Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी घरपट्टी भरलेली नसेल किंवा अन्य काही कारणांनी जर तुमच्या घराची नळजोडणी अमृत योजनेवर करायची राहिली असेल तर आज तुमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे. कारण महापालिकेने जुन्या पाणीपुरवठा योजनेवरून नव्या वितरण व्यवस्थेवर नळजोडणीसाठी 6 मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. लगेच दोन दिवसात म्हणजेच 8 मे पासून जुनी पाणीपुरवठा वितरण व्यवस्था बंद केली जाणार आहे. सोमवारपासून नव्या वितरण व्यवस्थेवरुन पाणी मिळणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेवर जोडणीसाठी निवास असलेल्या भागातील मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंता कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील आठव्या मजल्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा लागेल. शहरात 1 लाख 18 हजार मालमत्ता शहरात 1 लाख 18…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुढीत दोन दिवसात सर्व धार्मिक स्थळांनी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवल्यास पाच लाखांपर्यंतच दंड व गुन्हा दाखल होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे. आजपर्यंत पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या 608 मशीद, 370 मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडले आहे. जिल्हा पोलिस दलाने आतापर्यंत 150पेक्षा अधिक मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बाहेरगावाहून शिक्षण घेण्यासाठी शहरात असलेल्या २० वर्षीय तरूणीवर लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्ती अत्याचार केला व पैश्यांची मागणी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरूणाला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील २० वर्षीय तरूणी ही जळगाव येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती शहरात भाड्याच्या खोलीत राहते. दरम्यान तिची ओळख विशाल राजेश तडवी याच्याशी झाला. दोघांची ओळख निर्माण झाल्याने दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. दरम्यान २८ ऑक्टोबर २०१८ पासून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तरूणीकडून पैश्यांची मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करून…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी पीक विम्याची रक्कम तत्काळ बँक खात्यात देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पीक विम्याची उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वाटेची यायची असल्याने जोखीम रक्कम शेतकर्‍यांना मिळत नाही असे विमा कंपनी प्रतिनिधींकडून सांगण्यात येते. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांची रक्कम देण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल आहे. केंद्र व राज्य सरकारचे शेतकर्‍यांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, हेच यावरून दिसते. त्यामुळे आपण आपल्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारपर्यंत शेतकर्‍यांची व्यथा मांडावी व उर्वरित 75 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ मिळवून देत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ दुचाकी दगडावर आदळल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुसूंबा येथील इंदिरानगरातील रहिवासी गुलाब नवल बाविस्कर (वय- ३८) हे गुरुवार ५ मे रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसीतून महामार्गाकडे दुचाकीने जात होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ त्यांची दुचाकी दगडावर आदळल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गुलाब यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे व गणेश शिरसाळे यांच्यासह…

Read More

मेष: आज मेष राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. आजची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चपळतेचा असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय राहील. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनामध्ये आनंद राहील. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. प्रेमसंबंधात यश मिळेल. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपी पराग प्रकाश लोहार (वय-२०) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ असलेल्या तनय हॉटेलसमोर एक तरुण हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या. पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक मुदस्सर काझी, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, साईनाथ मुंडे यांनी गुरूवार ५ मे रोजी दुपारी दीड वाजता…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी स्वच्छ इंधन बेहतर जीवन असा नारा देऊन केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला या योजनेचा उद्देश भारतातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे पाच कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस देण्याचा होता जगण्यासाठी अन्न लागते आणि अन्न शिजवण्यासाठी इंधन लागते सुरुवातीला घरोघरी  पोहोचवण्यात सरकार यशस्वी झाले पण आज कोण गरिबांच्या घरामध्ये एका कोपऱ्यात गॅस पडून आहे एवढ्या महागाईत महागडा गॅस भरण्यासाठी एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न महिलांना पडला आहे .ग्रामीण  भागामध्ये पुन्हा एकदा घरातून धूर निघताना दिसत आहे, चूल पेटवण्यासाठी उज्वला शेतामध्ये लाकडे आणण्यासाठी फिरत असताना दिसत आहे एक तर अनेक दिवसापासून…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील जाहीर झालेल्या पाच सेवासंस्थापैकी गलवाडा, निंभोरा, आणि उप्पलखेडा या तीन सोसायट्या चे २३ उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल झाले असून शुक्रवारी या पाच सेवा संस्था साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे परंतु अद्यापही फरदापुर आणि उमरविहिरे या दोन सोसायट्यांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली. सोयगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यासाठी फरदापुर, गलवाडा,निंभोरा,उप्पलखेडा,आणि उमरविहिरे या पाच सेवा संस्था च्या निवडणुका जाहीर झाल्या आहे त्यासाठी शुक्रवारी दि.६ उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि.९ छाननी हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील पाच सोसायट्या साठी उमेदवारी अर्ज…

Read More

जळगाव / प्रतिनिधी  अमरावती येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात एम.ए.चे शिक्षण घेत असतांना सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी होत आपल्या समाज कार्याचा श्रीगणेशा केलेले रामसाहेब चव्हाण यांनी अनेक चळवळीत सहभागी होऊन आपल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देत कधीच मागे फिरुन पाहिले नाही. आदिवासी विद्यार्थी संघाचे सहसचिव म्हणून सामाजिक कार्याची जबाबदारी स्विकारलेले रामसाहेब चव्हाण एम.ए‌.एम.एस.डब्लूचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर सुध्दा सामाजिक कार्यापासून स्वतः ला अलिप्त ठेवल्याचे दिसून आले नाही एवढेच नव्हे तर आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतांना त्यांना शासकीय नोकरी गमावण्याची वेळ सुध्दा आली होती. आपल्या कुटुंबाची व नोकरी ची तमा न बाळगता …

Read More