Author: Saimat

मेष : मेष राशीच्या लोकांना आजचा प्रवास लाभदायक राहील. मुलाकडून वाईट बातमी मिळू शकते. पैसे परत मिळतील. व्यवसायात अनुकूल लाभ होतील. नोकरीत प्रशंसा मिळेल. घाईमुळे काम बिघडू शकते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी योजना आखली जाईल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्यावा. वृषभ : बेरोजगारी दूर करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातून अनुकूल लाभ होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. एखादे मोठे काम करताना आनंद मिळेल. घाई नाही. मनास आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर…

Read More

जळगाव प्रतिनिधी : जळगावात सुरज व सेजल नारखेडे याचा आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे. पर्यावरणाची साvतत्याने होत असलेले ऱ्हास आणि घडणारे दुष्परिणाम याला अटकाव देण्यासाठी नवं दपत्यांकडून विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे जगवावी आणि पर्यावरणाचे सवरक्षण व्हावे म्हणून झाडाची रोपटे भेट देण्यात आली आहे. सूरज व सेजल हे नवं दांपत्य उच्चशिक्षित असून परिवाराची राजकीय पार्श्वभूमी आहे. मात्र विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण पूरक संदेश देणारा हा विवाह सोहळा जळगावात पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात राजकीय नेत्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी दिसून आली. या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना भेट देण्यात आलेली झाडे सुरज…

Read More

ठाणे : प्रतिनिधी कोल्हापूरमधील पोटनिडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला, तर भाजपचा पराभव झाला. यावर अनेक नेटकऱ्यांनी ‘चंद्रकांत पाटील हिमालयात जा’ अशी खोडसाळ टिप्पणी केली आहे. त्यावरच आता गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चंद्रकांत पाटील हे हिमालयात पोहोचले असल्याचा एडिटेड फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं लिहिलेलं आहे. तर आव्हाड यांनी “नको परत या…” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जलदान हे सर्वोच्च दान मानले जाते. सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे जीवाची लाहीलाही होत असतांना अनेक दात्यांनी ठिकठिकाणी पाणपोया सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने पाळधी येथील  मेन रोडवर आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: पाणपोईवर पाणी वाटप केल्याने उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का बसला. मंत्री बनूनही भाऊंमधील सर्वसामान्यांची कळकळ ही यातून दिसून आली. आणि परिसरात हाच चर्चेचा विषय बनला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राज्यातील आज महत्वाचे मंत्री असले तरी त्यांची सर्वसामान्यांशी जुडलेली नाळ ही कायम असल्याचे अनेकदा दिसून आले…

Read More

पाळधी ता. धरणगाव : प्रतिनिधी  दिवंगत आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी जिल्हा दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचे येथे ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे अतिशय जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात आतषबाजीत शरदराव पवार यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पवार साहेबांचे स्वागत केले. याप्रसंगी परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदसर येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी सुमारे साडेदहा वाजता शरदराव पवार यांचे पाळधी येथील मुख्य चौकात आगमन झाले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपस्थितांनी महाविकास आघाडीच्या जयजयकारासह जय भवानी, जय शिवाजी या घोषणेचा जयघोष…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  उन्हाचा सुरूअसलेला प्रकोप व कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. तथापि भारनियमनाची ही कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून वेगाने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. तसेच खुल्या बाजारातून वीज खरेदी करून राज्यातील कृषी वीजवाहिन्यांना ८ तास वीजपुरवठा देण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोबतच इतर ग्राहकांसाठी सुरूअसलेले भारनियमन कमीत कमी राहील याची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, मागणीप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे राज्यात शुक्रवारी (दि. १५) सकाळपर्यंत कोणत्याही ठिकाणी भारनियमन करण्यात आले नाही. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयानुसार टाटा कंपनीच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) महावितरणने वीजखरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुबई (यूएई) येथील अनिल केजरीवाल यांनी ‘आर्ट अॅण्ड क्राफ्ट’ मंच स्थापना केली. या मंच द्वारे “संकट मोचन” या विषय़ावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिनिएचर शैलीतील  चित्रकला स्पर्धा आयोजली होती. त्यात जगभरातून 200 हून अधिक कलाकृती प्रस्तुत झाल्या. त्यात जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या संकटमोचन मिनिएचर, मेवाड शैलीतील अत्यंत समर्पक, प्रसंगनिष्ठ चित्राची निवड परीक्षक मंडळाने केली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या चित्राची निवड होणे,  ही जळगावकरांना अभिमानाची बाब आहे. संकटसमयी सर्वात जास्त श्री. हनुमानजींचे पूजन केले जाते. म्हणून त्यांना ‘संकट मोचन’ ही म्हटले जाते है। याचा अर्थ दु:ख, वेदना, संकटांना दूर करणारा असा होतो. स्वामी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ कंटेनर रिव्हर्स घेतांना चालकाचा अंदाज चुकल्याने कंटेनर डीपीला धडकला या घटनेत विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला आरजे ०९ जीसी २५९७ या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने आज सकाळी गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून…

Read More

मेष : आज मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. वृषभ : सरकारकडून तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतात. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. मिथुन: मिथुन राशीच्या व्यावसायिकांना व्यवसायात नवीन नातेसंबंध आणि सौदे पूर्ण करण्यासाठी हा काळ…

Read More