Author: Saimat

जळगाव प्रतिनिधी   तालुक्यातील नंदगाव येथील जि.प.मराठी शाळेच्या मुख्य द्वारावरील सरपंच व सहकारीचे टाकलेले नाव हे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हे नावे तात्काळ हटविण्यात आली आहेत. याबाबतीत नंदगाव येथील ग्रामस्थांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत तक्रार नोंदवली होती. यानंतर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. नंदगाव येथील सरपंच भूषण पवार यांनी गावातील नुकत्याच बांधकाम झालेल्या सरकारी जि.प. शाळेच्या गेटवर बेकायदेशीररित्या स्वतःसह आपल्या सहका-याचे नाव टाकले होते. नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाकडे तक्रार केली. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गावातील जि.प. मराठी शाळेच्या इमारतीच्या मुख्य गेटचे काम नुकतेच ग्रामपंचायतीने चौदावे वित्त आयोग व रोजगार हमी योजनेतून ठेकेदाराकडून करून घेतलेले…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांच्यावर धाड टाकल्यानंतर आयकर खात्याने त्यांना आणखी एक दणका दिला. त्यांच्या ४१ संपत्ती जप्त केल्या. यात जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्याने २५ फेब्रुवारीला जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी धाड टाकली होती. तेव्हापासून तपासादरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आली आहे. २०१८ ते २००२ दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष असताना यशवंत जाधव यांनी बेकायदा मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या माध्यमातून ही संपत्ती खरेदी केली असावी असा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांचे मेहुणा विलाश मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव…

Read More

चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला हा निधी राजभवनात जमा न केल्याची माहिती समोर येत असल्याने किरीट सोमय्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. भाजपचे किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला निधीच काय झालं असा सवाल करीत सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला जमा न करता त्या पैशाचा स्वतःच्या कामासाठी खर्च केल्याचा आरोप शिवसेना युवासेनेने केला. किरीट सोमय्याने देशवासियांचा विश्वास घात करीत देशाची गद्दारी केल्याने किरीट सोमय्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका शिवसेनेने निवेदनात केली आहे. यावेळी शिवसेना शहर…

Read More

लोणार (गुलाब शेख) शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी मार्गदर्शनाखाली आयएनएस विक्रांत प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात किरीट सोमय्या व निल सोमय्या यांच्यावर देशद्रोही चा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी . शिवसेनेच्या वतीने लोणार येथील चौकात आंदोलन करण्यात आले . यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोच दहन करून त्यांच्याविरुध्द प्रचंड घोषणाबाजी केली . तसेच तहसीलदार प्रभारी पदी असलेल्या गायकवाड मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी युवासेना तालुका अध्यक्ष गजानन मापारी नगर सेवक डॉ.अनिल मापारी,कु.उ.बा.समितीचे माजी सभापती सुनिल…

Read More

गुगल मॅपमुळे एखादं ठिकाण शोधणं सोपं झालं आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि चुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हल्ली लोकांना पत्ता विचारण्याऐवजी गुगल मॅपवर लोकेशन सेट करून जाता येतं. त्यामुळे गुगल मॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच असतं. आता गुगल मॅप अ‍ॅपच्या माध्यमातून चालकांना आणखी एक मदत होणार आहे. गुगल मॅपवरून आता टोलची माहिती मिळणार आहे. इच्छित ठिकाणी जाण्यासाठी एकदा लोकेशन सेट केलं की, वाटेत येणारे टोल आणि त्याचं शुल्क किती आहे? याबाबत माहिती मिळणार आहे. त्याबरोबर या सुविधेद्वारे टोल मार्ग निवडायचा की टोल नसलेला मार्ग निवडायचा हे सुद्धा ठरवता येईल. भारत, इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेतील गुगल मॅप वापरणाऱ्यांना कोणत्याही…

Read More

नाशिक:- एका नदीच्या नावाने गिरणा प्रतिष्ठान उभं राहते आणि अविरत २३ वर्ष काम करत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नदीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्या नदीचा सन्मान आहे. गिरणाकाठचे नाव महाराष्ट्रभर पोहचविण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने गिरणा गौरव प्रतिष्ठाण या संस्थेला जाते. तसाच सन्मान नाशिक शहरातील गोदावरीचा देखील व्हावा यासाठी तिला स्वच्छ सुंदर ठेवणं आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर, गिरणा गौरव प्रतिष्ठाण नाशिक, आयोजित गिरणा गौरव पुरस्कार संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, जलतज्ञ…

Read More

मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअरमध्ये आज गुरुवारी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक कोसळत असताना येस बँकेच्या शेअरने तेजीची वाट धरली. सकाळच्या सत्रात येस बँकेच्या शेअरने ११ टक्क्यांची झेप घेत १६.२५ रुपयांवर गेला. या शेअरचा मागील वर्षभरातील हा उच्चांकी स्तर आहे. बँकेच्या पत मानांकनात वाढ झाल्याने शेअरला फायदा झाला असल्याचे शेअर विश्लेषकांनी म्हटले आहे. केअर रेटिंग्ज या संस्थेने येस बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर बाँडचे मानांकन बीबीबी+ इतके वाढवले असून त्याबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. येस बँकेकडून ५००० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी या बाँड्सला बीबीबी असे मानांकन देण्यात आले होते. या वृत्तानंतर येस बँकेच्या…

Read More

नवी दिल्ली : कुतूब मिनारमध्ये असलेल्या दोन प्राचीन गणेशमूर्ती हलवण्याबाबत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA) भारतीय पुरातत्त्व खात्याला पत्र पाठवले आहे. या गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी केली आहे. यानंतर मोदी सरकार याबाबत वेगाने कारवाई करत आहे. अनेक वर्षांपासून इथे असलेल्या या दोन गणेशमूर्ती लवकरच इतरत्र स्थलांतरित केल्या जाण्याची शक्यता आहे. इतिहास बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनार बांधले. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांची तोडफोड करून नवी वास्तू उभारली. त्याच ठिकाणी तेव्हापासून या दोन गणेशमूर्ती आहेत. या मूर्तींची पूजा करू द्या, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात…

Read More

१९६१ पासून ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवाची अखंड परंपरा प्रतिनिधी | पाडळसरे सालाबादप्रमाणे चालू असलेला चैत्रोत्सव कोरोनामुळे बंद होता मात्र या वर्षीही श्रीराम नवमी ,हनुमान जयंतीचा योग साधून पाडळसरे येथे चैत्रोत्सवाला सलग आठवडाभर धार्मिक कार्यक्रम अंबिका माता प्रतिष्ठाण व ग्रामस्थांनी आयोजित केले आहेत त्यात पुरोहित रवींद्र काळे व निमचे लक्ष्मण महाराज यांनी तीन दिवस गणेश यागाचे पूजन पठण होमहवन करून पंचमी पासून देवी भागवत परायनाने चैत्रोत्सवाला प्रारंभ होऊन दिनांक ९ एप्रिल पासून अखंड हरिनाम कीर्तन व श्रीमद भागवत संहिता पारायण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले असून दिनांक १६ रोजी हनुमान जयंतीला काल्याचा किर्तनाने महाप्रसाद वाटून सांगता होईल. हभप स्वर्गीय डोंगर…

Read More

यावल (सुरेश पाटील) येथील खाटीक वाड्यातील मटन मार्केट मधील बकऱ्यांच्या खाद्य टाकीला जाळी लावावी अशी मागणी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैजान अब्दुल गफ्फार शाह यांनी व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. यावल नगर परिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्याकडे आज दि.7मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खाटीक वाडा मटन मार्केट मधील बकरीचे खाद्य असलेल्या टाकीला आउटलेट ची सुविधा उपलब्ध करून तसेच टाकीवर जाळी लावण्यात यावी सदर टाकीमध्ये बकरीचे खाद्य व्यवसायिक टाकत असून टाकीचे आउटलेट सुद्धा व्यवस्थित नसल्याने सदर खाद्यामुळे टाकीत आळ्या पडल्या आहेत त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे म्हणून तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्यावी सुविधा उपलब्ध न…

Read More