Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी बहुजन जागृती मंच भुसावळ यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन व ऑफलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पाच गटात आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान गटात शर्वरी विलास निकम (डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, जळगाव) या विद्यार्थीनीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण व संविधानाची देण’ या विषयावर भाषण सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला. डायएचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता शैलेश पाटील, बहुजन जागृती मंचचे अध्यक्ष राजेंद्र सुरवाडे व स्पर्धा समन्वयक आनंदा सपकाळे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या द्वितीय उपप्रांतपालपदी गिरीश सिसोदिया यांची निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. जळगाव शहराला 15 वर्षांनंतर हा बहुमान मिळाला. लायन्स क्लब इंटरनॅशलची ही प्रांतीय परिषद सिल्वासा (गुजरात) येथे झाली. या परिषदेत खान्देश, मराठवाडा, विदर्भ येथील 16 जिल्ह्यांतील 490 सदस्य उपस्थित होते. परिषद प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. परिषदेला माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू (औरंगाबाद), डॉ. व्ही. के. लडिया , राजू मनवाणी, नरेंद्र भंडारी यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी प्रांतपाल प्रेम रायसोनी, एच. एन. जैन, सतीश चरखा, सुगन मुणोत, रवींद्र गांधी, शिरीष सिसोदिया, रितेश छोरीया आदींनी सहकार्य केले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मनपाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले असून ते महापालिकेला प्राप्त झाले. आयुक्त सतीश कुलकर्णी 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यानंतर राज्य शासनाने आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपवली होती. गेले अनेक दिवस आयुक्त पदासाठी डॉ. गायकवाड आणि कल्याण मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर डॉ. गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.

Read More

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल, आज नशीब तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. आज तुमची मानसिक सुस्ती संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. प्रगतीसाठी मेहनत कराल. आज ७६% नशिबाची साथ आहे. पिवळ्या वस्तू जसे की लाडू, केळी किंवा पिवळे कपडे दान करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी आज आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वत:ला कणखर समजाल. हुशारीने काम करा, अडचणी सहज नाहीशा होतील. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. राजकीय बाबी तुमच्या…

Read More

यावल : प्रतिनिधी  शेतातील विहिरीजवळील टेक्समो कंपनीच्या10हॉसपॉवर क्षमतेच्या मोनोब्लॉक असेंबल केलेल्या अंदाजे 24हजार रुपये किमतीच्या पाण्याच्या2इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आज दि.4रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.           यावल येथील तेजस सतीश यावलकर वय 40 यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यावल शिवारातील शेत गट नंबर 1470 शेताजवळील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी टेक्समो कंपनीची10 हॉसपॉवर क्षमतेची मोनोब्लॉक असेंबल केलेल्या पाण्याच्या2 इलेक्ट्रीक मोटारी अंदाजे 24 हजार रुपये किमतीच्या हिरव्या रंगाची मोनोब्लॉक असलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने संमती वाचून चोरून नेल्या या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव काल शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे या जन्मोत्सव उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता रथ चौकातून शोभायात्रेला सुुरुवात झाली. या आधी ग्रामदैवत राम मंदिरात बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांच्या हस्ते आरती झाली. फुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान परशुरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यासह शोभायात्रेत श्रीमंत बाजीराव पेशवा ढोल पथक व स्वतंत्रता संग्राम विरांगना राणी लक्ष्मीबाई असे दोन ढोल पथक सहभागी झाले होते. दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी 50 ढोल व 10 ताशांचा समावेश होता. यासह महिलांचे लेझीम पथक तलवार, लाठ्या-काठ्या, दांडपट्टे इत्यादी चे प्रात्यक्षिके हे शोभायात्रेचे वैशिष्ट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रुक तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांना 2018-19 या वर्षाचा जिल्हा युवक युवा पुरस्कार( संस्था) हा माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते आज 1 मे रोजी पोलिस कवायत मैदानात ध्वजारोहण प्रसंगी प्रदान करण्यात आला समर्थ संस्थेने जिल्ह्या भरातच नव्हे तर राज्यभरात सांस्कृतिक व सामाजिक कार्यात उत्तम कामगिरी करून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील असंघटित युवकांना संघटित करून तरुणांच्या व नागरिकांच्या सुप्तगुणांना संधी देऊन भरीव कामगिरी केली आहे समर्थ संस्थेला…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी नवीन आर्थिक वर्षात एप्रिलच्या 18 दिवसांत 11 कोटी रूपयांचा भरणा झाला आहे. नागरीकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या सुचनेनुसार 10 टक्के सुट देण्याची योजना 31 मेपर्यंत वाढवण्यात आली. एप्रिल महिन्यात 12 तारखेपासून करात सुट देण्यास सुरूवात केली होती. संपूर्ण महिनाभरात 11 कोटींचा भरणा झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2021 मध्ये अवघे साडेतीन कोटी रूपये भरणा झाला होता. त्यामुळे यंदा तीनपट भरणा वाढला आहे. नागरीकांची वाढती गर्दी लक्षात घेता महापौर जयश्रीताई महाजन यांनी 10 टक्के सुट देण्यासाठी मुदत वाढवून देण्याची सुचना केली होती. त्यानुसार उपायुक्त प्रशांत पाटील यांनी 31 मेपर्यंत 10 टक्के सुट योजना…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राज्य शासनाचा क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयतर्फे मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले. मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, रोशनी शेख, मोनाली कुमावत, सुवर्णलता अडकमोल, सपना श्रीवास्तव, निवेदिता ताठे, मोहसीन काझी आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलिस कवायत मैदानावर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाहस्ते गौरव करण्यात आला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी दूरदर्शन टॉवरजवळील श्री स्वामीनारायण मंदीरात मंगळवारी अक्षय्यतृतीयेनिमित्त 501 घागरी भरून तर्पण विधी करण्यात आला. तर्पण विधीनंतर घागरी, डांगर, रुमाल व फळे गोरगरींबाना वाटप करण्यात येणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले. रत्नपारखी गुरूजी यांनी पौरोहित्य केले. नयनप्रकाश शास्त्री यांनी अक्षय्यतृतीया यांनी विचार मांडले. कार्यक्रमास गोविंद स्वामी, पी. पी.शास्त्री (सुरत) यांनी मार्गदर्शन केले. अतुल भगत यांनी पुजेची मांडणी केली. नीळकंठ महाजन, युवराज राणे, दिनकर फेगडे, शैलेंद्र पाटील, संदीप पाटील, दिलीप भिरूड, सुनील सरोदे यांच्यासह 500 हरिभक्त उपस्थित होते

Read More