Author: Saimat

जळगाव :  प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराचे शुभारंभ करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या शिबिरा प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ.स्वप्नील कोठारी,दंत तज्ञ डॉ अनुजा पाटील. व ऍड.प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी जळगाव शहर महानगर कार्या अध्यक्ष योगेश हिवरकर. यांनी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या जश्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचा प्रमाणे प्रत्येक मानवाचे आरोग्य देखील हे खूप महत्त्वाचे आहे आरोग्य उत्तम तर मानव जीवन सुखी असे मनोगतात व्यक्त करण्यात आले.या शिबीर प्रसंगी…

Read More

गेल्या महिन्यापासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे मे महिना येण्याआधीच उन्हाच्या झळा आणि तीव्र चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाचे शरीरावर आणि आरोग्यावरही परिणाम होत असून विविध विकार या काळात डोके वर काढतात. मूत्रमार्गाचे विकार उन्हाळय़ातील वातावरणातल्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन लघवीचे प्रमाण कमी होते. लघवी होताना जळजळ होते. लघवी पिवळी किंवा प्रसंगी तांबडट रंगाची होते. याबरोबरच मूत्रामध्ये जंतुसंसर्ग होऊन थंडी-ताप येऊ शकतो. मूत्रिपडात किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होऊ शकतात. ज्यांना हा त्रास पूर्वी होऊन गेला आहे अशांना पुनश्च तो त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते. मूत्रमार्गाचे किंवा मूत्रिपडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करावा. पोटाचे…

Read More

मुंबई प्रतिनिधी  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई विमानतळावर एका परदेशी व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून ३.९८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनची किंमत २४ कोटी रुपये इतकी आहे. या मंगळवारी केलेल्या कारवाईमध्ये एका दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला एनसीबीने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती एनसीबीने दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई विमानतळावरुन या व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येऊन मुंबईत आलीय. या व्यक्तीकडे असणाऱ्या ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता…

Read More

जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला परतूरमध्ये अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जाताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर स्कॉर्पिओ आदळली. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला. एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक…

Read More

 जळगांव प्रतिनिधी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात  साजरी करण्यात आली.       याप्रसंगी प्रगती विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा फेगडे, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. संध्या अट्रावलकर आदी मान्यवर व्यासपीठावर आमंत्रित होते. व्यासपीठावरील पाहुण्यांनी श्रद्धापूर्वक नतमस्तक होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आणि भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.  या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात शोभा फेगडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने उपस्थित शिक्षकांना व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. व डॉ. बाबासाहेबांचे मौलिक विचार व बाबासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य याबाबत…

Read More

प्रतिनिधी कळवण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून, पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. आज सकाळची पंचामृत महापूजा विश्वस्त तथा तहसिलदार, कळवण श्री बंडू कापसे व विश्वस्त ऍड श्री ललित निकम यांच्या संयुक्तिक हस्ते व सहकुटुंब करण्यात आली या वेळी संस्थानचे व्यवस्थापक श्री. सुदर्शन…

Read More

मुंबई प्रतिनिधी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.  यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी भदन्त धम्मप्रिय यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर मान्यवरांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक प्रदर्शन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या…

Read More

पाळधी प्रतिनिधी  पाळधी बु ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत उत्पन्नामधून 5 टक्के निधी दिव्यागांना मदत म्हणून वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील म्हणाले की दिव्यागांना आपण मदत हा शब्द न वापरता सहकार्य म्हटले पाहिजे, दिव्यांग सुद्धा आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. आपण हा निधी वाटप करून समाजाच्या या घटकाचे ऋण फेडत आहोत. पाळधी बु ग्रामपंचायत तर्फे सुमारे 25 दिव्यांग बंधू भगिनींना चेक वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच प्रकाश नाना पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण माळी, अकबर पठाण, प्रकाश ठाकूर, तुषार मोरे, श्रीराम पाटील, रोहित शिरोळे, सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  मुक्ताईनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीपेक्षा व्दिगुणित उत्साहात पार पडणार असून , त्यामुळे यंदा बाबासाहेबांच्या अनुयायांचा उत्साह वाढणार आहे. गुरुवार १४ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर  येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून जयंती उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयंती दिनी सकाळ पासूनच प्रवर्तन चौकातील शाहू – फुले- डॉ आंबेडकर महापुरुषांच्या स्मारकांना माल्यार्पण व अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. यामिनीताई चंद्रकांत पाटील यांच्या सह शिवसेना पदाधिकऱ्यांनीही महापुरुषांच्या स्मारकांना माल्यार्पण करून अभिवादन केले.     प्रसंगी शिवसेना तालुका…

Read More