Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी गेल्या पंधरवड्यापासून उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या जळगावकरांसाठी मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेची नवीन आव्हाने घेऊन येत आहे. काल बुधवारी जळगावात सकाळी 10.45 वाजताच तापमान तब्बल 40 अंशांवर पोहोचले होते. या वेळेत उष्ण वाऱ्यांचा वेगही ताशी 14 किलोमीटरवर असल्याने एरवी 12 ते 1 वाजेनंतर जाणवणारा उन्हाचा चटका 11 वाजेपूर्वीच हैराण करणारा ठरला. दुपारी 2 वाजता 45.2 तर रात्रीसुध्दा तापमान 30 अंशांवर होते. बंगालचा उपसागर व अंदमान बेटाजवळ समुद्रात असलेल्या असनी चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यातील उष्णतेच्या लाटेवर होत आहे. विदर्भ व खान्देशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. समुद्रातील वादळामुळे हवेतील बाष्प शोषले जात असल्याने उत्तर महाराष्ट्रात आर्द्रता घटली…

Read More

यावल : प्रतिनिधी अमळनेरहुन यावल येथे जात असताना चोपडा येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर इसमाचा दि ११ रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, यावल येथील अक्सा नगर कॉलनीत राहणारे वनपाल असलम खान अमळनेर चोपडा मार्गावर यावल येत असतांना त्यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिषण अपघात झाला होता व त्यांना डोक्यास गंभीर दुखापत झाली होती त्यात जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतांना अडीच महीन्यापर्यंत त्यांनी मृत्युशी झुंज दिली. आज बुधवार, दिनांक ११ मे रोजी त्यांचे दुदैवी निधन झाले. रावेर, यावल, चोपडा या सातपुडा वनक्षेत्रात सेवेत कार्यरत असतांना आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे सर्वांना आपुलकीची व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (वय ३२, रा. नाथवाडा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती. मुकेश याचा अपघात नसून तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की, शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजातून बिरयानी व दारु घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांना आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा प्रत्यक्षात देखील येऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कौटुंबिक आनंद असेल आणि आज तुम्ही आनंदी असाल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चपळतेने भरलेला असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय असेल. विवाह किंवा मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सांगवी येथे एका राठोड परिवाराच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत रोकडसह तीन लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील दामु फंदु राठोड हा ऊसतोड मजूर असून त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. दरम्यान राठोड हा नुकतीच ऊसतोडणी वरून घरी परतला आहे. मात्र त्यांच्या पत्नी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. यावेळी घरातील संसार उपयोगी वस्तूंसह ५ ग्रॅम सोने, बाजरीचे धान्य, बैलांची विक्री करून कपाटात ठेवलेले १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना बुधवार, ११ रोजी घडली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि.) शाखा महाराष्ट्र प्रदेशच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी भिकन शामराव नन्नवरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र त्याना देण्यात आले आहे. धरणगाव तालुकयातील बांभोरी(प्र.चां) येथील सामाजिक कार्यकर्ते भिकन शामराव नन्नवरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परेश कांति कोळी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल देविदास नन्नवरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भिकन नन्नवरे हे अखिल भारतीय कोळी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांनी अनेक सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची खांदेश विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दिनांक १० मे रोजी त्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी जीवनात मनुष्याच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक स्थितीचा जवळचा संबंध असतो. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करायला हवा. गतिमान कालचक्राचा वेध घेऊन बदल अपेक्षित आहे, असा सूर विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेतून निघाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा घेण्यात आली.त्यात तज्ज्ञांनी आपली मते मांडली. कार्यशाळेचे उद्घाटन भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे यांच्याहस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा होत्या.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अमरावती येथे 11 ते 13 मे दरम्यान होणाऱ्या जी. व्ही. मालवणकर रायफल शूटिंग स्पर्धेत जळगावच्या एनसीसी 18 महाराष्ट्र बटालियनच्या सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात नूतन मराठा महाविद्यालयातील चेतन बडगुजर, रामेश्वर पाटील व काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे शिवम पाटील, वेदांत पवार, मूजे महाविद्यालयातील नेहा परमार व प्रियंका सोनवणे यांचा समावेश आहे. सुभेदार जय पॉल, हवलदार राजूराम यांनी सराव करून घेतला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कर्नल प्रवीण धिमन, प्राचार्य एल. पी. देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले. लेफ्टनंट शिवराज मानके, सीटीओ हेमांगी वानखेडे, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्राचार्य गणेश पाटील, सिद्धार्थ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची 2022 या सौंदर्य स्पर्धेत जळगावची फाल्गुनी जितेंद्र पाटील यांनी उपविजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा गौरी नाईक व जयंत पाटील यांनी आयोजित केली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातून 55 स्पर्धक सहभागी झाले होते. मिस्टर वर्ल्ड रोहित खंडेलवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप बोरावके, गौरी नाईक, प्राची भावसार, चैतन्य गोखले, चैताली नेहेते यांनी परीक्षकांचे काम केले. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना गौरा यशश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Read More