणवत्तेवर भर देणे अपेक्षित आहे. मक्तेदाराची दलाली करण्यापेक्षा आपल्या जबाबदारीचे भान ठेवा. रस्त्यांच्या गुणवत्तेविषयी तक्रारी वाढत असून, त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशा शब्दात महापौर जयश्रीताई महाजन यांनी अभियंत्यांची कानउघाडणी केली. कामे सुरू न करणाऱ्या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 61 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरातील रस्त्यांची व गटारींची कामे केली जात आहेत; परंतु त्यासंदर्भात तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्याची दखल घेत महापौर महाजन यांनी काल दुपारी सार्वजनिक…

Read More

 जळगाव ः   प्रतिनिधी इंदौर येथील प. पू. नाना महाराज तराणेकर यांचे जीवनदर्शन घडविणारी संजीव कुसूरकर लिखित मालिका गेल्यावर्षी सायंदैनिक …साईमत…ने महिनाभर प्रकाशित केली.त्यावर आधारित ॥ मार्तंड जे तापहीन॥ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आयकर अपील न्यायाधिकरणाचे सदस्य  इंटुरी रामा राव यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी त्रिपदी परिवाराचे अर्ध्वयु हरी मुस्तीकर, विश्वस्त ॲड. शिवराज कदम,संजीव कुसूरकर,श्री. जहागिरदार  आदी.

Read More

जळगांव प्रतिनिधी नाशिक येथील  गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जलपुरुष राजेंद्रसिंग यांच्या हस्ते शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला . कवी कालिदास नाट्यगृहात हा सोहळा पार पडला या वेळी अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे , जलपुरूश राजेंद्रसिंग , पालकमंत्री छगन भुजबळ , गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार , व इतर मान्यवर उपस्थित होते . नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला . गिरणा गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो . या वर्षांपासून तो नाट्यक्षेत्रातील रंगकर्मीना द्यायची सुरवात शंभु पाटील यांच्या पासून करण्यात आली. कालच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला . गिरणा काठावर…

Read More

बोदवड सुहास बारी   जळगाव  जिल्हा मध्य सहकारी  बँकेचे अध्यक्ष मा. गुलाबराव देवकर यांच्या दालनात त्यांना निवेदन देण्यात आलेत  जळगाव जिल्हा मध.सह. बँक जळगाव च्यामाध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जातात. शेतकरी बँक म्हणून जिल्हा बँकेचा लौकिक आहे.  २०१८ पासून शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड पुरविण्यात आलेले असून सर्व शेतकर्‍यांना पीक कर्जाची रक्कम एटीएममधून काढावी लागते.  दुर्दैवाने, आपल्या बँकेत कुठेही ATM नाहीत.  डिजिटल पेमेंटमध्ये तुमचे बँकिंग व्यवहार मागे पडत आहेत.  आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर विसंबून बँकेने शेतकऱ्यांना एटीएमसमोर उभे केले आहे.  पिकांसाठी कर्ज वाटपाच्या वेळी आणि ज्या शेतकऱ्यांना एटीएम वापरण्यात कोणतीही अडचण येत असेल अशा शेतकऱ्यांसाठी बँकेतून त्यांना कर्जाची…

Read More

बोदवड सुहास बारी शिवसेना ,भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी,भारतीय जनता पक्ष, नगराध्यक्ष बोदवड, व्यापारी संघटना बोदवड, डॉक्टर असोसिएशन बोदवड, किसन एकता संघ, दिल्ली ,स्वामी विवेकानंद बाहुउद्देशी संस्था बोदवड च्या वतीने आम्ही सदर आमच्या राजकीय पक्षाच्या तसेच संस्थेमार्फत  बोदवड परिसरातील नागरीकांची गोर – गरीब गरजुंची कामे करण्याचा प्रयत्न करत असतो . लोकांची कामे करतांना बऱ्याच वेळेस आमचे तहसिल कार्यालय बोदवड येथेही जाणे येणे असते काही दिवसांआधी बोदवड तहसिल कार्यालयात तहसिलदार योगेश्वर टोंपे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे . तहसिलदार योगेश्वर टोंपे बोदवड तहसिल कार्यालयात , तहसिलदारपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या दालनात प्रत्यक्ष जाण्याचाही बऱ्याच वेळेस आम्हाला योग आला प्रत्येक वेळेस सदर तहसिलदार योगेश्वर…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. आज तुम्ही जे काही विचार करता त्यात तुम्हाला यश मिळू शकते. भाग्यवृद्धीमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात भागीदारीपासून दूर राहा. अधिका-यांशी वादापासून दूर राहिल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. मनाच्या बोलण्याने संदिग्धता दूर होईल. घरातील लोक तुम्हाला खूप प्रेम देतील. आज ८६% नशिबाची साथ आहे. आज पिवळ्या डाळीचे दान करा. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांच्या मनात नवा उत्साह दिसून येईल. आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. नवीन करार करण्यापूर्वी त्यांची कायदेशीर बाजू विचारात घ्या. अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि पैशाशी संबंधित…

Read More

लोणार(गुलाब शेख) ज्या भाजपाच्या नेत्यांना गावात प्रवेश करतानाही विचार करावा लागायचा त्याच भाजपाचे आज महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार,आमदार, नगराध्यक्ष,नगरसेवक इतकेच नव्हे तर सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत. अवहेलना,अपमान, तिरस्कार,त्रास सोसून भाजपा आज कार्यकर्त्यांच्या अपरिमित मेहनतीतून समाजमान्य पक्ष झाला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक समाजघटक,गाव,खेडे,पाडा,वाडा,वस्ती,असा विस्तारत पक्ष वाढला. कार्यकर्त्यांच्या त्याग, तपस्या आणि बलिदानातून आज हे भाजपाला विराट रूप मिळाले आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या माझ्या”भारतीय जनता पक्षाच्या”स्थापना दिनाच्या” सर्व कार्यकर्ता बंधू -भगिनी एवं सर्व पदाधिकारी हा उत्सव साजरा केला… 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. 21ऑक्टोबर 1951 जनसंघ-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दिनदयालजी ते 6 एप्रिल 1980 भा.ज.पा.- श्रध्येय अटलजी,आडवाणीजी ते…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिताने सोयगाव पोलीस ठाण्यात बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमेटीची बैठक संपन्न झाली यावेळी उपविभागीय पोलीसाधिकारी विजयकुमार मराठे यांनी भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांततेचे आवाहन करून मिरवणुकीचा मार्ग ठरविण्यात यावा तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी बैठकीत केले. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी मार्गदर्शन करून पोलिसांच्या पाठीशी रहा असे आवाहन शहरवासीयांना केले यावेळी उत्सव समिती अध्यक्ष हर्शल काळे,उपाध्यक्ष अंकुश पगारे,राजू दुतोंडे,नगरसेवक दीपक पगारे,अजित काळे,अनिल गोतमारे,विजय चौधरी,साहेबराव सोनवणे,भास्कर श्रीखंडे,विलास नेरपगारे,राजू काळे,आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.उपनिरीक्षक सतीश पंडित,गणेश रोकडे,सागर गायकवाड,अजय कोळी,रवींद्र तायडे,कौतिक सपकाळ,ज्ञानेश्वर सरताले आदींनी पुढाकार घेतला.

Read More