यावल (सुरेश पाटील) 24 एप्रिल हा दिवस “पंचायती राज दिन” म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून आता राज्यांमध्ये ग्रामसभा आयोजना बरोबरच बाल सभा आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे,त्यासंदर्भात बाल सभा आयोजना विषयी महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायती राज अपर मुख्य सचिव यांनी दि.8 एप्रिल2022रोजी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश काढले आहेत. अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की 11 ते 18 वयोगटातील बालकांची “बालसभा” सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दि.24 एप्रिल2022 रोजी स्थानिक सोयीच्या वेळेनुसार आयोजित करावी,बाल सभेचे हजेरीपट व चर्चेला आलेले विषय याची नोंद स्वतंत्र रजिस्टर मध्ये करावी,बाल सभेचा एक फोटो घेण्यात यावा,…
Author: Saimat
लोणार(गुलाब शेख) महावितरणकडून रात्री बेरात्री केले जाणारे अतिरिक्त भरनियमन तत्काळ बंद करा , अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केली आहे . भागात गेल्या पंधरा दिवसांपासून लोणार शहरात तसेच ग्रामीण महावितरणकडून मनात आले तसे 3 ते 4 तासाचे अतिरिक भारनियमन सुरु केले आहे . यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .कडक उन्हाळा असून रमजानचा महीना सुरु आहे . मुस्लिम बांधव संध्याकाळी रोजे सोडतात .त्यावेळी भारनियमन केल्या जाते ते करण्यात येऊ नये सध्या रामनवमी , हनुमान जयंती , महावीर जयंती , डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती , असे हिन्दु मुसलीमचे सन आहेत . , जिल्ह्यात कुठेही भारनियमन…
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी पोलीस पथकाने काल दि.9रोजी यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात यावल पोलीस स्टेशन पासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर पिंप्री शिवारात तापी नदी पात्राचे काठवर एकूण 3 ठिकाणी एकाच दिवशी धाडी टाकून गुळ,मोह मिश्रित कच्चे-पक्के रसायन एकूण 2100 लिटर,हातभट्टीची दारू 75 लिटर व इतर साहित्य असा एकूण 42 हजार रुपयांचा माल हस्तगत केला.यामुळे यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध धंदे चालकांसह यावल पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. डिवायएसपी पथकाने कारवाई केल्याने यावल पोलीस दलात खांदेपालट होत नसल्याने तसेच काही ठराविक पोलिसांनाच काही महत्त्वाची कामे दिली जात असल्याने आणि गेल्या…
भडगाव प्रतिनिधी : अमिन पिंजारी भडगाव तालुका येथे देशाचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी समाजकंटकांनी हल्ला केल्याने आज रोजी भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन व कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार भडगाव. यांना जाहीर निषेधचे निवेदन देण्यात आले. यावेळी भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष. राहुल पाटील युवक अध्यक्ष. स्वप्नील पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष. अरुण सोनवणे, शहराध्यक्ष शामकांत भोसले, महिला अध्यक्ष रेखाताई पाटील, युवती अध्यक्ष दक्षता पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुभाष पाटील, इसाक मलिक, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना ताई पाटील, डॉक्टर विजय…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी आईच्या निधनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने गावाला शीतशव पेटी जरंडी गावाला दिल्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला ऐन उन्हाळ्यात जरंडीच्या पाटील कुटुंबीयांनी स्व.आशाबाई रामदास पाटील यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने हा उपक्रम राबवून शीत शव पेटी भाजपा जिल्ह्याध्यक्ष विजय औताडे,उपाध्यक्ष अशोक गरुड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जरंडी ता.सोयगाव येथील सरपंचा वंदनाबाई पाटील यांच्या सासू स्व.आशाबाई रामदास पाटील यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सरपंच वंदनाबाई पाटील यांनी गावासाठी शीत शव पेटी स्वखर्चातून उपलब्ध करून दिली आहे पाटील कुटुंबाचा हा उपक्रम तालुकाभर चर्चेचा विषय ठरला आहे.राजेंद्र रामदास पाटील,कृषी भूषण रवींद्र पाटील,प्रतिष्ठित शेतकरी गोपाल पाटील यांच्या कल्पनेतून गावाला शीत शवपेटी सुपूर्द करण्यात आली.यावेळी विजय…
लोणार (गुलाब शेख) लोणार पोलीस ठाण्यात आज , ९ एप्रिल रोजी सकाळी शांतता समितीची सभा झाली पुढील काही दिवसांत येणारे सर्वधर्मीय सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करावे . सण – उत्सवांच्या मिरवणूकीत दारू पिऊन धिंगाणा करणारे तसेच शांतता भंग करणाऱ्यांची पोलीस गय करणार नाहीत अशा सूचना लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी दिल्या . लोणार शहरात आधी ज्या जुन्या मार्गांनी मिरवणूक निघत होती त्याच मार्गाने यंदाही मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येईल . डिजेला परवानगी राहणार नाही मात्र पारंपरिक वाद्यांना परवानगी राहील . रामनवमी , महात्मा फुले जयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त निघणारी मिरवणूक वेळेत काढावी व वेळेत संपवावी . मिरवणुकीत…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील यावल रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक घरात शिरल्याने एकाचा जागी मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की, शहरातील यावल रोडवरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या रस्त्यावर अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. दरम्यान, आज सकाळी यावल रोडवरून भरधाव वेगाने धावणार्या एमएच46 एएफ 5554 क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्या घराला धडक दिली. या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर, रस्त्यावर कट मारल्याने देखील…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटीच्या संतप्त संपकरी कर्मचाऱ्यांनी धडक दिली. त्यांनी शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केले, पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत निवासस्थानाच्या दिशेने चापलाही भिरकावल्या. या आंदोलनामुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता एक मोठी माहिती पुढे येत आहे. शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना बोलवून घेतले होते. यावेळी शरद पवारांनी आंदोलनासंदर्भातील संपूर्ण माहिती त्यांच्यकडून मागवून घेतली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वळसे पाटलांना भेटण्यासाठी बोलवले आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री, गृहमंत्री…
जळगाव प्रतिनिधी मेहरूण तलावाच्या काठावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या व्यक्तीचे नाव दिनेश भिकन पाटील वय ४५ राहणार रामेश्वर कॉलनी. या व्यक्तीची हत्या दगडाने ठेचून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मेहरूण तलावाच्या काठावरील झालेल्या खुनाची अधिक चौकशी एमआयडीसी पोलीस पथक करीत आहे.
धरणगाव प्रतिनिधी शहरातील भाटिया कुटुंबाला जळगाव या ठिकाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याप्रकरणी येथे भारतीय जनता पार्टी तर्फे आज सकाळी बालाजी मंदिरापासून ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले . मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते तसेच धरणगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये भाटिया समाजाचे कार्यकर्तेही फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चामध्ये महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. तसेच निरपराध कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोर्चाच्या वतीने संबंधित शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आले. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या सभेमध्ये धरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक ललित येवले यांनी…