Author: Saimat

मेष राशी : मेष राशीचे लोक कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. तुमचे काम चांगले राहील. पैसा असेल, पण अचानक खर्चही उद्भवू शकतो. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे, आई-वडिलांचा स्नेह लाभेल, मुलांकडून आनंद मिळेल. कामात धनलाभ होईल. आजचा दिवस खेळण्यातच जाईल, फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि गाडी चालवताना काळजी घ्या. तुमच्यासमोर एखादे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आज ८६%…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात मोठा सण ईद हा समाज बांधवांनी घरातच साजरा केला होता.माञ यंदा कोरोनानियम रद्द करण्यात आल्याचे यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता  सोयगाव येथील  मशिद येथुन सर्व समाज बांधव ईदगाह मैदानाकडे निघाले होते. ९ वाजता ईदच्या विशेष नमाजीचे पठण करण्यात आले. यानंतर एकमेकांची गळाभेट घेवुन शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही  हिंदू बांधवांनी सर्वाची गळाभेट घेवुन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालूका अध्यक्ष आबा काळे , पोलीस सहाय्यक निरीक्षक सुदाम सिरसाठ,नगरध्यक्ष अक्षय काळे, राजुभाऊ दुतोंडे, किशोर मापारी, दिपक पगारे,भगवान जोहरे,हर्षल काळे,लतिफ शहा, दिलीप देसाई,रमेश गव्हाडे, भगवान वारंगणे,कदीर शहा,…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी  सोयगाव शहरात सर्व समाजाच्या उपस्थितीत भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान परशुराम यांच्याप्रमाणे आपल्याला सर्व विद्या संपन्न होता आलं पाहिजे असे मनोगत डॉ. संजय शहापुरकर यांनी केले. राष्ट्र उभारणीत ब्राम्हण समाजाने कायमच महत्वपूर्ण योगदान दिले आहे. नवीन पिढीने सुद्धा राष्ट्रधर्म निभावण्यासाठी व्रत हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रभाकर कुलकर्णी यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करत उच्च शिक्षण घेण्यासाठी आवाहन केलं. तसेच, सर्व समाजात समरस भाव निर्माण करण्यासाठी ब्राम्हण समाजाने पुढाकार घ्यावा, सर्व समाज आपला भाऊ आहे आणि आपणही त्याचं देणं लागतो ही भावना जागृत ठेवून तरुणांना कार्य करायचं आहे असे मनोगत कल्पेश जोशी यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसा या सामाजिक संस्थेच्या कुलसचिव पदावरुन लेवा समाजामध्ये वादंग निर्माण झाले असून ॲड. संजय राणे यांच्यावर समाजबांधवांकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करत त्यांना या पदावरुन त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या संदर्भात समाजबांधवांमध्ये मोठा कोलाहल उडाला असून या संदर्भात येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱ्या भोरगाव लेवा पंचायतच्या सभेत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोरगाव लेवा पंचायत हे लेवा समाजाची अग्रणी संस्था असून या पंचायतीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अव्याहतपणे समाजातील समाजबांधवांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम होत आहे. पंचायतची कुटुंब नायक ही…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज ठाकरे यांचा आजचा भाषण कधीकाळी त्यांना देवेंद्र फडणवीस त्यांनी सुपारीबाज म्हटले होते, त्याच पद्धतीचे होते. आज जनतेच्या प्रश्नावर ते बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे. म्हणून राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या निर्वाणीच्या इशाऱ्याला अर्थ नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन दिलेल्या अल्टिमेटमचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात भोंग्यांबाबत कारवाई झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 4 तारखेच्या इशाऱ्याने काहीच होणार नाही. राज ठाकरे यांनी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शाळांना 15 टक्के फी सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना काळातील म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या 15 टक्के फी सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश देऊनही शाळांनी त्याचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आता पुन्हा पत्रक काढून 15 टक्के फी परत करा, नाहीतर पुढच्या वर्षात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थी फी वाढीवरुन  आक्रमक दरम्यान, पुणे विद्यापीठातील विद्यार्थी फी वाढीवरुन आक्रमक झाले…

Read More

 भडगाव : प्रतिनिधी  सुमारे 400 किलोमीटर पायी पदयात्रा करुन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. गिरणा नदीच्या विकासासाठी त्यांनी राबवलेले  गिरणा पुनरुज्जिवन अभियान परिसराच्या विकासासाठी एक अभिनव उपक्रम ठरणार असून हे अभियान गिरणा खोऱ्याच्या विकासाची सामाजिक चळवळ झाली असून निश्चितच ही चळवळ नदी विकासासाठी राज्याला एक दिशादर्शक सामाजिक चळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत खा. उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून गिरणा वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ तसेच महाश्रमदान  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गिरीश भाऊ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंटस गृप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पीपल्स बँक दाणा बाजार येथे दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या कामगारांना, वाढते तापमान त्यातच पोटापाण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे हमाल कामगार कसलीच पर्वा न करता श्रमदेवतेची उपासना करतात. अशा वेळीं भर उन्हात तहान भागवण्यासाठी त्यांना मिल्टान थंड पाण्याची बाटली व रुमाल वाटप महापौर जयश्रीताई महाजन व अध्यक्षा मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी याप्रसंगी हमाल तसेच कामगाराबद्दल अभिमान व्यक्त केला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव सदस्या भाग्यश्री महाजन, रेणुका…

Read More

यावल  सुरेश पाटील  भुसावल यावल रोड वर तापी नदी पुलाजवळ बंद असलेले टोलनाका वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत असून याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे  हेतुता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण भुसावळ विभागासह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यातील वाहनधारकांकडून होत आहे. भुसावळ जवळील तापी नदी पुलाचे रुंदीकरण झाल्यानंतर फैजपुर -भुसावळ आणि यावल भुसावळ तसेच भुसावळ कडून फैजपुर सावदा रावेर बुऱ्हाणपूर आणि भुसावळहुन यावल चोपडा शिरपुर अमळनेर नंदुरबार इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या जड वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात होता परंतु गेल्या चार पाच वर्षापासून टोलनाका बंद अवस्थेत असल्यावर सुद्धा त्या ठिकाणी टोल नाकासाठी बांधकाम केलेल्या खोल्या जैसे थे आहेत या ठिकाणी…

Read More