Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी ‘जळगाव टी-10 क्रिकेट असोसिएशन, जळगाव’ आयोजित नरेंद्राशिष जळगाव प्रिमिअर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा दि.18 रोजी महापौर जयश्री महाजन यांनी उद्घाटन केले. प्रथम दिवशी नोमन्‌ क्लब चॅम्पियन्स , रेडियन्स रायडर्स , सागर भाऊ प्रोटेक्टर्स यांची सरशी तत्पूर्वी महापौर सौ.जयश्री महाजन यांनी केले. धावपट्टी पूजन, नाणेफेकीसह क्रिकेट खेळून उद्घाटन केले. याप्रसंगी नरेंद्रशिष जळगाव प्रीमियर लीग चे मुख्य प्रयोजक इंजि.राहुल सोनवणे तसेच उपमापौर कुलभूषन पाटील व सागर सोनवणे, सोबत प्रथम्‌ पारितोषिक देणारे दाते रोहित तलरेजा व द्वितीय पारितोषिक देणारे आशफाक शेख तसेच टी 10 चे सचिव पंकज महाजन, लिंगायत समाज अध्यक्ष संदीप लिंगायत वाणी, विवेक पाटील, सतनामसिंग बावरी यांच्यासह असोसिएशनचे…

Read More

मेष : राशीच्या लोकांच्या समस्या दूर होतील आणि घराच्या देखभाली संबंधीच्या कामात लक्ष घालावे लागेल. तुमच्या जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या रागावर आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रलंबित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाच्या प्रचंड ताणामुळे थकवा जाणवेल. यासोबतच तुमच्या प्रमोशनची शक्यताही वाढेल. प्रेमाने भारलेल्या नातेसंबंधांसह कुटुंबात आनंददायी सुसंवाद राहील. प्रेमाच्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे असते. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : राशीचे लोक पैशाच्या बाबतीत योग्य बजेट ठेवतील. तुम्ही केलेल्या कामाचे समाजात किंवा लोकांमध्ये कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, आपली उर्जा केवळ चालू उपक्रमांवर केंद्रित करा.…

Read More

भडगाव : प्रतिनिधी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की, भडगाव ते वडघे फाट्याच्या जवळ दि १८ रोजी रात्री अकराच्या सुमारास वाळूची उचल करण्यासाठी जात असलेले ट्रॅक्टर पलटी झाले. यामध्ये सुरेश अशोक शिंदे (वय २७, रा. टोणगाव), रवी सुरेश शिंदे (वय २५) आणि मयूर भोई (वय २१, रा. आझाद चौक, भडगाव) हे तीन युवक ट्रॅक्टरखाली दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होत असतांनाच डॉक्टरांनी या युवकांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये तर…

Read More

मुंबई : महागाईचा मुद्दा घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुणे येथे भाजपच्या  कार्यकर्त्यांनी हात उगारला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.या घटनेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी संताप व्यक्त केला आहे. पुन्हा कोणत्या महिलेवर पुरूषाने हात उचलला तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन, अशा शब्दात सुळे यांनी इशारा दिला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर  यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. कानफाटात मारावीशी वाटली होती या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महाविकास आघाडी सरकार आता हात तोडण्याची भाषा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात आजारपणाला कंटाळून शहरातील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील खोटे नगर परिसरातील झाडाखाली विलास महाजन हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी देखील होता. या आजारपणाला कंटाळून विलास याने ज्याठिकाणी राहत होता त्याच ठिकाणावरील झाडाला रुमालाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्या परिसरातील रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव सोनवणे, सतिष हाळनोर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहून राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. माझ्या निर्णयाचे सहकारी स्वागत करतील : हार्दिक पटेल हार्दिक पटेल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री…

Read More

जळगाव- प्रतिनिधी  शहरातून जाणा-या खोटे नगर स्टॉप नजीक असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला आज भल्या पहाटे पावणे तिन वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून महाबळ आणि गोलानी मार्केट येथील फायर स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती समजताच अग्नीशमन दलाचे बारा बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी पाच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याकामी सहायक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, हेड फायरमन, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, चालक संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे आदिंनी आगीवर नियंत्रण मिळवण्याकामी परिश्रम घेतले.

Read More

पुणे : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असताना राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची घोषणा करण्यात आली आहे. मे महिन्याअखेर राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याचे शहराध्यक्ष बदलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्याची तयारी सुरु असताना भाजप खा. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना माफीनामा सादर करण्याचे सांगितले होते. यावर मनसेच्या कुठल्याही प्रवक्ते यांनी कुठलीही ठोस भूमिका मांडली नाही त्यांनी यासंदर्भातील सर्व विषय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच मांडतील अशी भूमिका घेतली होती. आता पुण्यामध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे त्या भाजप खासदार यांचा…

Read More

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. याकरिता आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा त्यांना जाहीर केलेला नाही. या निवडणुकीत भाजपच्या  दोन जागा निश्चितच निवडून येणार आहेत. तर तिसऱ्या जागेसाठी पक्षाने रणनीती आखली आहे. या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा कोटा हा 42 ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप दोन जागेवर विजय मिळवेल. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत असल्याने भाजपाकडून रणनीती आखण्यात येत आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल,  विनोद तावडे,  हर्षवर्धन पाटील,  धनंजय महाडिकयांच्या नावाची…

Read More