विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी आईच्या निधनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने गावाला शीतशव पेटी जरंडी गावाला दिल्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला ऐन उन्हाळ्यात जरंडीच्या पाटील कुटुंबीयांनी स्व.आशाबाई रामदास पाटील यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने हा उपक्रम राबवून शीत शव पेटी भाजपा जिल्ह्याध्यक्ष विजय औताडे,उपाध्यक्ष अशोक गरुड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जरंडी ता.सोयगाव येथील सरपंचा वंदनाबाई पाटील यांच्या सासू स्व.आशाबाई रामदास पाटील यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सरपंच वंदनाबाई पाटील यांनी गावासाठी शीत शव पेटी स्वखर्चातून उपलब्ध करून दिली आहे पाटील कुटुंबाचा हा उपक्रम तालुकाभर चर्चेचा विषय ठरला आहे.राजेंद्र रामदास पाटील,कृषी भूषण रवींद्र पाटील,प्रतिष्ठित शेतकरी गोपाल पाटील यांच्या कल्पनेतून गावाला शीत शवपेटी सुपूर्द करण्यात आली.यावेळी विजय…
Author: Saimat
लोणार (गुलाब शेख) लोणार पोलीस ठाण्यात आज , ९ एप्रिल रोजी सकाळी शांतता समितीची सभा झाली पुढील काही दिवसांत येणारे सर्वधर्मीय सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करावे . सण – उत्सवांच्या मिरवणूकीत दारू पिऊन धिंगाणा करणारे तसेच शांतता भंग करणाऱ्यांची पोलीस गय करणार नाहीत अशा सूचना लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी दिल्या . लोणार शहरात आधी ज्या जुन्या मार्गांनी मिरवणूक निघत होती त्याच मार्गाने यंदाही मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येईल . डिजेला परवानगी राहणार नाही मात्र पारंपरिक वाद्यांना परवानगी राहील . रामनवमी , महात्मा फुले जयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त निघणारी मिरवणूक वेळेत काढावी व वेळेत संपवावी . मिरवणुकीत…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील यावल रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक घरात शिरल्याने एकाचा जागी मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की, शहरातील यावल रोडवरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या रस्त्यावर अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. दरम्यान, आज सकाळी यावल रोडवरून भरधाव वेगाने धावणार्या एमएच46 एएफ 5554 क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्या घराला धडक दिली. या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर, रस्त्यावर कट मारल्याने देखील…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटीच्या संतप्त संपकरी कर्मचाऱ्यांनी धडक दिली. त्यांनी शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केले, पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत निवासस्थानाच्या दिशेने चापलाही भिरकावल्या. या आंदोलनामुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता एक मोठी माहिती पुढे येत आहे. शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना बोलवून घेतले होते. यावेळी शरद पवारांनी आंदोलनासंदर्भातील संपूर्ण माहिती त्यांच्यकडून मागवून घेतली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वळसे पाटलांना भेटण्यासाठी बोलवले आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री, गृहमंत्री…
जळगाव प्रतिनिधी मेहरूण तलावाच्या काठावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या व्यक्तीचे नाव दिनेश भिकन पाटील वय ४५ राहणार रामेश्वर कॉलनी. या व्यक्तीची हत्या दगडाने ठेचून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मेहरूण तलावाच्या काठावरील झालेल्या खुनाची अधिक चौकशी एमआयडीसी पोलीस पथक करीत आहे.
धरणगाव प्रतिनिधी शहरातील भाटिया कुटुंबाला जळगाव या ठिकाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याप्रकरणी येथे भारतीय जनता पार्टी तर्फे आज सकाळी बालाजी मंदिरापासून ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले . मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते तसेच धरणगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये भाटिया समाजाचे कार्यकर्तेही फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चामध्ये महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. तसेच निरपराध कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोर्चाच्या वतीने संबंधित शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आले. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या सभेमध्ये धरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक ललित येवले यांनी…
जळगाव : हायवे दर्शन कॉलनी, जुना निमखेडी रोड येथील रहिवासी सौ. प्रमिलाबाई लक्ष्मण ढमाळ ( रा. शाहूनगर ) ( वय ७४ वर्षे ) यांचे आज शनिवार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. प्लॉट नं १ अ /२, गट नं ७८, हायवे दर्शन कॉलनी, जुना निमखेडी रोड, जळगाव येथील राहत्या घरून नेरी नाका येथे निघणार आहे. त्यांचे पश्चात पती, ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या रविंद्र, ईश्वर, आणि गोलाणी मार्केट येथील सर्वेश एटंरप्राईजेस या कुरियरचे संचालक उमेश ढमाळ यांच्या आई होत.
यावल (सुरेश पाटील) माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार तसेच दिलेल्या तक्रारीची संबंधितांनी चौकशी करून सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन तसेच पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांच्या सहकार्यांनी प्रकरणाची तत्काळ दखल घेत पाचोरा पीपल्स बँकेची दहा लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक निबंधक तथा पाचोरा पीपल्स बँकेचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाडवी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पाचोरा पीपल्स बँकेचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रताप बाबा पाडवी,समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा चालक(पांडव नगर,आदर्श नगर जळगाव) आणि कपिल प्रिंटर्स संचालक विलास जोगेंद्र बेंडाळे रा.जळगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची संशयित आरोपीतांची नावे आहेत. पाचोरा पीपल्स बँकेच्या सन 2011-12 ते 2015-16…
यावल (सुरेश पाटील) यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलना समोर म्हणजे यावल एसटीस्टँड पासून तर यावल पोलीस स्टेशन समोरील अंतरावर आणि बुरुज चौकापासून तर बोरावल गेटपर्यंत तसेच सुदर्शन चित्रमंदिर चौकात बेशिस्तपणे चारचाकी दुचाकी वाहनांसह अतिक्रमित दुकाने,हाथगाड्यावर व्यवसाय करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,यात यावल पोलीस मात्र मद्यप्राशन करणाऱ्या एका होमगार्ड सोबत आणि त्याच्या सल्ल्यानुसार100वाहनांपैकी फक्त एका वाहनधारकांवर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी,दमदाटी देऊन कारवाईचा देखावा करीत असल्याने आणि 95 टक्के वाहनधारकांना कारवाई न करता सोडून दिले जात असल्याने पोलिसांमध्ये कारवाई करण्याची हिंमत राहिलेली नाही असे संपूर्ण यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात…
जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयास मूळ जळगावचे रहिवासी असलेले व चेअरमन मुकुंद काबरा यांच्या ऍडव्हॉन्स बायो-ऍग्रोटेक लि. ठाणे या कंपनीच्या सीएसआर निधीतून ८० बेचेंस विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले. यावेळी रोटरीचे सहप्रांतपाल विष्णू भंगाळे, प्रेसिडेंट एन्क्ल्यु चेअरमन लक्ष्मीकांत मणियार, रुरुल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गोविंद महाजन, सचिव सुनील नारखेडे, सहसचिव राजेंद्र कोल्हे, गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ.निरज अग्रवाल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्या या भावनेने ठाणे येथील मुकुंद काबरा यांनी त्यांची जन्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यात सामाजिक भावनेने कंपनीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला असून भविष्यातही अधिक…