Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब जळगावने अंधत्व निवारण अभियान सुरू केले आहेे. या अभियानांतर्गत प्री-मॅच्युअर बेबी म्हणजेच सातव्या महिन्यात जन्माला येणारी मुले यांना येऊ शकणारे अंधत्व व त्याच्याबद्दलची जनजागृती करणारे पोस्टर हे प्रत्येक दवाखान्यात लावण्यात येत आहे. सातव्या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचे डोळे हे पूर्णपणे विकसित नसतात. नंतरच्या विकासात बऱ्याचदा या मुलांना अंधत्व येते जे पालकांना फार उशिरा कळते. त्यावेळेस वेळ गेलेली असते म्हणून त्या संदर्भातली तपासणी ही मुलाच्या जन्माच्या वेळेसच स्पेशालिस्टकडून करून घेणे आवश्‍यक आहे. रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा व माजी अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, डॉ. हेमंत बाविस्कर यांनी या अभियानाचे पोस्टर तयार केले. अभियानाची सुरुवात डॉ. विलास व…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील गॅस्ट्रोएन्टेरोलाजिस्ट डॉ. विपुल चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय ‘एमआरसीपी पॅसेस’ या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. युरोपमध्येही त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची मान्यता मिळाली. सेंट जोसेफ हायस्कूल येथे शालेय शिक्षण तर 11वी आणि 12वी पर्यंतचे शिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयातून घेतले. शालेय दशेत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, गणित विषयाचीही स्वतंत्र परीक्षा त्यांनी देऊन यश संपादन केले. गणितात विशेष रुची असलेले डॉ. विपुल यांनी इयत्ता आठवीत असतानाच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट बनणार असे स्वप्न उराशी बाळगले होते. आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रातीलच लाभल्याने आणि अत्यंत बुद्धिमानी असलेले डॉ. विपुल यांचा शिक्षणाचा प्रवास सुलभ झाला.फिजिशियन डॉ.सुनिल चौधरी व डेंटिस्ट डॉ. पुष्पा चौधरी यांचे डॉ. विपुल चौधरी हे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सध्याच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात संस्काराची जपणूक आवश्‍यक आहे. सुसंस्कारित जीवनासाठी व्रतबंध संस्कार हवे. ब्राह्मण सेवा संस्थेने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन दादा महाराज जोशी यांनी येथे केले. महाबळ परिसरातील ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे 30 बटूंचा व्रतबंध सोहळा बुधवारी हतनूर हॉल मध्ये उत्साहात झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. संत सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा संदेश पाठवला. कोविडच्या दोन वर्षांच्या काळात खंडित झालेला हा सोहळा प्रचंड प्रतिसादात झाला. त्यात जिल्ह्यातील जळगावसह शेंदुर्णी, एरंडोल, नशिराबाद, शिरपूर, ठाणे अशा विविध ठिकाणच्या बटूंचा सहभाग होता. कार्यक्रमास दादा महाराज जोशी, महापौर जयश्रीताई महाजन, माजी महापौर सीमा भोळे,…

Read More

मेष: मेष राशीच्या लोकांना सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य सर्वोच्च शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नात वाढ शक्य आहे. तुम्हाला…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने हे टँकर्स व क्रेनला धडक दिल्याने मालकासह ४ मजूर जागीच ठार झाले आहे. या अपघातासंदर्भांत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी साईमत प्रतिनिधी यांनी संपर्क साधून सांगतिले असता. त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सविस्तर माहिती अशी की, धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. हि घटना घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध हलविण्याचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.शंकर कसबे वैदयकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित अधिकारी ,कर्मचारी यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. कसबे यांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याबद्दल व त्यांनी केलेल्या रुग्णसेवेबद्दल मार्गदर्शन केले व सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिपरीचालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अधिपरीचालका यांनी कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाला डॉ.धनंजय निरगुडे,डॉ.आबेद शेख, रवींद्र सुर्यवंशी,वि.डी.कारके, श्रीमती वर्षा ठोबरे, गीता घाटगे, सुनील वानखेडे,महेंद्र चित्राल,सुनील मगरे, विक्रांत जोहरे,रविराज शेळके,चेतनसर यांच्या सह इतर उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरात होणाऱ्या अशुध्द व  गढूळ पाणीपुरवठ्याची तातडीने दखल घेत आज दुपारी उमाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देत पाहणी केली. उमाळा जलशुध्दीकरण केंद्रातील 1200 मी.मी. व्यासाचा व्हॉलचा गिअर नादुरुस्त झाल्याने शुध्द पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला होता.याबाबत नागरिकांकडून तक्रारीही करण्यात आली होती. सदर नादुरुस्त गिअर तातडीने औरंगाबाद येथून आणून सकाळी बसविण्यात आला व पाणी पुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यात आला. भेटी दरम्यान आयुक्त गायकवाड यांनी संपूर्ण पाणी शुध्दीकरण प्रक्रियेची माहिती घेतली  तसेच शुध्द पाणी स्वत: पिऊन खात्री करुन घेतली.याशिवाय अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणीदेखील जलशुध्दीकरण केंद्रात केली व या योजनेतील कामातील अडचणी समजून घेवून त्यांची लवकरच…

Read More

बोदवड ः प्रतिनिधी अल्पवयीन मुलगीबरोबर प्रेमाचा बनाव करून तिला पळून घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार केल्याप्रकरणी प्रविण संजय बावस्कर (वय -24 ) रा.जलचक्र खु. ता . बोदवड यास पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 4 वाजेच्या पुर्वी फिर्यादीचे राहते घरातुन जलचक्र खु. येथून आरोपीने अल्पवयिन मुलीला पळवून नेले होते.आरोपीवर भादवि कलम 363 , 376 (2), 366 (अ) सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.नि.राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अंकुश जाधव करीत आहे.

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची कार्यकारणी अनधिकृत असल्याने त्यांनी केलेली शिक्षक पदभरती रद्द करण्याची तक्रार सोसायटीचे सभासद आणि समाजसेवक यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा परिषद जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे 11 मे 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात समाजसेवक हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर यांनी तसेच सोसायटीचे सभासद आसिफ खान ताहेर खान,युनूस खान रशीद खान,अ.मुनाफ शे.ताहेर, नजीर खान आमिर खान यांनी नमूद केले आहे की,यावल येथील नॅशनल एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीची कार्यकारणी अनधिकृत व घटनाबाह्य असल्याने या कार्यकारी मंडळाला शिक्षण पद्धती व कोणताही आर्थिक किंवा विकास करण्याचा हक्क अधिकार नसल्याने तसेच केलेली शिक्षक वरती अति व तातडीने रद्द करण्यात…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी गावातील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यतचे े154 दिवसांचे धान्य वाटप विद्यार्थ्यांना “मापात पाप“ करण्याच्या उद्दिष्टाने वजन काटा न वापरता स्टीलच्या बालटीने करण्यात आले.कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने धान्य वाटप प्रक्रियेत वजन काट्याऐवजी स्टील बाल्टीचा वापर करण्यात आला.अशी शक्कल संबंधितांनी का? व कशासाठी? लढविली,विद्या मंदिरातच विद्यार्थ्यांना मापात पाप कसे करावे याचे धडे दिले जात आहेत का?असे अनेक प्रश्न न्हावी ग्रामस्थांसह तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उपस्थित केले जात आहेत. सविस्तर माहिती अशी की, गेले 7 महिन्यापासून विद्यार्थी धान्यापासून वंचीत होते.दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील न्हावी गावातील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवार2022पर्यतचे 154 दिवसांचे मूग व…

Read More