Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी येत्या 12 ते 18 मे दरम्यान आंतरजिल्हा महाराष्ट्र राज्य 17 वर्षांखालील मुलींचे फुटबॉल स्पर्धा नाशिक येथे होत आहे. जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना 13 मे रोजी वाशिम जिल्ह्यासोबत होणार आहे. जळगाव जिल्हा 17 वर्षांखालील मुलींचा फुटबॉल संघाची घोषणा सचिव फारुक शेख यांनी काल केली आहे. हा संघ मनोज सुरवाडे यांच्या नेतृत्वात अब्दुल मोहसीन व प्रो. डॉ. कोल्हे यांच्या समितीने निवडला आहे. या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून मोसेस चार्ल्स, प्रशिक्षक म्हणून राहील शेख अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सह सचिव प्रो. डॉ. अनिता कोल्हे, ताहेर शेख आदी उपस्थित होते. जिल्हा फुटबॉल संघ असा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जागतिक थलेटिक्स दिनानिमित्ताने परिसंवादचे आयोजन व साहित्य पूजनाचा कार्यक्रम शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात घेण्यात आला. थलेटिक्स साहित्याचे पूजन महाराष्ट्र थलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. नारायण खडके व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी यांनी केले. ॲथलेटिक्स दिनानिमित्ताने झालेल्या परिसंवादात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व व साजरा करण्याचा उद्देश यावर मार्गदर्शन केले. या निमित्ताने राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू संजय मोती, संजय तायडे, धीरज जावळे, तेजस तायडे यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. तुळशीराम नेमाडे, अशोक कोल्हे, राष्ट्रीय…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करताना नवी स्फूर्ती मिळते. जाज्वल्य अशा ऐतिहासिक घटनांचे संदर्भ वाचताना राष्ट्रभक्तीचे स्फूरण चढते. लढवय्या राजा कसा असतो? याचे दर्शन आपल्याला होते, अशा शब्दांत शाळा, महाविद्यालये व संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मत व्यक्त केले. प्रतिमापूजन, युद्ध कलेचा अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप असे कार्यक्रम ही पार पडले. शहरातील सूर्यवंशी कुशवाह राजपूत समाजातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कांचन नगरातील समाज भवन येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, नगरसेवक किशोर बाविस्कर, प्रतापसिंग राजपूत,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या 12 मे रोजी होत आहे. यानिमित्ताने सोसायटीतील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. त्रिशंकू स्थिती असलेल्या ग.स. मध्ये संचालक पळवापळवीची शक्यता लक्षात घेता दोन गटांनी आपले संचालक सहलीला रवाना केले आहेत.दिवसभरच्या बैठकांमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक गेल्या आठवड्यात झाली. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकाही गटाला बहुमत मिळालेले नाही. सहकार गटाचे 9, प्रगती व लोकसहकार गटाला प्रत्येकी 6 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतासाठी 11 संचालकांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. बहुमताच्या जवळ असलेल्या सहकार गटाकडून इतर दोन गटांमधील संचालकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. मेहरुण परिसरात सोमवारी झालेल्या पाणीपुरवठा दरम्यान नागरिकांच्या घरात अशुद्ध व पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्याच्या तळाशी गाळ आणि हिरव्या रंगाचे शेवाळ जमा झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये मेहरूणमधील मराठी शाळा परिसरात सोमवारी सकाळी पाणीपुरवठा करण्यात आला होता. आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याची तयारी केली परंतु सुरुवातीला बराच वेळ पिवळ्या रंगाचे पाणी आल्याने भरण्यात आले नव्हते. त्यानंतर नागरिकांनी पाण्याचा साठा केला पण दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्यांची पाहणी केली असता बऱ्याच घरांमध्ये भांड्याच्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंगळवारी अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवसापर्यंत 2161 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. अजूनही पहिल्या लॉटरीतील 779 जागा रिक्त आहे. शिक्षण विभागातर्फे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून लॉटरी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळवण्यात आली होती. आरटीई 25 टक्केची ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर मार्च महिना अखेरीस पहिली सोडत ऑनलाइन स्वरूपात पार पडली. यात 2940 विद्यार्थ्यांचे निवड झाली असून 2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना सुरूवातीला 20 एप्रिलपर्यंत व नंतर 29 एप्रिलपर्यंत शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष…

Read More

मुंबई / जळगाव ः प्रतिनिधी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळासाठी चालू वर्षी म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटी रूपयांच्या ठोक तरतुदीचीही मागणी केली होती.त्यानुसार मागणीपैकी 40 कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून उर्वरित अनुदान हे पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. तसेच मागील डिसेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यासाठी ठोक तरतूद (न्यायालयीन प्रकरणे ) अंतर्गत मंजूर तरतूदची 250 कोटी रूपयांची रक्कम शासनाने विभागाला वितरीत केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तापी पाटबंधारे विकास…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सुशिक्षित मुलीने समाजाचा पारंपारिक शिवणकाम व्यवसाय असलेल्या मुलाशी लग्न करून समाजात एक आदर्श घडवला आणि मुलगा सुद्धा उच्चशिक्षित असून नोकरी न करता टेलरिंग या व्यवसायाला प्राधान्य दिले. यावेळी मुलीच्या पालकांचे व मुलीचे कौतुक करण्यात आले अशीच प्रगल्भता जर प्रत्येक पालकांनी ठेवली तर निश्चितच समाजाला एक नवी दिशा मिळेल अशा शब्दात जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेन्द्र कुमार सोनवणे यांनी विवाहप्रसंगी शुभेच्छा दिल्या जळगाव शहरातील सुप्रसिद्ध अशा रिलायन्स टेलर्स या फर्मचे संचालक राजेंद्र एकनाथशेठ सोनवणे यांचा मुलगा चि. हर्षल व करमुळ पोहरे ता. चाळीसगाव येथील मनोहर नथूशेठ निकुंभ यांची कन्या चि.सौ.का.लक्ष्मी यांचा आदर्श विवाह 10 मे रोजी यश…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोळसा टंचाईचे संकट व उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची वाढती मागणी कायम असताना महावितरणने गेल्या 19 दिवसांपासून राज्यात कोणत्याही वाहिनीवर विजेचे भारनियमन केले नाही. भारनियमन टाळण्यासाठी तासागणिक सुरू असलेल्या यशस्वी नियोजनाद्वारे ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा सुखद दिलासा दिला आहे. याऊलट देशात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आदींसह आठ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन सुरु असल्याची स्थिती कायम आहे. दरम्यान, काल मंगळवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास राज्यात एकूण 26 हजार 700 मेगावॅट विजेची मागणी होती. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यामधील महावितरणच्या कार्यक्षेत्रात 23 हजार 400 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानुसार महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला आहे. तसेच गेल्या दि. 21 एप्रिलपासून राज्यात कोणत्याही भागातील वीजवाहिनीवर…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्की द्वारे आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस्‌ समारंभात अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले आहे. एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी …बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर… या श्रेणीतील हा पुरस्कार हैदराबाद येथे आयोजित समरंभात अलीकडेच प्रदान करण्यात आला होता.

Read More