Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील १४८ गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदाने या योजनेतून  स्मशानभूमि बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष प्रमाणे १४ कोटी ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी १३ कोटी ३२ लक्ष निधी जिल्हा परिषदेला वितरीत देखील करण्यात आलेला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या  नियोजनामुळे जिल्ह्यातील ज्या गावांना अद्यापपर्यंत स्मशानभूमीचे  बांधकाम झालेले नव्हते अशा सर्वच ठिकाणी स्मशानभूमींची कामे मार्गी लागली आहे. तर, यामुळे अंत्यसंस्कार करतांना होणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव…

Read More

मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता महापालिका आणि स्थानिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आयाराम गयारामांची एंट्री सुरू झाली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी  यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. चित्रपटसृष्टी, कलाकार आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे आसावरी जोशी यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी…

Read More

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. तत्पूर्वी, पुन्हा अशी वर्तवणूक करू नये, अशी अट घालतानाच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. आज झालेल्या निर्णयानुसार, 15 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार राज्य सरकार तयार असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. मात्र गुन्हे मागे घेऊ शकत नाही, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल असे सांगितले आहे. निर्देश देताना हायकोर्टाने सांगितलं की, पुन्हा असे वर्तवणूक जर नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर…

Read More

फैजपुर : प्रतिनिधी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या एकूण चार जागा बिनविरोध निवडून आलेले आहे. या भटक्या विमुक्त जाती गटातून माधव हरी भोई तर महिला राखीव गटातून माजी नगरसेविका सौ. अनिता अरुण चौधरी व नगरसेविका शकुंतला मोतीराम भारंबे तर ओबीसी राखी या गटात विलास महारु महाजन अशा एकूण चार जागा शेतकरी विकास पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेले आहेत. महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी तीन अर्ज असल्याने सौ अमिता हेमराज चौधरी माजी नगराध्यक्ष यांनी सर्वांच्या विनंतीवरून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महिला राखीव गटातून दोघा जागा बिनविरोध निवडून आल्या ओबीसी गटात सुद्धा जवळपास पाच…

Read More

मलकापूर सतीश ढांगे  स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर येथे महाविद्यालयातिल महिला उद्योजक कक्षामार्फत जनजागृती कार्यक्रम प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातिल महिला उद्योजक कक्षाचे प्रेसिडेंट प्रा. तेजल खर्चे, अमरावती येथील एमएसएमई व स्टार्ट अप फोरम भारत च्या अध्यक्षा प्रगती तायडे तसेच महाविद्यालयातिल प्राध्यापिका मयुरी पाटील, संजीवनी वाडेकर, कोमल होले, ज्योती पाटील, स्नेहल पवार सह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. महिलांसाठी औद्योगिक धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या धोरणामागचा सरकारचा विचार म्हणजे एक महिला शिकली की कुटुंब शिकते हा जसा शाश्वत विचार आहे, त्याच धर्तीवर एक महिला उद्योजक…

Read More

मलकापूर सतीश ढांगे  शेतकर्यांचे जिवनमान उंचावण्याकरिता प्रत्येक सरकार विविध प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणते. त्या योजनांवर प्रत्येक सरकारचा शेतकरी बांधवांसाठी खर्च कमी, अन् जाहिरातीच जास्त दिसतात. पण प्रत्यक्षात या शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा कमि अन् मनस्तापच अधिक असल्याच्या वाईट अनुभव आहे.त्यातिलच एका शेतकरी बांधवाकरीता राबविली जाणारी शेतकरी सिंचन योजना .या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना सिंचनासाठी व सिंचनावर आथारीत उपाय योजनांसाठी .शेतकरी बांधवांना मदत केली जाते.पण ही मदत कोटी गरजु शेतकऱ्यानं पर्यंत पोहचत असेल याबाबत तरी एक शेतकरी म्हणुन आज तरी शंकांच येत आहे.नानाजी देशमुख योजना शेती सिंचनाच्या सोई पासुन तर फळबागे पर्यंतच्या सर्व सुविधा शेतकरी बांधवांना अनुदानाच्या माध्यमातुन पुरविते.…

Read More

पहुर प्रतिनिधी   जामनेर तालुक्यातील पहुर कसबे सोसायटीचा मनमानी कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जामनेर तालुक्यातील पहूर कसबे सोसायटी मध्ये गावातील नागरिक अनेक कामांसाठी पहुर कसबे सोसायटी येथे कामानिमित्त येत असतात मात्र आज सकाळी साडेदहा वाजले तरीही पहुर कसबे सोसायटी बंद होती त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पायी परतावे लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहेत. पहुर कसबे व पहुर पेठ सोसायटीत एकच सेक्रेटरी काम पाहत आहेत त्यामुळे पहुर कसबे सोसायटी मध्ये नविन सेक्रेटरी यांची नियुक्ती करा अशी मागणी केली जात आहेत. कर्मचारी गेले कोठे ? – पहुर कसबे सोसायटी रोज सकाळी आठ…

Read More

पाचोरा प्रतिनिधी  आगामी काळात होऊ घातलेल्या महात्मा ज्योतीराव फुले, भगवान महावीर व डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने दि १० रविवारी रोजी पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल येथे सकाळी ९.३०वाजता खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली असून या निमित्ताने परिक्षार्थींची आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी देखील करता येणार असल्याने अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.   आगामी काळात विविध शासनाच्या भरती प्रक्रियेत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा शासनस्तरावर झाली असून त्यादृष्टीने…

Read More

मलकापूर  प्रतिनिधी सतीश ढांगे मलकापूर 5/4/22येथील बौद्ध युवकास जातिवाद्यांनी जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत  जातीवाचक शिवीगाळ करीत चार चाकी वाहनांची केली तोडफोड ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपी अद्याप मोकाट…  सविस्तर असे की  पंतनगर येथे बौद्ध समाजातील संघर्ष आत्माराम सुरडकर वय 37 याला मयूर होंबे  वय 25 रा. शिवाजीनगर व कार्तिक हांडगे वय 30 वर्ष रा. सावजी फेल मलकापूर यांनी विष्णू इंगळे रा. कुंड याच्या फोनवरून फोन केला  व त्यावरून मयूर होंबे हा मला म्हणाला की तुझ्या फायद्याचं काम आहे तू लवकर जगू मामाच्या धाब्यावर ये यावरून मी घरून 7:30 च्या सुमारास  जग्गू मामा च्या धाब्यावर गेलो असता तेथे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी   अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे 8 ते 13 एप्रिलदरम्यान सहादिवसीय राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी भारतभरातील नावाजलेले 10 पुरुष व महिला ग्रँडमास्टर, 13 आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेमार्फत चार अधिक एक राखीव संघ पाठवले जाणार असल्याची माहिती काल संघटनेने पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजित होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी 90 मिनिटे व प्रत्येक चालीसाठी 30…

Read More