Author: Saimat

ओबीसींची जातीनिहाय जनगणना, ई. व्ही. एम मशीनद्वारे होत असलेला घोटाळा, महागाई, बेरोजगारी या व अन्य सामाजिक, शेक्षणिक व राजकीय विषयांच्या अनुषंगाने शुक्रवार दि. २० मे रोजी राजवाडा चौपाटी मैदान सातारा येथे सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेचे उद्घाटक प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्त होणार असून यावेळी उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने, लोकायत प्रकाशनाचे राकेश साळुंखे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नलोकशाही टिकली तर तिची फळे चाखता येतील अन्यथा लोकशाही नाही टिकली तर विनाश अटळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून तरूणाला चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शंकर सुरेश सोनवणे (वय-२६) रा. रामेश्वर कॉलनी तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शंकर सोनवणे याने एका मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून मंगळवारी १७ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास योगेश भागवत कोळी, निलेश राजपूत (पुर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन जणांनी शंकर सोनवणे हा दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानासमोरून जात असतांना अडविले. मुलीचे नाव का घेतले असे बोलून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. योगेश कोळी व निलेश राजपूत यांनी…

Read More

Dearness Allowance Hike: सरकारने या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. महागाई भत्त्यात 14 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचवेळी 10 महिन्यांचा फरकही दिला जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. यामुळे वाढत्या महागाईत मोठा दिलासा मिळला आहे. सातत्याने महागाईचा सामना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee) सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाच वेळी 14 टक्क्यांनी वाढ केली आहे.  महागाई भत्त्याची ही वाढ दोन पटीच्या आधारे करण्यात आली आहे.  रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. डीएमध्ये ही वाढ 1 जुलै 2021 पासून 7 टक्के आणि 1 जानेवारी 2022 पासून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायती, महानगरपालिका व नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. या आरक्षणासाठी आयोग नागरिकांची मते जाणून घेणार आहे. दरम्यान, नाशिक विभागातील नागरिकांना 22 मे रोजी आयोगासमोर म्हणणे सादर करता येणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदने देता येणर आहे. विभागीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये आजवर 403 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. सदस्यांनी एकूण 500 पिशव्या संकलित करण्याचा संकल्प केला आहे. शिवाजीनगरातील एस. के. ऑइल मिल येथे रोटरी गोल्ड सिटीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, एस. के. ऑइल मिलचे संचालक विनोद अग्रवाल, गोल्ड सिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, प्रकल्प प्रमुख धीरज अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रक्तदानाचे महत्त्व व फायदे सांगून रोटरी गोल्ड सिटीने वर्षभर राबवलेल्या रक्त संकलन अभियानाचे कौतुक केले. शिबिरात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यस्तरीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्हा संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेत जिल्हा व्हेटरन्सच्या डॉ. वृषाली पाटील, डॉ. सारंगा लोखंडे, चेतना शहा, सुनिल रोकडे, डॉ. संदीप पाटील, कीर्ती मुणोत हे खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित वरिष्ठांची राज्यस्तरीय स्पर्धा लातूर येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील एकेरीत अंतिम सामन्यात 50 वर्षांवरील गटात अर्चना सिंग हिचा 21-15, 19-21, 21-18 असा पराभव केला. तर मिश्र दुहेरीत डॉ. पाटील व किरण माकोडे यांनी आनंद विठ्ठलकर व अर्चना सिंग या जोडीचा सरळ दोन गेममध्ये 21-10, 21-16 असा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सराफाच्या दहा लाखांपैकी दीड लाख रुपये काढून घेतल्यानंतर परत केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, हा गंभीर प्रकार असून या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्यासाठी सराफ असोसिएशनने सर्व पुरावे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. चौकशीत दोषी आढळून आल्यास भंडारेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एक सराफ व्यावसायिकाने व्यवहाराचे 10 लाख रुपये जळगावात पाठवले होते. हे पैसे जळगावात पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तीने जळगावच्या दोन जणांना मदतीसाठी बोलावले. रात्रीच्या वेळी ही रक्कम दुचाकीवरुन तिघे जण घेऊन जात असताना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेवर गुजरातचे डॉ. मोंटू पटेल यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जळगाव जिल्ह्यातर्फे सत्कार आणि सन्मान जयपूर येथील अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणी सभेत करण्यात आला. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियात 35 वर्षांनंतर प्रथमच मेडिकल ट्रेंडमधून नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला स्थान मिळाले आहे. डॉ. पटेल हे गुजरात केमिस्ट असोसिएशनचे सक्रिय सभासद आहे. देशात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने जळगाव जिल्ह्याच्या वतीने डॉ. पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, गुजरात राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जसू पटेल, डोंबिवली असोसिएशनचे व्हाइस चेअरमन नीलेश वाणी, फार्मसी कौन्सिलचे माजी सदस्य दिलीप कदम उपस्थित…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून मू. जे. महाविद्यालयाच्या ‘ब्लडी पेजेस’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले होते.या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.स्पर्धेची अंंतिम फेरीत 21 मे रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे होणार आहे. यासाठी मूजेचा संघ सज्ज झाला असून कलावंतांचा जोरदार सराव सुरू आहे. जळगाव केंद्रावर 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात राज्य नाट्य मू. जे. महाविद्यालयाचा चमू राज्य नाट्यच्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाला असून सराव सुरू आहे. संघातील विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य एस. एन. भारंबे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक आणि…

Read More