Author: Saimat

फैजपूर ता यावल: प्रतिनिधी फैजपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या २०२२ ते २०२७  या पंच वार्षिक निवडणूक मतदान रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली ,शेतकरी पॅनलने एकूण १३ जागांपैकी ११ जागा जिंकल्या. माघारीनंतर १३ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ९ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी शेतकरी पॅनलचे ७ उमेदवार तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी ठरले. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष व विद्यमान तथा माजी नगरसेवक हक्क उतरल्याने या निवडणुकीने कृषी सहकार क्षेत्रातील सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत २७९ पैकी २५१ सभासदांनी मतदानाचा बजावला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे विजयी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी स्व.पी. व्ही. माळीदादा फाउंडेशन जळगांवतर्फे पोलीस जलतरण तलावावर स्व. पी.व्ही. माळीदादा जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील विद्यार्थी हे अंडर १०, अंडर १४, अंडर १७ व खुल्या गटात सहभाग नोंदवून अनुक्रमे १५ सुवर्ण पदक, ४ रजत पदक व १ कांस्य पदक पटकावले. यामध्ये पुरुष गटात जलतरणपटू शुभम युवराज काळे यांनी खुल्या गटात १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅकस्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, जलतरणपटू कार्तिक लीलाधर काकडे यांनी अंडर १७ गटात १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्ण तर १०० मीटर फ्री…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी धुळ्याहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीवर संशय येताच. पाहणी केली असता,  त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर  माहिती अशी की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार, १८ एप्रिल रोजी संध्याकाळी गस्त घालत असताना त्यावेळी एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. गाडीत उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात बेकायदेशीर विक्रीसाठी जात असलेला १३ लाख ३६ हजार चारशे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये सर्कलला विरोध होऊन देखील तेथे सर्कल उभारण्यात आले आहे. दरम्यान , या चौकातील सर्कलमुळे अपघातांची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती सत्यात उतरल्याचे आज सकाळी समोरआले आहे. आकाशवाणी चौकातील सर्कलवर आज पहाटे एक वाहनच चढल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आलेले आहे. यात गुजराल पेट्रोल पंप चौक आणि प्रभात चौकात उड्डाण पुल घेण्यात आले असून याच्या पुढे आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये मोठे सर्कल उभारण्यात आले आहे. या सर्कलमुळे वाहतुकीची कोंडी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरात राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी राहते. सोमवारी १८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी ही तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत घरी जायला पायी निघाल्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे संशयित आरोपी असलम खान पठाण रा. देवपुर, धुळे हा रिक्षा घेऊन विद्यार्थिनींच्या पाठलाग केला. तीनही विद्यार्थिनी पायी जात असताना संशयिताने रिक्षा थांबवली यातील एका विद्यार्थिनीचा हात पकडला. व सोबत चल असे सांगून तिचा विनयभंग केला.…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा शहरात अनेक प्रभागात निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या नावाखाली रस्त्याचे कामात कोट्यवधीचा मलिदा लाटण्याने काम सुरू आहे.कारण होत असलेले रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.या कामाकडे नगरपालिका बांधकाम अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.शहरात अश्या अनेक कामा मध्ये बोगस मटेरियल वापरून विकास कामे केले जात आहे. सर्व सामान्य जनतेच्या करातून शासनाकडे कोट्यवधी रुपये जमा होत असतो.आणि याचं निधीतून विकास कामासाठी कोट्यवधी खर्च केला जातो. सत्ताधारी व कुंभकर्णी अधिकारी शासकीय खुर्ची वर बसून ठेकेदाराशी साटेलोटे करून होत असलेल्या कोट्यवधीच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करतात. पाचोरा शहरात होत सुरू असलेल्या सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे,…

Read More

पाचोरा प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित रस्ते काम सुरू करण्याचे निर्देश आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिल्याने आगामी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे चित्र निर्माण झोले आहे.सोमवारी दुपारी २ वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आ.पाटील यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांना विविध सूचना करत मार्गदर्शन केले.  पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते अंतर्गत सुमारे ९१ रस्ते मंजूर झाले असून यात  पाचोरा तालुक्यात ५७ तर भडगाव तालुक्यातील सुमारे ३४ रस्त्यांचा समावेश असून लवकरच आणखी…

Read More

मेष : मेष राशीची लोकं आज नवीन भागीदारी करू शकता. तुम्‍ही व्‍यवसाय प्रकल्पांमध्‍ये उत्साही आणि विश्‍वासू आहात, म्‍हणून तुम्हाला भविष्यात पूर्ण यश मिळेल. कोणतेही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असल्यास त्यात यश संभवते. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. वृषभ: वृषभ राशीच्या काही लोकांसाठी आजचा दिवस वादग्रस्त ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रागाला, नाराजीला सामोरे जावे लागेल आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचे भांडवल करून खेळ बिघडवण्याचे काम करतील. तुम्हाला सन्मान मिळेल तसेच नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे लाभ…

Read More