जळगाव : प्रतिनिधी गवळी वाडा परिसरात किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होवून दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात ५ जखमी झाले असून त्याना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथील मश्चिबाजार समोर मंगळवार रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांच्या परिसरातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. जखमीना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गवळीवाड्यात…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा.सुप्रियाताई सुळे यांचा जळगाव दौऱ्यावर असतांना राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शहरातील सामान्य कार्यकर्त्याना बळ देण्यासाठी खा.सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज वाणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत करतांना अर्बन सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज वाणी, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र भैय्या पाटील, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, साईमत मिडीया प्रा.लि.चे संचालक परेश बऱ्हाटे, आर.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील शिरूड फाट्याजवळ दीड लाख रूपये किंमतीचा ओलसर गांजासह तरूणाला अमळनेर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शिरूड फाट्याजवळ संशयित आरोपी संतोष अशोक ढिवरे रा. ताडेपुरा टाकरखेडा ता. अमळनेर हा तरूण बेकायदेशीररित्या त्याच्या सोबत कापडी पिशवीत १ लाख ५० हजार रूपये किंमतीचा १० किलो ३८६ गॅम ओलसर गांजा विक्रीसाठी आणला असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी सायंकाळी ४ वाजता धडक कारवाई करत संशयित आरोपी संतोष ढिवरे याला ताब्यात घेवून चौकशी केले असता त्याच्याजवळ ओलसर गांजा आढळून आला. पोलीसांनी ओलसर गांजा हस्तगत…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा दुध संघात कंत्राटी कामगार म्हणून कर्तव्यावर असतांना धनराज बिरारी यांचे मुक्ताईनगर येथे झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यांच्या कुटूंबियांना योग्यतो न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कै.धनराज सुरेश बिरारी यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत गरीबीची असून त्यांच्या पश्चात गरोदर पत्नी व दोन लहान मुली वृध्द आई असल्याने घरात कर्ता पुरुष नसल्याने त्यांच्या पत्नीस दुध फेडरेशन येथे कायमस्वरुपी नोकरी मिळावी. धनराज बिरारी यांची ड्युटी संपल्यानंतरही एमडीने त्यांना दुध संघाचा काहीही संबंध नसणाऱ्या नांदुरुस्त ट्रॅकरचे दुध दुसऱ्या टँकरमध्ये ट्रॉन्सफर करण्यासाठी पाठविले. व त्याठिकाणी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. धनराज बिरारी यांचा या…
जळगाव : प्रतिनिधी मुंबईत पु. ल. देशपांडे मिनी सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे जळगाव परिवर्तन आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाची सांगता रविवारी झाली. बहिणाबार्इंच्या कवितांचा व गाण्यांचा सांगीतिक ‘अरे संसार संसार’, कार्यक्रम, ‘नली’ एकलनाट्य व ‘अमृता साहिर इमरोज’ नाटक असे तीन कार्यक्रम पार पडले. तिन्ही कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळाला. महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना ज्वारीच्या तोट्यासह असलेली कणसं, केळीचा घड, कापसाची टोपली भेट देण्यात आली. हे खान्देशी आदरातिथ्य इथल्या रसिकांना अधिक भावले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले.रामदास भटकळ, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, चित्रकार शुभा गोखले , अभिनेते नंदू माधव, राहुल निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन कापूस, केळी,…
जळगाव : प्रतिनिधी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला पर्यावरण सखी मंचच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा मनिषाताई किशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मनिषा पाटील यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धन व त्यासंबंधी केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे आणि महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्षा श्रीमती प्रियंवदा तांबोटकर यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल मनिषाताई यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
जळगाव : प्रतिनिधी छंद माणसाच्या आयुष्यात समाधानासह प्रदीर्घ आनंद देतात. त्यातच कवितेचा छंद असणे हा जगावेगळा आनंद. 40 वर्षे कवितेची आराधना आणि उपासना ‘प्रवास’ या कवी प्रकाश बारी यांच्या काव्यसंग्रहातून दिसून येते, असे प्रतिपादन कवी साहित्यिक यशवंत मोरे यांनी केले. रविवारी काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कवी टी.जे. पाटील, अपर्णा भट, व्ही.एन. पाटील, पी.एन. बारी, वसंत सपकाळे, प्रवीण भूते यांनी कविता सादर केल्या. प्रांजल, हर्षित, आदवी यांनी बालकांना भावणारी या संग्रहातील ‘गुड्डी’ ही कविता सादर केली. गजानन फुसे, रघुनाथ आटवाल, संतोष बारी, रूपचंद खलसे, प्रा. सुहास बागुल, लक्ष्मण लावणे, सुरेखा माळी, रिना ताडे, रोहिणी अस्वार, वर्षा उमरकर (अकोला), स्वाती…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाची राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धा 18 ते 20 मे दरम्यान शेगाव येथे होत आहे. स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली. पुरुष संघाच्या कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू विशाल फिरके, तर महिला संघाच्या कर्णधारपदी राष्ट्रीय खेळाडू रोशनी खान यांची निवड करण्यात आली. खेळाडूंना प्रा. चंद्रकांतअण्णा सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर आदी उपस्थित होते. जाहीर झालेल्या संघातील खेळाडू पुरुष संघ : विशाल फिरके (कर्णधार) विजय न्हावी, स्वप्निल महाजन, देवेश पाटील, रोहित नवले, गिरीश पाटील, भूपेंद्र भारंबे, सचिन भंगाळे, दीपेश पाटील, हर्षल परदेशी,…
जळगाव : प्रतिनिधी प.पू. नाना महाराज तराणेकर भक्तांमध्ये चैत्र वद्य दशमी ही तिथी मार्तंड दशमी किंवा चैतन्य दशमी म्हणून सर्वांच्या हृदयात अंकीत आहे. सदगुरुंचा ब्रह्मलिन होण्याचा दिवस पण आजही चैतन्याची अनुभूती असल्यामुळे दोन वर्षांच्या आपत्ती कालानंतर हा उत्सव नुकतेच इंदौर येथे झाला. दोन वर्षापूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण कोरोनाच्या काळात आपापल्या ठिकाणी “मार्तंड महिमा पारायण”, “घोरातकष्टता स्तोत्राचा जप”, “दिगंबरा दिगंबरा” मंत्राचा जप इत्यादी संकल्पपूर्वक समग्र परिवाराने केले. याची सांगता पुणे येथे करण्याचे निश्चित झाले होते पण परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ली त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. सन 2021 ते 2022 हे नानांच्या जन्मादिनोत्सवाचे 125वे वर्ष भक्तगण जरी एकत्र येवू शकलो नाही…