OnePlus ने आपल्या बहुचर्चित Y1 सीरिजमधील नवीन स्मार्ट टीव्हीला भारतीय बाजारात लाँच केले आहे. OnePlus TV Y1S Pro हा वॅनिला Y1S च्या तुलनेत अपग्रेडेड डिस्प्लेसह येतो. ४के डिस्प्लेसह OnePlus TV Y1S स्मार्ट टीव्हीमध्ये २४ वॉट स्पीकर, अँड्राइड १० आणि २ जीबी रॅमसह अनेक शानदार फीचर्स दिले आहे. OnePlus TV Y1S Pro चे स्पेसिफिकेशन्स जवळपास OnePlus TV Y1S सारखेच आहेत. कंपनीने या स्मार्ट टीव्हीला ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या OnePlus TV Y1S Pro स्मार्ट टीव्हीच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. OnePlus TV Y1S Pro ची किंमत आणि फीचर्स OnePlus TV Y1S Pro ला भारतीय बाजारात २९,९९९ रुपये किंमतीत सादर केले…
Author: Saimat
पाचोरा : प्रतिनिधी येथील २० वर्षीय तरुण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा देवून घरी जात असतांना तालुक्यातील नेरी गावा दरम्यान, महिंद्रा पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाच्या डोक्याला जबरी मार लागल्याने तो जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, तेजस सुरेश महेर (वय – २० ) असे मृत तरुणाचे नाव असून तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे या छोट्याशा गावात राहत होता. तेजसला सैन्यात भरती होण्यासाठी जळगांव येथे गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून दि. ६ एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला होता. दि.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील विवाहित महिलेला माहेरून साडेतीन लाख रुपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडील मंडळींकडून छळ होत असल्याने पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा तुषार हिप्पर (वय-२३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार ज्ञानेश्वर हिप्पर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आनल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता या…
भुसावळ-प्रतिनिधी चैत्र नवरात्री प्रारंभ च्या निमित्ताने शैक्षिक आगाज महाराष्ट्राच्या वतीने भुसावळ येथील सुराणा साधना भवन मध्ये कार्बनक्रेडिट ची शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार संजय भाऊ सावकारे ,सौ रजनी सावकारे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, आयपीएस अधिकारी आतिष कांबळे, सुगनचंद सुराणा ,यतीश डुंगरवालकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षांची पूजा करून मान्यवरांचे वृक्ष भेट देवून स्वागत करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी आमदार सावकारे म्हणाले आज मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे, छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा वाहनांचा वापर करत आहोत . त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनचे प्रमाण पसरत आहे त्याचे दुष्परिणाम आपण सर्व अनुभवत आहोत याला आळा घालायचा असेल तर…
नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिलाय.गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केलीय. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने केला होता. ईडीने राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या एनजीओवर कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील १४८ गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदाने या योजनेतून स्मशानभूमि बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष प्रमाणे १४ कोटी ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी १३ कोटी ३२ लक्ष निधी जिल्हा परिषदेला वितरीत देखील करण्यात आलेला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील ज्या गावांना अद्यापपर्यंत स्मशानभूमीचे बांधकाम झालेले नव्हते अशा सर्वच ठिकाणी स्मशानभूमींची कामे मार्गी लागली आहे. तर, यामुळे अंत्यसंस्कार करतांना होणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव…
मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता महापालिका आणि स्थानिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आयाराम गयारामांची एंट्री सुरू झाली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. चित्रपटसृष्टी, कलाकार आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे आसावरी जोशी यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी…
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. तत्पूर्वी, पुन्हा अशी वर्तवणूक करू नये, अशी अट घालतानाच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. आज झालेल्या निर्णयानुसार, 15 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार राज्य सरकार तयार असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. मात्र गुन्हे मागे घेऊ शकत नाही, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल असे सांगितले आहे. निर्देश देताना हायकोर्टाने सांगितलं की, पुन्हा असे वर्तवणूक जर नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर…
फैजपुर : प्रतिनिधी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या एकूण चार जागा बिनविरोध निवडून आलेले आहे. या भटक्या विमुक्त जाती गटातून माधव हरी भोई तर महिला राखीव गटातून माजी नगरसेविका सौ. अनिता अरुण चौधरी व नगरसेविका शकुंतला मोतीराम भारंबे तर ओबीसी राखी या गटात विलास महारु महाजन अशा एकूण चार जागा शेतकरी विकास पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेले आहेत. महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी तीन अर्ज असल्याने सौ अमिता हेमराज चौधरी माजी नगराध्यक्ष यांनी सर्वांच्या विनंतीवरून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महिला राखीव गटातून दोघा जागा बिनविरोध निवडून आल्या ओबीसी गटात सुद्धा जवळपास पाच…