पाचोरा ( प्रतिनिधी ) पाचोऱ्यात शासकीय जागा हडप करण्यासाठी कागदपत्रांची रंगरंगोटी झाल्याची खळबळ माजली आहे नगरपालिका इमारतीच्या लाईनवर शासनाची कोट्यवधीची जागा फुकट हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याआदी हायपॉवर वापरून बड्या नेत्या सोबत लबाडी करून विविध स्वरूपात शासकीय जागा हडप.झाल्या आहे .? यात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासनाला हाताशी धरत शासकीय जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रकार घडत आहे. नुकतच ऐका राजकीय पदाधिकारीने पाचोरा नगरपालिका हद्दीत मुख रस्त्यावरची कोट्यवधीची जागा हडप करण्यासाठी बड्या नेत्यांना हाताशी घेऊन कागदपत्रे रंगविले असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासनाने शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करताना विविध…
Author: Saimat
मेष : मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिक कार्यात सहभागी व्हा आणि इतरांना मदत करण्यात आनंद घ्या. तसेच, यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली लागतील. नोकरदार लोकांचे सहकाऱ्याशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत राहतील आणि तुमची चांगली प्रगती होईल. तुमचे उत्पन्न वाढेल…
जामनेर- प्रतिनिधी तालुक्यातील पहुर येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असतांना त्यांनी संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना चोरी केलेल्या मुद्दे मालासह अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पो.हे.काँ.विनय सानप,पो.नाईक ज्ञानेश्वर ढाकरे, पो.नाईक हंसराज वाघ हे काल दि.१६रोजी रात्री गस्तीवर असतांंना दि.१७रोजी पहाटे ५वाजेच्या सुमारास मोटार सायकल क्रमांक एम.एच.२१जे.०४७१ स्वार अजमत शहा कादरशहा फकीर(वय२०) व अक्रमशहा महमंद शहा फकीर(वय१८)दोन्ही रा.बिस्मिल्ला नगर जामनेर हे संशयास्पद आढळून आले.गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना सोनळे फाटा येथे अधांराचा फायदा घेऊन झाडाखाली लपून बसले होते.त्यांना ताब्यात घेत पहुर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल सह…
यावल (सुरेश पाटील) श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठ व गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची बदनामी करीत प्रसारमाध्यमांची दिशाभूल करणारी माहिती देऊन सेवकरी आणि नागरिकांच्या,भाविकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी यावल येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांना काल दि.17रोजी निवेदन वजा तक्रार देण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही यावल येथील श्री स्वामी समर्थ सेवा परिवारातील सेवेकरीअसुन शेतीचा व्यवसाय व व्यापार करून उदरनिर्वाह करीत आहोत.श्री स्वामी समर्थ मार्गाचे काम हे श्री परमपुज्य मोरेदादा व त्यानंतर सर्व सेवकन्यांचे आधारस्तंभ असलेले आदरणीय प.पु.गुरुमाऊली हे सुमारे 78 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे.सदरील कामकाज हेअत्यंत पारदर्शकपणाने चालते.…
जळगाव : प्रतिनिधी गवळी वाडा परिसरात किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होवून दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात ५ जखमी झाले असून त्याना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथील मश्चिबाजार समोर मंगळवार रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांच्या परिसरातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. जखमीना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गवळीवाड्यात…
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा.सुप्रियाताई सुळे यांचा जळगाव दौऱ्यावर असतांना राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शहरातील सामान्य कार्यकर्त्याना बळ देण्यासाठी खा.सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज वाणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत करतांना अर्बन सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज वाणी, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र भैय्या पाटील, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, साईमत मिडीया प्रा.लि.चे संचालक परेश बऱ्हाटे, आर.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील शिरूड फाट्याजवळ दीड लाख रूपये किंमतीचा ओलसर गांजासह तरूणाला अमळनेर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शिरूड फाट्याजवळ संशयित आरोपी संतोष अशोक ढिवरे रा. ताडेपुरा टाकरखेडा ता. अमळनेर हा तरूण बेकायदेशीररित्या त्याच्या सोबत कापडी पिशवीत १ लाख ५० हजार रूपये किंमतीचा १० किलो ३८६ गॅम ओलसर गांजा विक्रीसाठी आणला असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी सायंकाळी ४ वाजता धडक कारवाई करत संशयित आरोपी संतोष ढिवरे याला ताब्यात घेवून चौकशी केले असता त्याच्याजवळ ओलसर गांजा आढळून आला. पोलीसांनी ओलसर गांजा हस्तगत…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा दुध संघात कंत्राटी कामगार म्हणून कर्तव्यावर असतांना धनराज बिरारी यांचे मुक्ताईनगर येथे झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यांच्या कुटूंबियांना योग्यतो न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कै.धनराज सुरेश बिरारी यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत गरीबीची असून त्यांच्या पश्चात गरोदर पत्नी व दोन लहान मुली वृध्द आई असल्याने घरात कर्ता पुरुष नसल्याने त्यांच्या पत्नीस दुध फेडरेशन येथे कायमस्वरुपी नोकरी मिळावी. धनराज बिरारी यांची ड्युटी संपल्यानंतरही एमडीने त्यांना दुध संघाचा काहीही संबंध नसणाऱ्या नांदुरुस्त ट्रॅकरचे दुध दुसऱ्या टँकरमध्ये ट्रॉन्सफर करण्यासाठी पाठविले. व त्याठिकाणी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. धनराज बिरारी यांचा या…
जळगाव : प्रतिनिधी मुंबईत पु. ल. देशपांडे मिनी सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे जळगाव परिवर्तन आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाची सांगता रविवारी झाली. बहिणाबार्इंच्या कवितांचा व गाण्यांचा सांगीतिक ‘अरे संसार संसार’, कार्यक्रम, ‘नली’ एकलनाट्य व ‘अमृता साहिर इमरोज’ नाटक असे तीन कार्यक्रम पार पडले. तिन्ही कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळाला. महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना ज्वारीच्या तोट्यासह असलेली कणसं, केळीचा घड, कापसाची टोपली भेट देण्यात आली. हे खान्देशी आदरातिथ्य इथल्या रसिकांना अधिक भावले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले.रामदास भटकळ, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, चित्रकार शुभा गोखले , अभिनेते नंदू माधव, राहुल निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन कापूस, केळी,…