Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी जलजीवन मिशनच्या अंतर्गत येथील पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून याचे काम सर्व निकषांच्या आधारे करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. सदर कामाच्या कंत्राटदाराला पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यादेश प्रदान करण्यात आला. या संदर्भातील वृत्त असे की, शासनाच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत असून याच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तब्बल 870 गावांसाठी या योजनेच्या माध्यमातून कृती आराखडा आखण्यात आला असून यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या गावांमध्ये याचे काम सुरू झाले आहे.…

Read More

रावेर : प्रतिनिधी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, यांच्या आदेशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रावेर लोकसभा अध्यक्षपदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, राजेश पाटील , राजेश वानखेडे,    राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे , परेश कोल्हे, कुणाल पवार, रोहन सोनवणे आदिंनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More

बोदवड :प्रतिनिधी  तालुक्यातील शेलवड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बोदवड शाखेत विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण ३० एप्रिलपर्यंत रद्द करून शेलवड शाखा कायमस्वरूपी ठेवावी, असे निवेदन शेलवड ग्रामस्थांनी २७ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मागणी मान्य न झाल्यास २ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानुसार प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. शेलवड हे तालुक्यातील १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे बोदवड येथील शाखेत विलीनीकरण झाले तर गाव व परिसरातील वृद्ध, निराधार, दिव्यांग खातेदारांची गैरसोय होईल. त्यामुळे हे विलीनीकरण थांबवावे या मागणीसाठी शेलवड ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे घातले होते. त्यात शेलवड शाखेला…

Read More

मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्लोबल गोल्ड टॅलेट बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून खूप मोठा प्रतिसाद लाभला होता. कलाशिक्षक दररोज फळा लिहितात आणि असेआयोजक सौ. मेघा महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्व विजयी स्पर्धकांना ०१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त व ग्लोबल गोल्डन टॅलेट बुक ऑफ रेकॉर्ड च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, प्रभादेवी, दादर मुंबई येथे सायंकाळी भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये स्मृतिचिन्ह, मेडल, सन्मानपत्र देऊन बाविस्कर, जितेंद्र अहिरराव समाधान रोकडे श्रीराम महाजन, अध्यक्ष मेघा महाजन स्पर्धकाचे खूप खूप अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीचा अल्टीमेट दिल्यानंतर जळगाव शहरात याचे पडसाद आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उमटले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी शनिमंदिरात महाआरती करुन हनुमान चालीसा भोंग्यावर लावून पठन केले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी 6 वा. शनिपेठेतील शनिमंदिरात एकत्र येवून हनुमान चालीसा पठन करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले आहे. यामध्ये मनसे जळगाव महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी शनिपेठ पोलिस स्थानकाच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read More

मेष राशी : मेष राशीचे लोक कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. तुमचे काम चांगले राहील. पैसा असेल, पण अचानक खर्चही उद्भवू शकतो. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे, आई-वडिलांचा स्नेह लाभेल, मुलांकडून आनंद मिळेल. कामात धनलाभ होईल. आजचा दिवस खेळण्यातच जाईल, फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि गाडी चालवताना काळजी घ्या. तुमच्यासमोर एखादे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आज ८६%…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात मोठा सण ईद हा समाज बांधवांनी घरातच साजरा केला होता.माञ यंदा कोरोनानियम रद्द करण्यात आल्याचे यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता  सोयगाव येथील  मशिद येथुन सर्व समाज बांधव ईदगाह मैदानाकडे निघाले होते. ९ वाजता ईदच्या विशेष नमाजीचे पठण करण्यात आले. यानंतर एकमेकांची गळाभेट घेवुन शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही  हिंदू बांधवांनी सर्वाची गळाभेट घेवुन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालूका अध्यक्ष आबा काळे , पोलीस सहाय्यक निरीक्षक सुदाम सिरसाठ,नगरध्यक्ष अक्षय काळे, राजुभाऊ दुतोंडे, किशोर मापारी, दिपक पगारे,भगवान जोहरे,हर्षल काळे,लतिफ शहा, दिलीप देसाई,रमेश गव्हाडे, भगवान वारंगणे,कदीर शहा,…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी  सोयगाव शहरात सर्व समाजाच्या उपस्थितीत भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान परशुराम यांच्याप्रमाणे आपल्याला सर्व विद्या संपन्न होता आलं पाहिजे असे मनोगत डॉ. संजय शहापुरकर यांनी केले. राष्ट्र उभारणीत ब्राम्हण समाजाने कायमच महत्वपूर्ण योगदान दिले आहे. नवीन पिढीने सुद्धा राष्ट्रधर्म निभावण्यासाठी व्रत हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रभाकर कुलकर्णी यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करत उच्च शिक्षण घेण्यासाठी आवाहन केलं. तसेच, सर्व समाजात समरस भाव निर्माण करण्यासाठी ब्राम्हण समाजाने पुढाकार घ्यावा, सर्व समाज आपला भाऊ आहे आणि आपणही त्याचं देणं लागतो ही भावना जागृत ठेवून तरुणांना कार्य करायचं आहे असे मनोगत कल्पेश जोशी यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसा या सामाजिक संस्थेच्या कुलसचिव पदावरुन लेवा समाजामध्ये वादंग निर्माण झाले असून ॲड. संजय राणे यांच्यावर समाजबांधवांकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करत त्यांना या पदावरुन त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या संदर्भात समाजबांधवांमध्ये मोठा कोलाहल उडाला असून या संदर्भात येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱ्या भोरगाव लेवा पंचायतच्या सभेत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोरगाव लेवा पंचायत हे लेवा समाजाची अग्रणी संस्था असून या पंचायतीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अव्याहतपणे समाजातील समाजबांधवांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम होत आहे. पंचायतची कुटुंब नायक ही…

Read More