मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी “करिअर ॲव्हेन्यू इन सायबर सिक्युरिटीज” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जळगाव येथील सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ पार्थ जामोदकर यांनी दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान अधिक गुंतलेले असल्याने कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिकांची गरज वाढत आहे. सायबर सुरक्षा हे चांगले करिअर क्षेत्र होऊ शकते असे मत व्यक्त केले. सायबर सुरक्षा म्हणजे काय, सायबर धोक्यांचे प्रकार, सायबर सुरक्षेचे फायदे याची माहिती दिली. तसेच व्हाईट हॅट व ब्लॅक हॅट यातील फरक ओळखणे, हॅकर्स व सायबर क्राईम याबाबतही माहिती देऊन विविध उदाहरणे त्यांनी दिली. यावेळी अध्यक्षस्थानी संगणकशास्त्र प्रशाळेचे…
पाचोरा : प्रतिनिधी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यांवर आधारित चरणबद्ध आंदोलन केले जात आहे. यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शन करण्यात आले होते ,त्याआधारे आज दि. २५ मे रोजी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात आले. याआंदोनला पाचोऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पाचोरा शहरात सकाळी १० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, बस स्थानक रोड, भडगाव रोड, जारगाव चौफुली, भारत डेअरी स्टॉप, येथे अत्यावश्यक सेवा वगळता संमिश्र प्रतिसाद दिसुन येत आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या विजय फिरके,विजय पाटील व उमेश घुले या धावपटुंनी लोणावळा येथे संपन्न झालेल्या टाटा अल्ट्रा ३५ किमी रन या स्पर्धेत यश संपादन केले. त्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तिघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. रात्रीच्या काळोखात ३ वाजता लोणावळ्याच्या सुनील वॅक्स म्युझिअम येथून स्पर्धेस सुरुवात झाली तर तब्बल ८५० मी उंचीवरील अवघड असा घाट धावत जाऊन तिकोना किल्ल्याजवळील जवन तुंगी मार्गापर्यंत नियोजित वेळेत पोहचायचे होते. परंतु अतिशय निर्धाराने तीनही धावपटुंनी हा कठीण असा मार्ग धावत जाऊन पूर्ण केला. याप्रसंगी आपण मागील काही महिन्यांपासून घेत असलेली मेहनत तसेच प्रवीण फालक सर व डॉ तुषार पाटील…
मुंबई : प्रतिनिधी दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणण्यात ऊर्जा विभाग व ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे यशस्वी ठरले आहेत. राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला यामुळे गती मिळणार असून २०० मेगावॅट वीज आणि ३० हजार नवे रोजगार या गुंतवणुकीतून उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ. राऊत हे सध्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले असून ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक खेचून आणण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करीत आहेत.…
जळगाव वीज मीटर, पॉवरग्रिड सिम्युलेशन, इंटेलिजेंट ग्रिड प्लॅनिंग आणि मॉनिटरिंग सोल्यूशन्स या क्षेत्रात विशेष ओळख असलेल्या अॅडॅप्ट्रिसिटी एजी या स्वित्झर्लंडमधील कंपनीने राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना स्वित्झर्लंड येथे विशेष आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील व्यवहार्यता अभ्यासासाठी त्यांच्या उत्पादनांचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने, कंपनी सीटीओ स्टीफन कोच यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आगामी उपक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. अॅडाप्ट्रिसिटी ही स्वित्झर्लंडस्थित कंपनी असून तिला ऊर्जा मीटरच्या निर्मितीचा सखोल अनुभव आहे. त्यांची अनेक देशांमध्ये उपस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा मीटरचा पुरवठा ते करतात.…
प्रतिनिधी : अमिन पिंजारी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोण पिराचे येथील युवकाचा चाळीसगाव नजीक ओझर गावाजवळ अपघातात मृत्यू झाला तरुणाच्या मृत्यूमुळे लोन गावात हळहळ व्यक्त होत आहे. लोण येथील अशोक तुकाराम पाटील(वय३८) हे चाळीसगाव येथे कामानिमित्त गेले होते चाळीसगावहुन बाजार करून घराकडे येत असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशोक पाटील हे लोण गावात ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक म्हणून काम करीत होते त्यामुळे त्यांचा सर्व गावाशी संपर्क होता हसतमुख व्यक्ती अचानक गेल्याने संपूर्ण गावात चूल पेटलीच नाही एक मेहनती तरुण अचानक अपघातात गमावल्याने नातेवाईक व ग्रामस्थ हंबरडा फोडून रडत होते मयताच्या पश्चात पत्नी दोन मुले आई भाऊ भावजयी…
भुसावळ : प्रतिनिधी विरोदा अतिउच्च दाबाच्या वीजकेंद्रातून ३३ केव्ही लाईन काढून त्या परिसरातील ३३/११ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रांना जोडण्यात आलेल्या नाही व त्यामुळे सदर परिसरातील शेतकऱ्यांना कमी दाबाचा व वेळोवेळी खंडित होणारा विद्युत पुरवठा होत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे अति उष्णतेमुळे अतोनात नुकसान होत असून आर्थिक संकटांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.या संदर्भात कृषिमित्र हरिभाऊ जावळे विचार मंचास शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने २२० के.व्ही. विरोदा वीज केंद्रातून यावल, रावेर तालुक्याच्या परिसरातील ३३ केव्ही उपकेंद्रांना वीज पुरवठा उच्च दाबाने करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत, व्यवस्थापकीय संचालक म.ऱाज्य विद्युत वितरण कंपनी आणि विभागातील सर्व अधिकाऱ्यांना कृषिमित्र हरिभाऊ जावळे…
मुंबई :- प्रतिनिधी आज शिवसेनेकडून राज्यसभेच्या २ जागांसाठी माजी खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणुकीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच, यावेळी भाजपाकडून दबावतंत्र सुरू असल्याचे म्हणत शिवसेना आणि महाविकास आघाडी दबावाला भीक घालत नसल्याचे ठणकावून सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीत माजी खासदार संभाजीराजे यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस बघायला मिळू शकते. त्यातच दोन उमेदवार आरामात राज्यसभेवर निवडून जाण्याची खात्री असताना भाजपानं तिसरा उमेदवार देखील उभा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ही…
यावल (सुरेश पाटील) दि.23 मे 2022 रोजी श्रीक्षेत्र शेगाव(गजानन महाराज)येथे महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाची राज्य आढावा बैठक राज्य अध्यक्ष बाळासाहेब सिदें पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यां बैठकीत जळगाव जिल्ह्यातील यावल येथील ज्ञानेश्वर महाजन यांची महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. पोलीस पाटील ज्ञानेश्वर महाजन हे 6 वर्ष यावल तालुका अध्यक्ष,12 वर्ष जळगाव जिल्हाध्यक्ष,5 वर्ष खांन्देंश होते. संघटने मधील त्यांचे उत्तम कार्य आणि संघटन लक्षात घेता आता त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून त्यांच्याकडे राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सर्वानुमते सोपविण्यात आली. बैठकीत उपस्थित राज्य अध्यक्ष बाळासाहेब…