Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग पूर्ण झाले असले तरी अजून अनेक मार्गांचे काम बाकी आहेत. यात प्रामुख्याने जळगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या ऐवजी थेट गिरणा नदीपासून ते तरसोद फाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण करून या मार्गावर उड्डाण पुल उभारावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन काल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे दिले. यासोबत जिल्ह्यातील इतर महत्वाच्या मार्गांचे काम देखील ना. गडकरी यांनी मार्गी लावावे अशी अपेक्षा सुध्दा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. या सर्व कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत 1400 कोटी रूपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे. आज शिवतीर्थ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजनांच्या माध्यमातून विविध विकारांवर मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध केली असून याचा गोरगरीबांना लाभ होत आहे. सरकारने पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यावर देखील लक्ष केंद्रीत केले असून याचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे. कोविड काळात अडचणी आल्या तरी संकटाला संधी मानल्याने सिव्हील हॉस्पीटलचा कायापालट झालेला आहे. आता याच्याच आवारात 28 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद असणारे माता – बालसंगोपन हॉस्पीटल उभारण्यात येत असून याचे लवकरच भूमिपुजन होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजीत करण्यात आलेले आरोग्य शिबिर आणि डिजीटल हेल्थ कार्ड वाटपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य शिबिर आणि…

Read More

जळगाव  : वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अनेक आकडे बहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात, त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. या आकडेबहाद्दरांवर कारवाईसाठी महावितरण जळगाव परिमंडलाने धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्याचे काम केले आहे. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन्‌ आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. तसेच ही धडक मोहीम अशीच सुरु राहणार आहे. तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी 24500…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने संस्कार भारती दर वर्षी वसुंधरेचे पूजन व अलंकरण करुन या भूमातेला नमन करते.संस्कार भारती जळगाव समिती ने वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने चिमुकले राम मंदिर परिसरात भुअलंकरण करून या भूमातेचे पूजन केले. विषेश म्हणजे रांगोळीची संपूर्ण भारतात एकच डिझाईन काढली जाते जी केंद्रातर्फे दिली जाते. या कार्यक्रमासाठी प्रांत भुअलंकरण प्रमुख गीता रावतोळे, जळगाव समिती भुअलंकरण प्रमुख रेखा लढे, सहप्रमुख संगीता पिंगळे,शारदा सावदेकर,प्रतीभा नेवे, प्रतीक्षा कापडणे,श्री.लढे व वर्षा बऱ्हाटे यांनी सहभाग घेतला.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेच्या शेवटच्या दिवशी 645 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांनी पेटची ऑनलाईन परीक्षा दिली. पाच दिवसात एकूण 2312 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दिनांक 18 ते 22 एप्रिल पर्यंत विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. एकुण 3 हजार 688 विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यासर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात असून त्यासाठी 250 संगणकांची व्यवस्था करण्यात आली होती. एका दिवसात 4 बॅचेसमध्ये या परीक्षा झाल्या. शेवटच्या दिवशी चार बॅचेससाठी 645 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 396 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पाचव्या दिवशी इंग्रजी, राज्यशास्त्र, समाज कार्य, इतिहास, संरक्षणशास्त्र आणि…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी युवारंग युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी कलावंतांनी वारकऱ्यांची दिंडी, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे शिबली नृत्यासह इतर कलाविष्कार दाखवत उपस्थितांवर मोहिनी घातली. विद्यार्थी कलावंतांनी विविधतेत एकात्मतेचे दर्शन घडविल्यामुळे महोत्सवाच्या परिसरात संपूर्ण भारत अवतरल्याचे दिसत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाच्या तिसरा दिवस समुह लोकनृत्य, शास्त्राय नृत्य, लोकसंगीत, वक्तृत्व, फोटोग्राफी, चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी या कला प्रकारांचे पाचही रंगमंचावर सकाळ पासून सादरीकरणाला सुरूवात झाली. युवारंगच्या मंचावर जणू भारत अवतरला होता. खुला रंगमंच क्र.1 वर (स्वा.से.अण्णासाहेब…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर तसेच राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राज्यस्तरीय दीपस्तंभ 2022 पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.दीपस्तंभ फाउंडेशन 2009 सालापासून सेवाभावी काम करणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करत आहे.2017 पासून हे पुरस्कार स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जातात.सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. 2021-22 या वर्षासाठीचे पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षाच्या जीवन गौरव पुरस्काराने विदयार्थी सहाय्यक समितीचे रमाकांत तांबोळी (पुणे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.समाजामध्ये अतिशय कमी कालावधी मध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोला. संवाद वाढवा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तंत्रज्ञान साक्षर व्हा. तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डीन्स ऍड्रेस) पार पडला. तसेच याचबरोबर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरु झाल्या. यावेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैला पुराणिक, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील उमर्टी परिसरातून शुक्रवारी पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत पथकाने ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस, १ चारचाकी आणि २ मोबाईल तर २ जणांना अटक करण्यात आली असून दोघांनी पळ काढला आहे. असा ऐवज हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या उमर्टी भागातून जळगाव जिल्ह्यात नेहमी गावठी पिस्तूल आणि काडतुस आणले जातात. जिल्ह्यात त्याची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे.…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. वचन पूर्ण न केल्यामुळे मित्र नाराज होऊ शकतात. आज ८९% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आज चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकारी तुमचा हेवा करू शकतात.…

Read More