चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून व मदतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत ज्यामध्ये जलसंधारण, आरोग्य शिक्षण तसेच रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे परिपूर्ण असे स्कूल किट तालुक्यातील शाळांमध्ये वाटप करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिरसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सेवा सहयोगचे गुणवंतदादा सोनवणे यांनी सांगितले की,आपण समाजाचं एक देण लागतो ही भावना बालपनापासून निर्माण झाली पाहिजे.आपल्यापासून लोकांना काही फायदा होऊ शकतो का?तसेच आचरण आपले असावे.शाळेचा शैक्षणिक…
Author: Saimat
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुकयातील नगरदेवळा येथे दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील इसमाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुकयातील नगरदेवळा येथे मंगळवारी पिडीत बालिका घरी नसताना बालिकेच्या आईने शोध घेतला असता. आईला बालिका संशयिताच्या सुभाष महाजन याच्या घरातून बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रकार उघड झाला. संशयीत सुभाष महाजन हा त्याच्या घरात बालिकेवर अतिप्रसंग करत असल्याचे परिसरातील लोकांना दिसून आले. गल्लीतील लोकांनी सुभाष महाजन यास मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास…
मुंबई प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते पोहोचत आहेत. दुसरीकडे भावाला भेटण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेदेखील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. धनंजय मुंडे यांना मंगळवारी अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार यांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण…
जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेस संबोधित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी महापौर ललित कोल्हे,राजेश झाल्टे, उपायुक्त विद्याताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी या अभिवादन सभेत जळगाव शहरातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. शहर…
जळगाव : प्रतिनिधी २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे छातीठोकपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी कासावीस झाले आहे, मात्र आता ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, असा चिमटा राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी काढला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी जळगाव येथे येणार आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, मनीष जैन आदी उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले, मागील अडीच वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत…
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे यांनी काल आपल्या उत्तर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषर घेत उत्तर दिले आहे. राज्य सरकारला कुणीही अल्टीमेटम देऊ शकत नाही. ती ताकद या देशात फक्त फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती, असे राऊत यांनी सुनावले. तसेच, काल ठाण्यात वाजलेला भोंगा हा भाजपचाच होता. भाजपला महाविकास आघाडीविरोधात सरळ राजकारण करता येत नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेंना पुढे आणल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. हिंदुत्व आमच्या रक्तात! हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. ज्यावेळी…
चोपडा – प्रतिनिधी येथील नगरपरिषद क्षेत्रातील कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देणेचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. चोपडा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी कै.प्रताप माधवराव बाविस्कर, शिपाई यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने तसेच कै.संजय जिजाबराव साळुंखे, मजुर, पाणीपुरवठा विभाग यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी चोपडा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता. चोपडा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झाले. प्रती मयत कर्मचारी रक्कम रु.50…
जळगाव प्रतिनिधी नवजीवन शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेतर्फे ११ एप्रिल रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचा कार्यक्रम राजाराम मंगल कार्यालय इंद्रप्रस्थ नगर येथे संपन्न झाला. हा सोहळा जिल्हा स्तरावर घेण्यात आला असून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गावांहून तेरा बटूंची उपस्थिती लाभली. नवजीवन शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २०२० मध्ये झाली असून, समाज हितासाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले आहेत. यात परशुराम जयंती, covid-19 मध्ये गरजूंना मदत, किराणा वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटप आदी कामांचा समावेश आहे. सदर संस्थेचे सात लोकांचे कार्यकारी मंडळ असून संजय लक्ष्मण जोशी, कुणाल जितेंद्र अत्रे, आनंद सुधाकर जोशी, विवेक प्रकाश जोशी, दीपक गजानन काळे, देवा दिगंबर काळे, केतन संजय…
लोणार (गुलाब शेख) लोणार येथे विज वितरण कंपनी सहायक अभियंता यांना लोणार शहर बुलढाणा जिल्हा कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग शहरात होत असलेल्या भारनियमनच्या विरोधात निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद करण्यात आले कि ३ एप्रिल पासुन मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महीना सुरू झाला असुन,यामध्ये उपवास (रोजा) ठेवण्यासाठी मुस्लिम समाज सुर्य उगवण्याच्या आधी अंधारात सहेरी (जेवण) करण्यासाठी उठत असतो आणि दिवसभर उपाशी राहुन संध्याकाळी उपवास सोडत असतात,परंतु सध्या उन्हाचा पारा दिवसेदिवस वाढत आहे. रोजे ठेवणार्या बांधवांना भारनियमन होत असल्यामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे. तरी महोदय साहेब आपण रमजान महीन्यामध्ये होत असलेले भारनियमन बंद करुन विज पुरवठा सुरळित ठेवावा अशी मागणी…