Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात त्यांच्यासमवेत राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब, जलसंपदामंत्री मा.ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचीही उपस्थिती लाभणार आहे. आज शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचेसुद्धा आगमन झाले. जळगाव शहरातर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच…
मेष : आज मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. वृषभ : सरकारकडून तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतात. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. मिथुन: मिथुन राशीच्या व्यावसायिकांना व्यवसायात नवीन नातेसंबंध आणि सौदे पूर्ण करण्यासाठी हा काळ…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा येथे शेतात गेल्याच्या कारणावरुन तरुणाला काठीने मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील उमाळा येथे बिराडे गल्लीत ज्ञानेश्वर अमृत बिऱ्हाडे वय ३० हा तरुण वास्तव्यास आहे. तो शेती करुन उदरनिर्वाह भागवितो. १२ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर हा त्यांच्या गावातील रघुनाथ साहेबराव चव्हाण यांच्या शेतात गेला होता. शेतात गेल्याचे वाईट वाटल्याने शेतमालक रघुनाथ चव्हाण यांच्यासह इतर दोन जणांनी ज्ञानेश्वर यास डोक्यावर तसेच पाठीवर पायावर काठीने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेत ज्ञानेश्वर हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी रघुनाथ चव्हाण, शुभम…
जळगाव : प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराचे शुभारंभ करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या शिबिरा प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ.स्वप्नील कोठारी,दंत तज्ञ डॉ अनुजा पाटील. व ऍड.प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी जळगाव शहर महानगर कार्या अध्यक्ष योगेश हिवरकर. यांनी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या जश्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचा प्रमाणे प्रत्येक मानवाचे आरोग्य देखील हे खूप महत्त्वाचे आहे आरोग्य उत्तम तर मानव जीवन सुखी असे मनोगतात व्यक्त करण्यात आले.या शिबीर प्रसंगी…
गेल्या महिन्यापासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे मे महिना येण्याआधीच उन्हाच्या झळा आणि तीव्र चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाचे शरीरावर आणि आरोग्यावरही परिणाम होत असून विविध विकार या काळात डोके वर काढतात. मूत्रमार्गाचे विकार उन्हाळय़ातील वातावरणातल्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन लघवीचे प्रमाण कमी होते. लघवी होताना जळजळ होते. लघवी पिवळी किंवा प्रसंगी तांबडट रंगाची होते. याबरोबरच मूत्रामध्ये जंतुसंसर्ग होऊन थंडी-ताप येऊ शकतो. मूत्रिपडात किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होऊ शकतात. ज्यांना हा त्रास पूर्वी होऊन गेला आहे अशांना पुनश्च तो त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते. मूत्रमार्गाचे किंवा मूत्रिपडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करावा. पोटाचे…
मुंबई प्रतिनिधी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई विमानतळावर एका परदेशी व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून ३.९८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनची किंमत २४ कोटी रुपये इतकी आहे. या मंगळवारी केलेल्या कारवाईमध्ये एका दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला एनसीबीने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती एनसीबीने दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई विमानतळावरुन या व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येऊन मुंबईत आलीय. या व्यक्तीकडे असणाऱ्या ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता…
जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला परतूरमध्ये अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जाताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर स्कॉर्पिओ आदळली. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला. एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक…
जळगांव प्रतिनिधी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रगती विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा फेगडे, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. संध्या अट्रावलकर आदी मान्यवर व्यासपीठावर आमंत्रित होते. व्यासपीठावरील पाहुण्यांनी श्रद्धापूर्वक नतमस्तक होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आणि भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात शोभा फेगडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने उपस्थित शिक्षकांना व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. व डॉ. बाबासाहेबांचे मौलिक विचार व बाबासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य याबाबत…