मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी तलवार उंचावली होती. यामुळे त्यांच्यावर याच कारणाने गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाचाही तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणही गुन्हा दाखल होऊ शकते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात तलावर उंचावल्याने मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली…
Author: Saimat
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील सातपुडा डोंगरात अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या गावातील एका आदीवासी अविवाहीत तरुणीला विषारी सर्पदंश झाल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.या संदर्भात सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गाडऱ्या तालुका यावल या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम गावात राहणाऱ्या फुगली भाया बारेला ही22 वर्ष ही तरूणी काल दि.12 एप्रील रोजी आपल्या कुटुंबा सोबत गाडऱ्या शिवारातील आपल्या शेतात सकाळी9ते 9:30च्या सुमारास तुर कापणीचे काम करीत असतांना अचानक एका विषारी सर्याने तिच्या उजव्या हातावर दंश केला,सदर दंश करणारा साप हा अत्यंत विषारी असल्याने त्या तरूणीचा जागेवर मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.सदरची तरूणीला सर्पदंश झाल्याची माहीती मिळताच गावातील सरपंच भरत छ्तरसिंग बारेला पोलीस पाटील तेरसिंग गाठु…
मेष : आज मेष राशीचे लोकं एखादे महत्वाचे काम पूर्ण झाल्याने आनंदी राहतील. आज तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. वचन पूर्ण न केल्यामुळे मित्र नाराज होऊ शकतात. या दिवशी तुमची हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीचे लोक आज शरीर आणि मनाने आनंदी व प्रफुल्लित राहतील. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकता. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी असेल. एकत्र काम करणाऱ्यांकडून तुम्हाला आनंद मिळेल. लोकांमध्ये सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. प्रमोशनसुद्धा…
कळवन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून, पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. आज कामदा एकादशी सकाळची पंचामृत महापूजा मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद श्रीमती लिना बनसोड यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली या वेळी संस्थानचे व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान…
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना करण्यात आली असून 11 एप्रिल 2022 रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाचा 11वा वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हास्तरीय विशेष प्रबोधनाचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी खटाव तालुक्यातील “कटगुण” येथे जयंती आणि वर्धापनदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..! या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महात्मा फुले यांचे जीवन संघर्षाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजकार्यात उतरावे असे आवाहन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.समीर मुजावर सर (राज्य प्रचारक,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यापेक्षा महापुरुषांचे अपुर्ण राहिले…
जळगाव : प्रतिनिधी यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी ठरणार्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम येत्या दिड महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती स्थानिक अभियंत्यांनी दिली असल्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज शेळगाव बॅरेज प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक अभियंत्यांशीही प्रकल्पाबाबत चर्चा केली. फेब्रूवारीमध्ये या बॅरेजला गेट बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात असून पुढील दिड महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती अभियंत्यांनी डॉ. उल्हास पाटील यांना दिली. हे काम दिड महिन्यात पूर्ण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पाण्याची साठवण…
जळगाव : प्रतिनिधी विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर मा. आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे. गेल्या फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर देखील वाढला आहे. त्यामुळे राज्यात २८,००० मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या…
जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते होणे गरजेचे आहे यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मिती वर विशेष लक्ष केंद्रित केले असून या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरे रस्त्याचे भूमिपूजन तसेच वराड बु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 (हायवे पर्यंत) या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी याच प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरेरस्त्यावर २कोटी ६४ लाख निधी खर्च करून मोठ्या पुलाचे काम पूर्ण करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून मुसळी येथे याच योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. ही पाणी पुरवठा योजना मुसळी गावाला नवसंजीवनी प्रदान करेल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जल जीवन मिशन योजने अंतर्गत मुसळी येथे ७६ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचा व ३२ लाखाच्या गावंतर्गत विविध विकास कामांचा असा एकूण १ कोटी च्या कामांचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपण परिसरातील विकासकामांना प्रचंड…