Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी समाजाचे देणं लागतं याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकटकाळी धावून जाणारा हा पत्रकार संघ आहे. पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना शासकीय – निमशासकीय समितीवर नियुक्त करण्याची मागणी केली असून याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करून पत्रकारांना संधी देऊ असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन काल रोजी येथे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांना ८ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आले होते. युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश परिपत्रक क्रमांक २६/२०२२ द्वारे प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी प्रसिद्ध केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे.…

Read More

मेष : आज मेष राशीच्या लोकांची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सुखकर असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढर्‍या वस्तू दान करा. वृषभ : आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करा. मिथुन: मिथुन राशीच्या…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पुर्ण झाली,तरीही या देशाचे मुलनिवासी म्हणुन गोर-बंजारा समाजासहीत ओबीसी प्रवर्गातील गोर गरिब,दिन दुबळ्या,सामान्य जनतेला न्याय-हक्क,मान-सन्मान,अधिकार, लोकसंख्येच्या दृष्टीने अजुनही मिळालेला नाही. सारख्याच असंख्य मागणीसाठी 11मे 2022 रोजी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेशभाऊ चव्हाण व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रा.संपतभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येने क्रांतीकारी विराट मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाला संभाजीनगर जिल्हातील तमाम ओबीसी बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रविंद्र जाधव (संभाजी नगर शहर अध्यक्ष) यांच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम राजकीय,सामाजिक संघटन संस्था व नेते तसेच कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…

Read More

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर1/5/22 शासन स्तरावर व नगरपालिका प्रशासन संचालनालय स्तरावर राज्यातील नगरपालिका नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्यामुळे नगरपरिषदेचे संघटनेचे पदाधिकारी सर्व सदस्य कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 10-20-30 वर्षांनंतर मिळणारे कालबद्ध आश्वासीत प्रगती योजना लागू करणे, 100 % वेतन कोषागारातून करणे, 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचे थकीत हप्ते मिळणे, शासनाकडून वेतनखर्चासाठी मिळणारे सहायक अनुदान मागणीपेक्षा कमी मिळत असून ते परिपूर्ण देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागु करणे या व अशा एकुण 26 मागण्यांसाठी विविध संघटनांनी 2 वर्षांपासून पाठपुरावा करुनही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने दि. 5 एप्रिल 2022 रोजी काळ्या…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे कार्य जिल्हात अव्वल असल्याचे मत सोयगाव पोलीस ठाण्यात चे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ साहेब यांनी म्हटले होते,याच स्वप्नपूर्ती फाउंडेशन ने आज 500 रूग्णांचे मोफत मोतिबिंदू आँपरेशन यशस्वी रित्या संपन्न करून तालुक्यातील गरजु व गरीब रुग्णाला एक हात मदतीचा दिला आहे.. स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी नुकतीच या संदर्भात माहिती देत तालुक्यातील पञकार बांधवांचे आभार व्यक्त केले.सोयगाव तालुक्यातील किन्ही शिंदोळ,वडगाव,जरंडी बनोटी इ.ठिकाणी भव्य नेञतपासणी शिबीर आयोजित करत मोफत आँपरेशन करणारी ही सोयगाव तालुक्यातील पहीली संस्था आहे तसेच रक्तदान शिबीरे व आरोग्य शिबीर यांच्या माध्यमातून अनेक समाजातील…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  “महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची, संत-महात्म्यांची, समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष या भूमीत जन्मले. रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन करुन राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी घालून दिला. या महामानवांनी दिलेला विचार, दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा प्रयत्न महाराष्ट्रानं, राज्य सरकारनं कायम केला आहे. सर्वांना सोबत घेऊन, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत राज्यातील जनतेच्या एकजूट व निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरु राहील. महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही,” असा विश्‍वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जागतिक नृत्य दिन निमित्ताने येथील नुपूर कथक डान्स ॲकेडमी च्या वतीने अखंड घुंगरुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी एक तास घुंगरु नाद करण्यात आला. यात नृत्यशिक्षीका चारु भालेराव यांच्यासह कनिका नेमाडे, मन्विथा थोटा, लतिका श्रीखंडे, गिरिजा सावदेकर, मनिषिका आरुषी, चेतना नेमाडे, ज्ञानेश्वरी नेमाडे, सीमा पाठक, अवनी धाडसे, नुपूर भालेराव , चंन्द्रजा र्इंगळे, अनघा वानखेडे, डिंपल गाढे, उर्वशी कोळी, शान्वी तन्नीरवार, हेमांगी पंडागरे, पुजा तन्नीरवार,निलम धाडसे, पुर्वा नेवे, यांनी सहभाग घेतला.यावेळी सामुदायीक नटराज पुजन करण्यात आला. अशाप्रकारे जागतिक नृत्यदिन उत्साहात झाला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी आपण कोणताही पक्षीय भेद न बाळगता जिल्ह्यात आवश्‍यकतेनुसार पाणी पुरवठा योजनांना जलजीवन मिशनच्या अंतर्गत मंजुरी प्रदान केली आहे. बडेजाव मिरवण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कामांना महत्व देतो. या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील सावदा आणि रवंजे येथील पाणी पुरवठा योजनांना 15 दिवसात मंजुरी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. याबाबत त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता भोगवडे यांना निर्देश दिले. एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन आणि जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील 305 गावांचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी 213 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात…

Read More