जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील गावठी पिस्तूल घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयित आरोपी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केली आहे. सविस्तर वृत्त असे की, पिंप्राळा परिसरातील मढी चौकातील निलेश चंद्रकांत ठाकूर (वय-२७) उर्फ ‘सुपड्या’ हा तरूण हातात गावठी पिस्तूल घेवून परिसरात दहशत पसरविण्यात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सपोनि जालिंदर पळे, पो.ना. प्रितमकुमार पाटील, विजय पाटील यांनी बुधवार ४ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी निलेश उर्फ सुपड्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून २० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत पो.ना. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी शेळगाव बंधाऱ्याजवळच तापी नदीवर पुल बांधण्यात येत असून या मार्गाचे आधीच विस्तारीकरण झालेले आहे. यातच आता आसोदा येथील रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाची निर्मिती होणार असल्यामुळे जळगाव ते यावलमधील वाहतुकीला गती येणार असून आसोदा, भादलीसह परिसराचा विकास देखील होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आसोदा गेटजवळच्या रेल्वे उड्डाण पुलास 2019 साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तब्बल 23 कोटी 48 लक्ष रूपयांची तरतूद असणारा हा पुल सार्वजनीक बांधकाम विभाग आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येणार असून याची जबाबदारी महारेलवर टाकण्यात आलेली आहे. वर्षभरात हा पूल पुर्ण होणार असून या माध्यमातून ना. गुलाबराव…
जळगाव ः प्रतिनिधी मेहरूण येथील साई मंदिराच्या प्रांगणात 20 लाख रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक या विकास कामाचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाले. मेहरूणमध्ये मनपाच्या खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी आमदार निधीतून 20 लाख रुपये दिले.जनतेच्या भल्यासाठी यापुढेही आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे आमदार भोळे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन, उद्योजक चंद्रकांत लाडवंजारी, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मक्तेदार गौरव पाटील, बंडू वाणी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी बहुजन जागृती मंच भुसावळ यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन व ऑफलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पाच गटात आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान गटात शर्वरी विलास निकम (डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, जळगाव) या विद्यार्थीनीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण व संविधानाची देण’ या विषयावर भाषण सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला. डायएचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता शैलेश पाटील, बहुजन जागृती मंचचे अध्यक्ष राजेंद्र सुरवाडे व स्पर्धा समन्वयक आनंदा सपकाळे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
जळगाव ः प्रतिनिधी लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या द्वितीय उपप्रांतपालपदी गिरीश सिसोदिया यांची निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. जळगाव शहराला 15 वर्षांनंतर हा बहुमान मिळाला. लायन्स क्लब इंटरनॅशलची ही प्रांतीय परिषद सिल्वासा (गुजरात) येथे झाली. या परिषदेत खान्देश, मराठवाडा, विदर्भ येथील 16 जिल्ह्यांतील 490 सदस्य उपस्थित होते. परिषद प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. परिषदेला माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू (औरंगाबाद), डॉ. व्ही. के. लडिया , राजू मनवाणी, नरेंद्र भंडारी यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी प्रांतपाल प्रेम रायसोनी, एच. एन. जैन, सतीश चरखा, सुगन मुणोत, रवींद्र गांधी, शिरीष सिसोदिया, रितेश छोरीया आदींनी सहकार्य केले.
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मनपाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले असून ते महापालिकेला प्राप्त झाले. आयुक्त सतीश कुलकर्णी 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यानंतर राज्य शासनाने आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपवली होती. गेले अनेक दिवस आयुक्त पदासाठी डॉ. गायकवाड आणि कल्याण मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर डॉ. गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल, आज नशीब तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. आज तुमची मानसिक सुस्ती संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. प्रगतीसाठी मेहनत कराल. आज ७६% नशिबाची साथ आहे. पिवळ्या वस्तू जसे की लाडू, केळी किंवा पिवळे कपडे दान करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी आज आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वत:ला कणखर समजाल. हुशारीने काम करा, अडचणी सहज नाहीशा होतील. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. राजकीय बाबी तुमच्या…
यावल : प्रतिनिधी शेतातील विहिरीजवळील टेक्समो कंपनीच्या10हॉसपॉवर क्षमतेच्या मोनोब्लॉक असेंबल केलेल्या अंदाजे 24हजार रुपये किमतीच्या पाण्याच्या2इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आज दि.4रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. यावल येथील तेजस सतीश यावलकर वय 40 यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यावल शिवारातील शेत गट नंबर 1470 शेताजवळील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी टेक्समो कंपनीची10 हॉसपॉवर क्षमतेची मोनोब्लॉक असेंबल केलेल्या पाण्याच्या2 इलेक्ट्रीक मोटारी अंदाजे 24 हजार रुपये किमतीच्या हिरव्या रंगाची मोनोब्लॉक असलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने संमती वाचून चोरून नेल्या या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला…
जळगाव : प्रतिनिधी भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव काल शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे या जन्मोत्सव उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता रथ चौकातून शोभायात्रेला सुुरुवात झाली. या आधी ग्रामदैवत राम मंदिरात बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांच्या हस्ते आरती झाली. फुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान परशुरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यासह शोभायात्रेत श्रीमंत बाजीराव पेशवा ढोल पथक व स्वतंत्रता संग्राम विरांगना राणी लक्ष्मीबाई असे दोन ढोल पथक सहभागी झाले होते. दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी 50 ढोल व 10 ताशांचा समावेश होता. यासह महिलांचे लेझीम पथक तलवार, लाठ्या-काठ्या, दांडपट्टे इत्यादी चे प्रात्यक्षिके हे शोभायात्रेचे वैशिष्ट…