Author: Saimat

नागपूर : वृत्तसंस्था राज ठाकरे यांचा आजचा भाषण कधीकाळी त्यांना देवेंद्र फडणवीस त्यांनी सुपारीबाज म्हटले होते, त्याच पद्धतीचे होते. आज जनतेच्या प्रश्नावर ते बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे. म्हणून राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या निर्वाणीच्या इशाऱ्याला अर्थ नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन दिलेल्या अल्टिमेटमचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात भोंग्यांबाबत कारवाई झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 4 तारखेच्या इशाऱ्याने काहीच होणार नाही. राज ठाकरे यांनी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शाळांना 15 टक्के फी सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना काळातील म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या 15 टक्के फी सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश देऊनही शाळांनी त्याचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आता पुन्हा पत्रक काढून 15 टक्के फी परत करा, नाहीतर पुढच्या वर्षात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थी फी वाढीवरुन  आक्रमक दरम्यान, पुणे विद्यापीठातील विद्यार्थी फी वाढीवरुन आक्रमक झाले…

Read More

 भडगाव : प्रतिनिधी  सुमारे 400 किलोमीटर पायी पदयात्रा करुन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. गिरणा नदीच्या विकासासाठी त्यांनी राबवलेले  गिरणा पुनरुज्जिवन अभियान परिसराच्या विकासासाठी एक अभिनव उपक्रम ठरणार असून हे अभियान गिरणा खोऱ्याच्या विकासाची सामाजिक चळवळ झाली असून निश्चितच ही चळवळ नदी विकासासाठी राज्याला एक दिशादर्शक सामाजिक चळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत खा. उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून गिरणा वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ तसेच महाश्रमदान  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गिरीश भाऊ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंटस गृप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पीपल्स बँक दाणा बाजार येथे दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या कामगारांना, वाढते तापमान त्यातच पोटापाण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे हमाल कामगार कसलीच पर्वा न करता श्रमदेवतेची उपासना करतात. अशा वेळीं भर उन्हात तहान भागवण्यासाठी त्यांना मिल्टान थंड पाण्याची बाटली व रुमाल वाटप महापौर जयश्रीताई महाजन व अध्यक्षा मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी याप्रसंगी हमाल तसेच कामगाराबद्दल अभिमान व्यक्त केला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव सदस्या भाग्यश्री महाजन, रेणुका…

Read More

यावल  सुरेश पाटील  भुसावल यावल रोड वर तापी नदी पुलाजवळ बंद असलेले टोलनाका वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत असून याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे  हेतुता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण भुसावळ विभागासह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यातील वाहनधारकांकडून होत आहे. भुसावळ जवळील तापी नदी पुलाचे रुंदीकरण झाल्यानंतर फैजपुर -भुसावळ आणि यावल भुसावळ तसेच भुसावळ कडून फैजपुर सावदा रावेर बुऱ्हाणपूर आणि भुसावळहुन यावल चोपडा शिरपुर अमळनेर नंदुरबार इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या जड वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात होता परंतु गेल्या चार पाच वर्षापासून टोलनाका बंद अवस्थेत असल्यावर सुद्धा त्या ठिकाणी टोल नाकासाठी बांधकाम केलेल्या खोल्या जैसे थे आहेत या ठिकाणी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी समाजाचे देणं लागतं याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकटकाळी धावून जाणारा हा पत्रकार संघ आहे. पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना शासकीय – निमशासकीय समितीवर नियुक्त करण्याची मागणी केली असून याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करून पत्रकारांना संधी देऊ असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन काल रोजी येथे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांना ८ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आले होते. युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश परिपत्रक क्रमांक २६/२०२२ द्वारे प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी प्रसिद्ध केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे.…

Read More

मेष : आज मेष राशीच्या लोकांची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सुखकर असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढर्‍या वस्तू दान करा. वृषभ : आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करा. मिथुन: मिथुन राशीच्या…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पुर्ण झाली,तरीही या देशाचे मुलनिवासी म्हणुन गोर-बंजारा समाजासहीत ओबीसी प्रवर्गातील गोर गरिब,दिन दुबळ्या,सामान्य जनतेला न्याय-हक्क,मान-सन्मान,अधिकार, लोकसंख्येच्या दृष्टीने अजुनही मिळालेला नाही. सारख्याच असंख्य मागणीसाठी 11मे 2022 रोजी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेशभाऊ चव्हाण व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रा.संपतभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येने क्रांतीकारी विराट मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाला संभाजीनगर जिल्हातील तमाम ओबीसी बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रविंद्र जाधव (संभाजी नगर शहर अध्यक्ष) यांच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम राजकीय,सामाजिक संघटन संस्था व नेते तसेच कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…

Read More