जळगाव : प्रतिनिधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्यांच्या मुद्द्यांवरून जळगावात युवासेना महानगरतर्फे उपहासात्मक असे “भोंगा बजाओ, महंगाई भगाओ” आंदोलन पुष्पलता बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपावर करण्यात आले. यात राज ठाकरे यांच्यासह राणा दांपत्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. तसेच वाढलेल्या महागाईवरून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा अधिकारी शिवराज पाटील, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरीता माळी कोल्हे, शहर प्रमुख ज्योती शिवदे, युवासेना महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पियुष गांधी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रितम शिंदे, भुषण सोनवणे, उमाकांत जाधव, यश सपकाळे, जय मेहेता, अमोल दहाड, गिरीष सपकाळे, अमोल मोरे, अभिजित रंधे,…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी केंद्राजवळ पवन यशवंत पाटील (वय-३७) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ५ मे रोजी रात्री १ वाजता पवन हा घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून बाळा सोनवणे आणि भुषण शिंदे आणि सोबत अनोळखी दोन जणांनी पवन याला शिवीगाळ करून काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पवन याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाळा सोनवणे आणि भुषण…
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता याचं पाहुण्याचा आज नामकरण सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली बोरुडे यांना नुकतेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. याचं चिमुकल्याचा राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा साजरा झाला आहे. यावेळेस राज ठाकरे यांनी नातवाचे किआन असे नाव ठेवले व प्रभोधनकारांची ५ वी पिढी सुरु झाली असेही ठाकरे यावेळेस बोलले. ५ एप्रिलला नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करतं माहिती दिली होती. अमित ठाकरे…
अहमदनगर : वृत्तसंस्था कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कंटेनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चेंदामेंदा झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ॲपे रिक्षा प्रवाशांना घेऊन झगडे फाट्यावरून कोपरगाव कडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वरांना देखील चिरडले आहे ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. या रिक्षात एकूण बारा जण बसले होते. अपघातानंतर रिक्षाचा चेंदामेंदा झाला होता, रिक्षात बसलेल्या प्रवाशांचं सामान आणि विद्यार्थ्यांची…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात परिवारासह राहणारी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह रहिवासाला आहे. १ मे रोजी रात्री ८ वाजता मुलगी ही घरी असतांना गावात राहणारा मगन रामकृष्ण मोरे यांन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. असा संशय पिडीत मुलीच्या वडीलांनी केला आहे. नातेवाईक व इतर परिसरात मुलीचा शोधाशोध केली परंतू ती कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार ५ मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जळगाव महानगर पक्ष कार्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद मौन पाळण्यात आले व कृतज्ञता दिनानिमित्त लोकनेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील , सेवादेलचे जिल्हा अध्यक्ष वाय. एस . महाजन, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील , मिनाक्षीताई चव्हाण , युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी , जिल्हा महानगर सरचिटणीस दिलीपभाऊ महेश्वरी , सुनीलभाऊ माळी, ॲड. राजेश भाई गोयर, उपअध्यक्ष अकीलभाई पटेल, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे ,…
जळगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या सुनसगाव शिवारातील शक्ती पेपर मिलला आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. सविस्तर वृत्त असे की, सुनासगाव शिवारातील शक्ती पेपेर मिल ही चुडामण सरोदे व शशिकांत वाघूळदे यांच्या मालकीची कंपनी आहे.या मिलला सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यांनतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलास ११.४५ मिनिटांनी फोनद्वारे कळविण्यात आले असता अग्निशमन दलाचे बंब तत्काळ रवाना झालेत. यावेळी वाहन चालक वसंत न्हावी, भरत बारी, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांच्या पथकाने 2 बंब वापरून ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी समोर असलेल्या सुदर्शन पेपर मिलमधून…
यावल :प्रतिनिधी शहरातील २१ वर्षीय तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली आहे. हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा आरोप जखमी तरूणाच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील काजीपुरा भागात राहणारा जावेद युनूस पटेल (वय-२१) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे व एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समजते. दरम्यान, फैजपूर येथील अनोळखी तीन जण गुरूवार ५ मे रोजी रात्री १० वाजता जावेद याला भेटण्यासाठी आले होते. जावेद यास गोड- गोड बोलून दुचाकीवर बसवून भुसावळ रोडवरील पीर बाबा दर्गाजवळ घेऊन गेले. तेथे जाऊन त्या तिघांनी…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील इच्छापूर्ती मंदिराजवळील एका हॉटेलच्या पाठीमागे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती नाशिकच्या पथकाला मिळाली होती. यावरून रात्री १ वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सव्वा लाख रोकडसह एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. व १२ जणांना ताब्यात घेत १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी एका विशेष पथकाची निवड केली. त्याअनुषंगाने सदर पथक पेट्रोलिंग करत असताना पो.नि बापू रोहम यांना गुप्तहेरांकडून चाळीसगाव तालुक्यातील करगाव रोडवरील इच्छापूर्ती मंदिराजवळील रूबाबदार हॉटेलच्या पाठीमागे…