Author: Saimat

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना करण्यात आली असून 11 एप्रिल 2022 रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाचा 11वा वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हास्तरीय विशेष प्रबोधनाचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी खटाव तालुक्यातील “कटगुण” येथे जयंती आणि वर्धापनदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..! या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महात्मा फुले यांचे जीवन संघर्षाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजकार्यात उतरावे असे आवाहन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.समीर मुजावर सर (राज्य प्रचारक,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यापेक्षा महापुरुषांचे अपुर्ण राहिले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी ठरणार्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम येत्या दिड महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती स्थानिक अभियंत्यांनी दिली असल्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज शेळगाव बॅरेज प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक अभियंत्यांशीही प्रकल्पाबाबत चर्चा केली. फेब्रूवारीमध्ये या बॅरेजला गेट बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात असून पुढील दिड महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती अभियंत्यांनी डॉ. उल्हास पाटील यांना दिली. हे काम दिड महिन्यात पूर्ण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पाण्याची साठवण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे  सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर मा. आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे. गेल्या फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर देखील वाढला आहे. त्यामुळे राज्यात २८,००० मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते होणे गरजेचे आहे यासाठी  ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मिती वर विशेष लक्ष केंद्रित केले असून या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरे रस्त्याचे भूमिपूजन तसेच वराड बु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 (हायवे पर्यंत) या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे  लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी याच प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरेरस्त्यावर २कोटी ६४ लाख निधी खर्च करून मोठ्या पुलाचे काम पूर्ण करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून मुसळी येथे याच योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. ही पाणी पुरवठा योजना मुसळी गावाला नवसंजीवनी प्रदान करेल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जल जीवन मिशन योजने अंतर्गत मुसळी येथे ७६ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचा व ३२ लाखाच्या गावंतर्गत विविध विकास कामांचा असा एकूण १ कोटी च्या कामांचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपण परिसरातील विकासकामांना प्रचंड…

Read More

मेष: कौटुंबिक जीवन समाधानकारक असेल आणि तुमचा जोडीदार तुमचा सहाय्यक सिद्ध होईल. तुमचे वैवाहिक जीवन काही चिरस्थायी प्रेमाच्या क्षणांसह एक सुंदर वळण घेईल. मित्रांसह स्वारस्ये, अनुभव आणि कल्पना सामायिक केल्याने तुमचा उत्साह वाढेल. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक काही लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो. वृषभ : तुम्ही तुमच्या गोड आणि वाजवी बोलण्याने तुमच्या प्रियकराचे मन जिंकू शकाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. मिथुन: आज तुम्ही सुखी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवनाचा आनंद लुटू शकाल. तुमचा कोणाशीतरी अध्‍यात्मिक संबंध…

Read More

  जामनेर(प्रतिनिधी): – आदर्श राजा व आज्ञाधारक पुत्र असावा तर श्री रामा सारखा, केवळ वडिलांनी दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी श्री रामाने राज सिंहासनाचा व कौटुंबिक सुखाचा त्याग केला. अशा प्रभू रामाचा सर्वानी आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन धुळे येथील नीलाताई रानडे यांनी येथे आयोजित रामायण कथा वाचन प्रसंगी केले.          ब्राह्मण संघाकडून  येथील दत्त मंदिरात कथा वाचन कार्यक्रम घेण्यात आला. यांचे स्वागत संगीत कुलकर्णी यांनी केले. पतिव्रता सीतेसारखी असावी, तर भाऊ लक्ष्मण व भरत सारखे असावे  हे रामायणातून दिसून येते. रामायण हा केवळ ग्रंथ नाही, तर विचार आहे, असेही रानडे यांनी सांगितले.ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ नरेंद्र   कुलकर्णी…

Read More

चोपडा –  प्रतिनिधी  तालुक्यातील मौजे कोळंबा व वडगावसिम शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला असून आता तर गावाजवळून बकरी, म्हशीचे पारडु व कुत्रे उचलुन घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी बघितले आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकरी, शेतमजूर, गुराखी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडगावसिम येथील पितांबर भिल यांचे शेळीचे पिल्लु व कोळंबा हायस्कूल जवळील एका खळ्यातून कुत्रा व म्हशीचे पारडु बिबट्याने उचलून नेल्याचे बाळू देवराम कोळी यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. शेतकरी अंबादास कोळी हे…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी उन्हाच्या तडाख्याने लाही लाही झालेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चक्क ग्रामपंचायतीने दखल घेत गावालगत असलेला पाण्याचा हौदाला पाईपलाईन करून पाण्याने हौद भरून ठेवून जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी घोसला ग्रामपंचायतीने एक पावूल उचलले आहे.यासाठी सरपंच सुवर्नाबाई वाघ,उपसरपंच सुभाष बावस्कर,यांनी पुढाकार घेतला आहे.ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेवून एकाच रात्रीतून या हौदाला जोडणी करणारी पाईपलाईन जोडली आहे.त्यामुळे घोसला परिसरातील जनावरांच्या घशाची कोरड आता दूर झाली आहे. घोसला गावालगत असलेल्या हौदात ग्रामपंचायतीने पाणी जोडणी करून जनावरांच्या घशाची तहान दूर केली आहे.सध्या परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असतांना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असल्याने घोसला ग्राम पंचायतीने मात्र जनावरे आणि पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण…

Read More