Author: Saimat

दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी ‘इन्फोसिस’ (Infosys) ने बुधवारी रशियामधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर, जगभरामधील अनेक बड्या कंपन्यांनी रशियाच्या निषेधात थेतील काम बंद केले आहे. यामध्ये वाहन क्षेत्रातील कंपन्यांसोबत माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. त्यानंतर शेकडो परदेशी कंपन्यांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपला रशियामधील उद्योग पूर्णपणे बंद करुन गाशा गुंडाळला. गुंतवणूकदार आणि ग्राहकांकडून असणाऱ्या दबावामुळे पाश्चिमात्य देशांमधील अनेक कम्पन्यायांना हा निर्णय घ्यावा लागला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सॅप आणि ओरॅकल या दोन मोठ्या कंपन्यांनी रशियामधील व्यवसाय आधीच बंद केला आहे. युक्रेनचे उपराष्ट्राध्यक्ष मखायलो फेड्रोव्ह यांनी…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल, सोयगांव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आज रोजी शाळेच्या कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ. दादासाहेब पवार यांनी पुजन करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस, श्रीमती मनिषा पाटील, विद्या पाटील, पुजा सोनुने, मुश्ताक शहा आदी उपस्थित होते.

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी तालुक्यातील पळसखेडा येथे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकार भगवान महावीर याची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली यावेळी सर्व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जैन स्थानक येथून पारंपारिक पद्धतीने बैलगाडीवर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली हनुमान मंदिर मार्गे ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व समाज बांधवांनी तर्फे भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन महिलांन तर्फे ग्रामपंचायत कार्यालय पळासखेडा येथे करण्यात आले त्याच बरोबर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन सर्व समाज बांधवांना तर्फे करण्यात आले. महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांना या दिवशी कामात यश मिळेल. आज तुमच्या मनात कोणताही नवीन व्यवसाय, नवीन काम सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो किंवा तो प्रत्यक्ष कृतीत उतरू शकतो. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. जोखीमीची कामे टाळा. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचे मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद घ्याल. व्यवसायात चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली सुरुवात करणारा आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी पुण्यात एका पत्रकाराला अटक करण्यात आली. चौकशीसाठी आज दुपारी त्याला मुंबईमध्ये आणले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत ११५ जणांना अटक करण्यात आली असून एकूण १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘एमजेटी मराठी न्यूज’ हे यू-ट्युब चॅनल चालविणारा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. याच प्रकरणामध्ये ११ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आहे. आंदोलनाच्या दिवशी सदावर्ते हे नागपूर येथील…

Read More

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार  यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला पूर्व नियोजित होता. गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती. ही माहिती कायदा व सुव्यवस्था बघणारे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लपविली. त्यांना निलंबित करून चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी अकोला  पत्रकार परिषदेत केली. घटनेच्या चार दिवस आधी, एप्रिल २०२२ रोजी या हल्ल्याची शक्यता वर्तविणारा सविस्तर अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून सहपोलिस आयुक्तांना देण्यात आला होता. या अहवालात मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’, आझाद मैदान मंत्रालय, सह्याद्री अतिथिगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय व…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून व मदतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत ज्यामध्ये जलसंधारण, आरोग्य शिक्षण तसेच रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे परिपूर्ण असे स्कूल किट तालुक्यातील  शाळांमध्ये वाटप करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिरसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सेवा सहयोगचे गुणवंतदादा सोनवणे यांनी सांगितले की,आपण समाजाचं एक देण लागतो ही भावना बालपनापासून  निर्माण झाली पाहिजे.आपल्यापासून लोकांना काही फायदा होऊ शकतो का?तसेच आचरण आपले असावे.शाळेचा शैक्षणिक…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुकयातील नगरदेवळा येथे दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील इसमाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुकयातील नगरदेवळा येथे मंगळवारी  पिडीत बालिका घरी नसताना बालिकेच्या आईने शोध घेतला असता. आईला बालिका  संशयिताच्या  सुभाष महाजन याच्या घरातून बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रकार उघड झाला. संशयीत सुभाष महाजन हा त्याच्या घरात बालिकेवर अतिप्रसंग करत असल्याचे परिसरातील लोकांना दिसून आले. गल्लीतील लोकांनी सुभाष महाजन यास मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास…

Read More

मुंबई प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते पोहोचत आहेत. दुसरीकडे भावाला भेटण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेदेखील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. धनंजय मुंडे यांना मंगळवारी अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार यांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण…

Read More