लोणार/गुलाब शेख लोणार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती 22/03/2022 ती 19/4/ 2022 पर्यंत आहे जवळपास एक महिना बंद आहे या सर्व गलथान कारभाराला बाजार समितीचे संचालक मंडळ जबाबदार आहे असा आरोप भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी केला आहे,एका महिन्यापासून बंद असलेले बाजार समिती 19/4/2022 ला सुरू करण्यात आली परंतु काही तासानंतर लगेच खरेदीदाराने खरेदी बंद केली या धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे खरीप हंगामाच्या अगोदर शेती मशागतीसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना आपला शेतमाल मार्केटमध्ये विकण्याशिवाय पर्याय राहत नाही परंतु अशा वेळेसच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे…
Author: Saimat
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत डोंगराळ भाग व जंगलास आग लागू नये व नुकसान टळावे म्हणून सोयगाव वन विभाग सतर्क झाला आहे सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड पुष्पा पवार, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदशनाखाली तसेच वनपाल गणेश सपकाळ यांच्या नेतृत्वखाली वनरक्षक एस एस हिरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह जरंडी,निंबायती, रामपूरा,बहुलखेडा शिवार परिसरातील डोंगराळ भागात आग लागू नये म्हणून ग्रस्त वाढवली आहे. रात्री उशिरापर्यत डोंगराळ भागात रात्रीची ग्रस्ती वाढवली आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या बद्दल महिती देऊन सतर्क करण्यात येत आहे तसेच वनविभागास सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. वनरक्षक एस एस हिरेकर , कर्मचारी गोविंदा गांगुर्डे,गणेश चौधरी,…
जळगाव : प्रतिनिधी आयुष्मान भारत ह्या केंद्रीय आरोग्य उपक्रम अंतर्गत आरोग्यवर्धिनी दिवस*” म्हणून साजरा करण्यात येत असून *16 एप्रिल रोजी 4 वर्ष पूर्ण झाले. आरोग्यवर्धिनी दिवसाचे औचित्य साधून ग्राम पातळीवर देशभरात विविध आरोग्यदायी उपक्रम रबिवण्यात आले. जळगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र जळगाव खुर्द येथे लाभार्थी साठी प्रामुख्याने ई – संजीवनी पोर्टल वरून टेली कन्सल्टिग, योग वर्ग तसेच झुम्बा डान्स व्यायाम प्रशिक्षण, उचित आहार विहार, गरोदर माता तपासणी, SAM MAM बालक तपासणी, तीस वर्षवरील लोकांसाठी NCD स्क्रिनइंग्, वयोगट 12 ते 14 वर्ष मधील मुलमुलींना Covid लसीकरण, वृक्षरोपण, आदी हेल्थ अँड वेलनेस* उपक्रम राबवण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा…
मेष : मेष राशीच्या लोकांना आज बुधवारी नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता असून कार्यक्षेत्रात लाभाची स्थिती राहील. कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल, तुम्ही त्यात सहभागी व्हाल. संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा संपूर्ण दिवस उत्साहाचा जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात चांगली कमाई कराल. बुधवारी तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. बुधवारचा दिवस चांगला जाईल. बुधवारी तुमचे नशीब चांगले राहील. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना बुधवारी कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल, तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. बुधवारी विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. कोणालाही…
पाचोरा : प्रतिनिधी युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते तथा मेडिकल व्यावसायिक जितेंद्र जैन यांचे वर सोपवण्यात आली असून नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. सदरचे नियुक्तीपत्र आ.किशोर पाटील यांनी त्यांना समारंभ पूर्वक प्रदान केले असून, संघटना वाढीसाठी एकसंघपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे .तर जैन यांनी आगामी काळात आपण युवा संघटनेला अधिक व्यापक चेहरा देणार असल्याचे सांगत पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारी बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. आ.किशोर अप्पा पाटील यांच्या ‘शिवालय’संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, रमेश बाफना,डॉ भरत पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, यांचे…
फैजपूर ता यावल: प्रतिनिधी फैजपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पंच वार्षिक निवडणूक मतदान रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली ,शेतकरी पॅनलने एकूण १३ जागांपैकी ११ जागा जिंकल्या. माघारीनंतर १३ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ९ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी शेतकरी पॅनलचे ७ उमेदवार तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी ठरले. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष व विद्यमान तथा माजी नगरसेवक हक्क उतरल्याने या निवडणुकीने कृषी सहकार क्षेत्रातील सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत २७९ पैकी २५१ सभासदांनी मतदानाचा बजावला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे विजयी…
जळगाव : प्रतिनिधी स्व.पी. व्ही. माळीदादा फाउंडेशन जळगांवतर्फे पोलीस जलतरण तलावावर स्व. पी.व्ही. माळीदादा जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील विद्यार्थी हे अंडर १०, अंडर १४, अंडर १७ व खुल्या गटात सहभाग नोंदवून अनुक्रमे १५ सुवर्ण पदक, ४ रजत पदक व १ कांस्य पदक पटकावले. यामध्ये पुरुष गटात जलतरणपटू शुभम युवराज काळे यांनी खुल्या गटात १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅकस्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, जलतरणपटू कार्तिक लीलाधर काकडे यांनी अंडर १७ गटात १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्ण तर १०० मीटर फ्री…
आजचा सायंदैनिक साईमत ई – पेपर दि १९ एप्रिल २०२२ मंगळवार
चाळीसगाव : प्रतिनिधी धुळ्याहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीवर संशय येताच. पाहणी केली असता, त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार, १८ एप्रिल रोजी संध्याकाळी गस्त घालत असताना त्यावेळी एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. गाडीत उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात बेकायदेशीर विक्रीसाठी जात असलेला १३ लाख ३६ हजार चारशे…