जळगाव : प्रतिनिधी शहरातील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे काम प्रगतीपथावर आहे हे उड्डाण पूलाच्या मध्यभागी सम्यक बुद्ध विहार येत आहे. त्यामुळे तेथील औटा कदाचित पुढील काळात तोडण्यात येऊ शकतो यासाठी महापौर महाजन हे पाहणी करण्यासाठी आले असता. परिसरातील नागरिकांनी विनंती केली आहे कि जर हा औटा तोडला तर पुन्हा ते बनवून द्यावा यावेळी महापौर महाजन यांनीही नागरिकांना आश्व्सत केले आहे. दि.5 मे रोजी इंद्रप्रस्थ नगर येथील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे कामाचे निरीक्षणं करण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी व रेल्वे अधिकारी यांच्यातर्फे निरीक्षण करण्यात आले होते. या प्रसंगी जो…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी शांतता, मैत्री, प्रेम आणि संवाद यावर विश्वास असणाऱ्या लेखक, कवी,कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून महाराष्ट्र दिनी शांततेच्या मार्गाने पांढरे कपडे परिधान करून वा पांढरे निशाण दाखवून प्रेम व शांततेच आवाहन केले.अशा प्रकारचे अभिनव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. छत्रपती शिवराय यांचा महाराष्ट्र धर्म हा असाच सर्वसमावेशक व प्रेमाचा होता.याच शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमून सगळ्यांनी शांतता व प्रेमाचे आवाहन केले.या देशावर प्रेम करणारे देशभक्त नागरिक म्हणून या देशातील प्रत्येक नागरिक हा आमचा देशबंधु आहे .त्या प्रत्येक बांधवा सोबत प्रेमाचे नात निर्माण व विश्वास निर्माण करणारी प्रतिकात्मक कृती काल राज्यभर करण्यात आली . जळगावातही…
जळगाव : प्रतिनिधी कोकण प्रादेशिक विभागाच्या वीजबिल वसुलीत मार्चनंतर पुन्हा शिथिलता आली आहे. परिणामी एप्रिल महिन्याचे चालू वीजबिलही पूर्णपणे वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे महिन्याच्या एक तारखेपासूनच चालू वीजबिल आणि थकबाकी वसुलीच्या कामाला गती देऊन महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत भांडूप परिमंडल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (6 मे) आयोजित आढावा बैठकीत…
जळगाव ः येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी व त्यांच्या कार्यकारिणीने जुलै-जुन 2022 या रोटरी वर्षात दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. क्लबच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चौथ्या शिबिरासह एकूण 200 पेक्षा अधिक व्यक्तींनी त्यात रक्तदान करुन सहभाग घेतला. गेल्या दीड-दोन वर्षातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन लांबलेल्या शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, अनलॉकनंतरचे वाढते अपघात, मे महिन्यातील सुट्ट्या, उन्हाळा यावेळी लागणारे रक्त उपलब्ध व्हावे म्हणून रोटरी वेस्टने रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट व जळगाव सायकलीस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या समवेत या शिबिरांचे आयोजन केल्याचे मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. आनंद दशपूत्रे यांनी सांगितले. रोटरी वेस्ट व…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाकण शाखेने कविता, काव्य, कादंबरी अशा तिन्ही प्रकारातील पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या ‘धगधगते तळघण’ काव्यसंग्रहाला साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला. मसापच्या चाकण शाखेने जाहीर केलेल्या पुरस्कारांत काव्य प्रकारात अभिषेक नाशिककर (समांतर), सिराज करिम शिकिलकर (गझलचाँद), उषा हिंगोणेकर (धगधगते तळघर), रावसाहेब जाधव (गरगर मोळ्या : बालकाव्य), कथासंग्रहात दयाराम पाडलोस्कर (बवाळ), रश्मी गुजराथी (जाणीव : बालकथा संग्रह), कादंबरीत चकोर शहा (दोसतार), विशेष प्रकारात प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे (मराठी कविता : परंपरा आणि प्रवाह), स्थानिक साहित्य प्रोत्साहनपर ॲड. नाजिम गुलाब शेख (क्षमाशीलता) यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे. रविवारी दुपारी 4…
जळगाव ः प्रतिनिधी राजस्थानी ब्राम्हण संघातर्फे शुक्रवारी सरदार पटेल लेवा भवनात 25 बटूंच्या सामूहीक उपनयन संस्काराचा कार्यक्रम झाला. बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड, शिवप्रसाद रामावत मुख्य यजमान होते. कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडीत गोपाल तिवारी यांनी केले. त्यांना मनसुख तिवारी यांनी सहकार्य केले. 300 समाजबांधवांनी उपस्थित राहून बटूंना आशिर्वाद दिले. बहुभाषिक ब्राम्हण संघाचे अजितदादा नांदेडकर, श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, अशोक वाघ, राजेश नाईक, मोहन तिवारी उपस्थित होते. राजेंद्र जोशी यांनी रेखाटलेल्या रांगोळीचे विशेष वैशिष्ट्य ठरले. संजय व्यास, शिवप्रसाद शर्मा, महेंद्र पुरोहित, किशन अबोटी, दीपक जोशी, महावीर पचारिया, चंदन जोशी, रवी पांडे, दिलीप सिखवाल, प्रकाश जोशी यांनी नियोजन केले.
जामनेर : प्रतिनिधी दोन कापूस व्यापार्यांमध्ये जुन्या बोदवड रोडसह भुसावळ रोडवर पोलिस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, जामनेर व भुसावळ येथील दोन कापूस व्यापार्यांमध्ये जुन्या बोदवड रोडसह भुसावळ रोडवर पोलिस ठाण्यासमोर वाद झाले. यता दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी पोलिस ठाण्यापासून नगरपालिका चौकापर्यंत हाणामारी करणार्यांसह समर्थकांवर लाठीमार करून जमाव पांगवला. दरम्यान, हा गोंधळ पाहून सराफ बाजारातील व्यापार्यांनी आपापली दुकाने बंद केली होती. या प्रकरणी पोलिसांनी वादातील प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरा याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होता. तर, शहरात शांतताच आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शहराची शांतता भंग करणार्यांवर पोलिस…
मेष राशीच्या लोकांची प्रतिभा जागृत होऊन तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होतील. आज मुलांकडून प्रशंसनीय काम होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल. तुमच्याकडे नवीन संपादने असू शकतात ज्यामुळे तुमची जीवनशैली…
फैजपूर : प्रतिनिधी शहरातील मंडळाधिकारी यांनी एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला फोनद्वारे धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील मंडळाधिकारी हनीफ तडवी हे काम पाहतात. गावातील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे बुधवार ४ मे रोजी रात्री १० वाजता मंडळाधिकारी हनीफ तडवी यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला व सांगितले की, तुमच्या डंपरने माझ्या गाडीला उडविले आहे. तुम्ही मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मला ५० हजार रूपये द्या नाहीतर मी तुमच्या विरूध्द खोटी कसे दाखल करतो असे सांगून तुला…